भारत माँरीसियस व्यापार नव्या वळणावर !

   

    आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी नूकताच आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला. आफ्रिका खंडात वाढत जाणाऱ्या चीनच्या वर्चस्व्याला शह देण्यासाठी ही रणनिती उपयोगी पडू शकते, असे परराष्ट्र धोरणाविषयीचे तज्ज्ञांचे मत आहे.या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा 
विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता येवू शकतील.
  भारताने या आधी या प्रकारचे करार आशियान संघटनेतील देश, युरोपीय युनियन, जपान आदी देशांबरोबर केला आहे. मात्र आफ्रिका खंडातील देशांबरोबरचा हा  या प्रकारचा पहिलाच करार आहे. चीनने याच प्रकारचा करार माँरीसियस बरोबर जानेवारी 2021 रोजी केला आहे. या करारामुळे भारतीय कंपन्यांना माँरीसियस बरोबर भविष्यात माँरीसियसच्या लगत असणाऱ्या झिंम्बाबे, केनिया, दक्षीण आफ्रिका या देशातील बाजारपेठेत शिरण्याची संधी मिळेल., अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे 

              माँरीसियस हा आफ्रिका खंडातील हिंदू धर्मिय बहुसंख्य असणारा देश आहे. हा देश आफ्रिका खंडातील मुख्य भुभागावर वसलेला नसून मुख्य भुभागाच्या जवळ असणाऱ्या बेटावर वसलेला देश आहे. भारतासारखाच ब्रिटीशांची वसाहत असणाऱ्या या देशात ब्रिटीश काळात अनेक भारतीय स्थलांतरीत झाल्याने सध्या या देशात अनेक भारतीय वंशाचे लोक वास्तव्यास असल्याचे दिसून येते. त्यामुळे या कराराला विशेष महत्व आहे. सध्या भारत आंतराष्ट्रीय पातळीवर यांसारखे विविध करार करत आहे, त्याची वेळोवेळी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेलच तूर्तास इतकेच.नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?