कोल्हापूर,सोलापूर दोन टोके

       

  काही महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. मी सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये  गेलो होतो. सोलापूर आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील कर्नाटकला लागून असणारे जिल्हे आहेत. कर्नाटकमधील मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हे जिल्हे सिमा शेअर करतात. सोलापूर जिल्हा कर्नाटकच्या मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हैद्राबाद कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर सीमा शेअर करतो. मी दोही शहरांमध्ये प्रत्येकी तीन चार दिवस मुक्काम केला. या दरम्यान मला जाणवलेले घटक आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन
                कोल्हापूरपासून कागलच्या दिशेने25 किमी गेल्यावर कर्नाटक राज्य सुरु होते. मात्र कोल्हापूरमध्ये सर्वत्र मराठीचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. नाशिक किंवा पुण्यात फिरतोय असा भास व्हावा इतके मराठीमय वातावरण या ठिकाणी जाणवते.मी भूगोलाच्या मानवी भूगोल या शाखेचा विद्यार्थी आहे.  त्यावेळी अभ्यासताना मिळालेल्या ज्ञानानुसार सांगतोय. कोणत्याही प्रकारचा मानवी समुह हा बटण दाबल्यावर ज्याप्रकारे लाइट लागतो, अथवा बंद होतो, त्याप्रकारे एखादा विभाग संपला म्हणून व्यक्तीसमुह दिसायचा थांबत नाही. व्यक्तीसमुहातील बदल हे हळूहळू होत असतात. सीमावर्ती भागापासून दुरवर हे बदल जाणवतील इतके बदल मोठे होतात. कोल्हापूरमध्ये मला कन्नडचा क कुठे ऐकू आला नाही. नाशिकमध्ये ज्या प्रमाणे गुजराती पाट्या दिसतात , तस्याही पाट्या दिसल्या नाहीत.मी अद्याप बेळगावला  गेलोले नाही. मात्र मला मानवी भुगोलाचा अभ्यास करताना मिळालेल्या ज्ञानाचा विचार करता सीमेचा पलीकडे सुद्धा असीच स्थिती असेल असो. 

           कोल्हापूरच्या विरुद्धस्थिती सोलापूर येथे आढळली. सोलापूर शहरात फिरताना कन्नडचा प्रभाव जागोजागी आढळतो. सोलापूर शहरात जागोजागी कन्नड भाषेत लिहलेल्या पाट्या दिसतात. सोलापूर शहरात फिरताना आपण एका बहूभाषिक प्रदेशात वावरत आहोत, याचा जागोजागी प्रत्यय येतो. शहरात फिरताना जागोजागी लोक कन्नड मध्ये बोलताना दिसतात. किलोमीटरचा विचार करता कोल्हापूरपेक्षा सोलापूर महाराष्ट्र कर्नाटक सीमेपासून लांब आहे, हे आपण विसरता कामा नये. सोलापूरमध्ये वृत्तपत्राच्या स्टाँलवर मराठी इतकीच कन्नड भाषेतील दैनिके मला आढळली.कोल्हापूरमध्ये मला एकही कन्नड भाषिक दैनिक आढळले नव्हते. ही बाब सुद्धा विचारत घेण्यासारखी आहे. 
   कोल्हापूरपेक्षा सोलापूरचे हवामान अधिक कोरडे आहे, असे मला जाणवले .खाण्याचा बाबतीत दोन्ही शहरे उत्तमच आहेत. सोलापूरची चटणी आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा दोन्ही चविष्टच पदार्थ आहे. पर्यटन स्थळाचा विचार करता सोलापूर पेक्षा कोल्हापूर अधिक उत्तम आहे. कोल्हापूर शहरासह लगत अनेक पर्यटन स्थळे आहेत. जसे पन्हाळा,ज्योतिबा वगैरे या उलट  स्थिती सोलापूर शहराची आहे. असो.(माझा कोणत्याही शहरवासीयांचा भावना दुखवायचा विचार नाही.)
कोल्हापूर सोलापूर या शहरांचे महाराष्ट्रातील योगदान विसरता येण्यासारखे नाही. एक महाराष्ट्राचा समाजसुधारणेचा वारसा सांगतेय , तर दुसरे क्रांतीकारकांचा वारसा सांगतेय.
मी अनेकदा फिरतो, त्या त्या वेळी मला जाणवलेल्या गोष्टी आपणापर्यत पोहोचवेलच , तूर्तास इतकेच, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?