दाटुन आले मळभ !


      महाराष्ट्र भारताच्या 27 राज्यांपैकी क्षेत्रफळाने 3ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य . देशाला अनेक बाबतीत दिशाग्दर्शन करणारे, समाजसुधारणेचा मोठा वारसा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष 2020-21चा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवार 5 मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळासमोर मांडण्यात आला. आपल्या संसदीय प्रणालीनूसार अर्थसंकल्पाचा आदल्या दिवशी तो मांडण्यात येतो. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 8 मार्च रोजी मांडण्यात येणार आहे. मात्र शनिवार आणि रविवार या दिवशी विधीमंडळाला विश्रांती असल्याने तो शुक्रवारी सादर करण्यात आला .
    महिला आणि बालकांवरील अत्याचारात घट,  शेती क्षेत्रातील उत्पादनाच्या वाढीचा दर 11.7 % या जमेच्या बाजू वगळता, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र , बांधकाम, निर्मिती,उपहारगृह,दळणवळण व्यापर या क्षेत्रातील मागच्या आर्थिक वर्षातील निराशात्मक कामगिरी या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आली आहे. वीजेचा वापराचा विचार करायचा झाल्यास कृषी पंपासाठी वीजेची मागणी वाढल्याचे तर औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातील वीजेची मागणी कमी झाल्याचे या आर्थिक पाहणी अहवालात नमुद केले आहे. महाराष्ट्रात सन 2019-20पेक्षा 2020-21 या आर्थिक वर्षात आस्थापना खर्चात 7% वाढ होवून तो 53% झाल्याचे तसेच एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत देशात झालेल्या परदेशी गुंतवणूपैंकी 27% गुंतवणूक महाराष्ट्र झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आले आहे.राज्याच्या कर्जाचे प्रमाण जिडिपीच्या  निर्धारीत मर्यादेपेक्षा कमी आहे. ही बाब सुखावून टाकणारी आहे. केंद्र सरकारच्या निर्षकांनुसार हे प्रमाण कमाल 25% निर्धारीत करण्यात आले आहे. जे सध्या 19.6% आहे.

 
आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प ही निव्वळ आकडेवारी नसते. आपल्या रोजच्या आयुष्यावर खोलवर परीणाम करणारी माहिती असते ती, यातील अर्थसंकल्पावर अनेक लोक मोठ मोठी भाष्ये करतात..तूलनेने आर्थिक पाहणी अहवालावर फारच कमी कथ्याकुट केला जातो असे माझे निरीक्षण आहे. मात्र अर्थसंकल्पाचा पाया म्हणून आर्थिक पाहणी अहवालाकडे बघता येते.  त्याविषयी माहिती देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न होता.( मी या लेखात जाणूनबुजून आकडेवारी कमी दिलेली आहे. कारण आकडेवारीमुळे लोक या विषयाकडे बघत नाही. असे मला वाटते) जो आपणास आवडला असेल, असे मनोमनी मानून सध्यापुरती आपली रजा घेतो, नमस्कार.
(या लेखासाठी दैनिक लोकसत्ता आणि दैनिक  मुंबई तरुण भारत या दैनिकांची मदत घेण्यात आली आहे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?