प्रवाश्यांचा सेवेसाठी की त्रासासाठी महाराष्ट्राची एसटी ?

         


 आपल्या महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाचे बोधवाक्य आहे "प्रवाश्यांचा सेवेसाठी, रस्ता इथे एसटी " . मी एसटी मार्फत आवडेल तिथे प्रवास, तसेच पूर्वी चालू असणाऱ्या 200 रुपये भरा आणि वर्षभर एसटीच्या प्रवाश्यात 10% सूट मिळावा अश्या अनेक अनेक सवलतींचा फायदा घेत खूप फिरलो आहे . मात्र आज मला आलेला अनुभव या आधी कधीच आलेला नाही . अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात . तसाच हा अनुभव असल्याने मी या विषयी संबंधितांचा विरुद्ध तक्रार करणार नाही . 

         तर मित्रानो नाशिकहून  200 किमी अंतरावर  असलेल्या ठिकाणी जाणाऱ्या बसेसमध्ये मी  नाशिकपासून 40  किमी अंतरावर असणाऱ्या ठिकाणी  जाण्यासाठी  चढलो . मी बसमध्ये  ती  नाशिकच्या ठक्कर बसस्थानकामध्ये फलाटावर असताना चढलो . मी चढलो तेव्हा बसमध्ये वाहक अथवा चालक नव्हते . वाहक गाडी बस्थानकातून बाहेर पडत असताना बसमध्ये आले बस  जवळपास नाशिकच्या बाहेर आली तरी वाहक तिकीट काढण्यासाठी न आल्याने मी स्वतः त्याच्या जवळ गेलो असता त्यांनी याठिकाणी बस थांबणार नसल्याचे सांगून नाशिकच्या बाहेर उतरण्यास सांगितले . मी त्याना गावात गाडी घेतली नाही तरी चालेल फाट्यावर सोडले तरी चालेल असे सांगितले . त्यावरही ते तयार झाले नाही . आणि मला भर रस्त्यात उतरवले . त्या वेळेस  गाडी जवळपास 60%  रिकामी होती . याबाबत मी नंतर एसटीच्या निवृत्त अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित गावामध्ये विनावाहक गाड्या सोडून सर्व प्रकारच्या गाडयांना सक्तीचा थांबा असल्याचे सांगितले . मी ज्या बसमधून जात होतो ती गाडी लालपरी प्रकारची वाहक असणारी होती तसेच अनेकांना त्या रस्त्यावर अशाच अनुभव आल्याचे नंतर समजले असो 


       एकीकडे एसटी महामंडळ तोट्यात आहे,  म्हणून धोशा लावायचा,  मात्र दुसरीकडे प्रवाश्याना नको तो एसटी प्रवास असे वागायचे  हे कसेकाय ? मी नाशिक  प्रवाश्यासाठी अनेकदा नॉर्थ ईस्ट कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसचा वापर केला आहे  त्यांचे वागणे खूपच प्रवासीभिमुख असते .  जर तुम्ही प्रवाश्याना चांगली सेवा न  दिल्याने . प्रवाशी खाजगी सेवेकडे वळल्यास त्यासाठी खाजगी वाहतूकदार जवाबदार कसे काय ?  मी संबंधित बस मध्ये शिरण्या आधी बस स्थानकांवर उभ्या असलेल्या दोन बसेसच्या दरवाज्याजवळ उभ्या  वाहकांकडे चौकशी केली असता त्यांनी गावात बस थांबत नसल्याचे सांगितले होते . जर लोक जाण्यास इच्छुक असून देखील आपण जर बस गावात नेणार असलो  तर रिकाम्या बस चालवून होणाऱ्या तोट्यास आपणच  जवावाबदार आहोत त्यासाठी अन्य लोकांना जवाबदार धरण्यास अर्थ नाही याची जाण एसटी प्रशासनास येणे अत्यावश्यक आहे  पळसाला पाने तीनच अथवा घरोघरी मातीच्या चुली  या न्यायाने  अनेकांना एसटीच्या वाहाकांचा विदारक अनुभव आल्याने जर ते प्रवाशी अन्य साधनांकडे वळल्यास तेच जवाबदार आहेत 

माझा सारखा अनुभव अन्य कोणाला न देण्याची सुबुद्धी एसटी प्रशासनाला येवो अशी मनोकामना व्यक्त करून सध्यापुरते थांबतो ,नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?