एकमेका साह्य करु

"

एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ", असे आपणाकडे सुप्रसिद्ध वचन आहे. मानवाने एकमेकांना मदत केल्यास सगळ्यांची प्रगती होते, असा या वचनाचा अर्थ आहे. हे वचन ऐकायला खुप छान वाटत असले, तरी आपल्या भारतीयांचे वागणे तसे नाहीये, असा निष्कर्ष एका जागतिक अहवालातून स्पष्ट होत आहे . 
तर मित्रांनो,  युनाटेड नेशनच्या एका सहयोगी संस्थेमार्फत 20 मार्च 2021रोजी 7 निष्कर्षाचा आधारे जगातील आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली. या 7 निष्कर्षांपैकी एक निष्कर्ष होता, त्या देशातील नागरीकांना ते वैयक्तिक अडचणीत असताना स्वतःच्या मित्राकडून अथवा नातेवाइकांकडून मदत मिळेल याबाबत किती खात्री आहे. नागरीकांना या बाबत 0 ते 10 या मोजपट्टीवर गुण देयचे होते.0 गुण म्हणजे काहीच मदत मिळत नाही. 10 म्हणजे खुप खात्री आहे. या स्केलवर भारताचे प्रदर्शन खुप खुप वाइट आहे. 156 देशांच्या यादीमध्ये भारताचा या निकर्षावर  क्रमांक आहे 152 . {अहवालामध्ये प्रत्येक निकर्षावर आधारीत देशांची स्वतंत्र यादी देण्यात आली आहे} उरलेल्या 4 देशांमध्ये व्हेनुझ्युउला, हैती, दक्षीण सुदान , अफगाणिस्तान हे देश आहे. म्हणजेच आपण बघू शकता की, हे देश विविध समस्येने ग्रस्त आहेत. आपला भारत तेव्हढा समस्याग्रस्त नाही.

 
हे निरीक्षण भारतातील सुमारे 10 हजार लोकांना प्रश्न विचारुन करण्यात आले आहे. हे जागतीक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांमार्फत करण्यात आले असल्याने या सर्वेक्षणात सर्व आर्थिक स्तरावरील तसेच विविध सामाजिक स्तरातील व्यक्तींचा योग्य प्रमाणात समावेश करण्यात आला आहे, असे समजणे योग्यच मानायला हवे. मात्र  भारताच्या एकुण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण पुरेसे नाही, असे मला वाटते. तसेपण हा प्रश्न वैयक्तिक स्तरावरचा असल्याने व्यक्तींचा मताचा प्रभाव  यामध्ये पडलेला असू शकतो. आणि याला पुष्टी देण्यासाठी इतर प्रश्नांची यादी बघता येवू शकते. ज्यामध्ये तूमच्या देशातील सरकारे किती भष्ट आहेत? या प्रश्नावर बल्गेरीया, पोलंड हे देश अनुक्रमे सर्वात जास्त भष्ट्र असल्याचे मत तेथील नागरीकांनी व्यक्त केले आहे.
आपल्याकडे अनेक जागतिक अहवालाच्या संदर्भात कोल्ह्याला द्राक्षे आंबट  या न्यायाने भारताचे अयोग्य पद्धतीने परीक्षण झाल्याचा राग आळवला जातो. तसाच या बाबतही आळवला जावू शकतो. कारण या अहवालामध्ये 2015पासून भारताला  सातत्याने कमी कमी गुण मिळत आहेत. तसेच भारताचे स्थान सातत्याने तळाकडे घसरत आहे. मात्र एखाद्याने भारतावर केलेली टिका अनाथायी समजायची की , आत्मपरीक्षण करायची संधी समजायची ? हा प्रश्न प्रशासनाने सोडवायला हवा.तो प्रश्न प्रशासन योग्य परीस्थितीने सोडवेल,असी आशा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो  ,नमस्कार.त्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?