चित्रपटश्रुष्टीचे काळे सत्य मांडणारा चित्रपट ,कागज के फुल!


कालचीच गोष्ट आहे,सध्याचा महाराष्ट्राचा राजकारणाविषयी मित्राशी बोलताना जब्बार पटेल यांनी निर्मिती केलेल्या आणि मात्तबर अभिनेत्यांचा अभियननाने सजलेल्या  सिंहासनाचा विषय निघाला .आमचे बोलणे नंंतर थांबले, माझे मन मात्र वास्तवदर्शी चित्रपटाचा विषयी विचार करण्यात गढून गेले . आपल्या चित्रपटश्रुष्टीत वास्तवदर्शी चित्रपटांची मोठी संख्या आहे. सध्या अस्या चित्रपटांची संख्या वाढलेली दिसत असली, तरी वास्तवदर्शी चित्रपटांचा यादीत  कृष्णधवल काळातील चित्रपट असलेल्या "कागज के फुल" या चित्रपटाचा समावेश करावाच लागेल. किंबहूना गुरुदत्त  फिल्म प्राडक्शनची निर्मिती असलेल्या "कागज के  फुल " या चित्रपटाचा समावेश केल्याशिवाय ही यादी पुर्ण होवूच शकत नाही.
एखादा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक सातत्याने यशस्वी चित्रपट देत असताना चित्रपटश्रुष्टी त्याचाशी किती अबदीने वागते, मात्र एखादा अयशस्वी चित्रपट त्याचा हातातून घडल्यावर एकेकाळी डोक्यावर घेणारी चित्रपट श्रुष्टी त्याचाशी किती तूसडेपणाने वागते. एकेकाळचा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक चित्रपटातील छोट्याशा भुमिकेसाठी कसा नागावला जातो. त्याने स्वतःच्या अनुभवातून दिलेले सल्ले कसे धुडकावले जातात . त्यास इतकी अपमानास्पद वागणूक दिली जाते की, कालांतराने त्याची खरी ओळख इतरांना पटल्यावर देखील तो ती नाकारतो, आणि ओळख देणाऱ्या लोकांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो.हे बघण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.
आपल्या चित्रपटश्रुष्टीत मधूर भांडरकर जसे वास्तवदर्शी चित्रपट काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे या चित्रपटात मुख्य भुमिकेत असणारे गुरुदत्त या टोपण नावाने विख्यात असणारे वसंतकुमार शिवशंकर पदुकोन विख्यात आहे. आपल्या चित्रपटश्रुष्टीत अनेक बाबी उघड करणारे चित्रपट या आधी झाले आहेत. मात्र हे करण्यासाठी  जे माध्यम वापरले गेले आहे, त्या चित्रपटश्रुष्टीचे दाहक वास्तव पुढे आणणारे चित्रपट फारच मोजके आहेत, "जसे मैं माधूरी दिक्षीत बनना चाहती हुं!" त्यातीलच एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे बघता येवू शकते. 

    चित्रपटश्रुष्टीचे भिषण वास्तव रुपेरी पडद्यावर कलात्मक रंजकतेने साकरणाऱ्या या चित्रपटाचे महत्व इथेच संपत नाही. या चित्रपटात कँमेराचा केला गेलेला वापरसुद्धा खुपच उत्तम पद्धतीने केला गेला आहे. तोही आजपासून सुमारे 60 वर्षापुर्वी कँमेराचे तंत्र फारसे विकसित नसताना ब्लँक अँड व्हाइटचा काळात सावल्यांचा खुबीने वापर केलेला यात आढळतो मी हा चित्रपट अनेकदा बघीतला आहे, माझ्यामते ज्याला फोटोग्राफी शिकायची आहेत, अस्या व्यक्तींसाठी आज 2021साली देखील हा चित्रपट महत्त्वाचा ठरू शकतो. तसे वसंतकुमार शिवशंकर पदूकोन अर्थात गुरुदत्त यांचे सर्वच चित्रपट एकाहून एक उत्तम होते. हा लेख वाचणाऱ्यांनी त्याचा एक तरी चित्रपट बघावाच. मराठीतील ज्येष्ठ लेखक  पु. ल. देशपांडे यांनी उभा केलेल्या  बेळगावच्या रावसाहेब या व्यक्तीच्या भाषेत बोलायचे झाल्यास गुरुदत्त यांच्या सारखा एकतरी चित्रपट तयार करुन दाखवा छातीत धस्य होते की नाही ते बघा , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मग बघताय ना ? हे चित्रपट!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?