प्यासा, एक उत्कृष्ट चित्रपट !


कालच्या माझ्या "कागज के फुल " या चित्रपटावर मला तूझ्या आवडत्या चित्रपटावर लिही ना ? आम्हाला तूझा आवडत्या चित्रपटाविषयी वाचायला आवडेल असा अभिप्राय आल्याने माझ्या आवडत्या चित्रपटाविषयी  सांगण्यासाठी आजचे लेखन 
तर माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे,  ज्येष्ठ सिने निर्माते, सिनेदिग्दर्शक ,अभिनेते, नृत्य दिग्दर्शक वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरुदत्त यांची प्रमुख भुमिका असणारा चित्रपट ज्याला टाइम्स मँगझीनतर्फे वीसव्या शतकातील सर्वात उत्तम 50 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले आहे, असा कृष्णधवल चित्रपट "प्यासा".
अत्यंत जवळचे लोकसुद्धा आपल्याला आपल्याकडे किती पैसा आहे, यावरुनच आपले मुल्यमापन करतात. गुणांकडे दुर्लक्ष करतात  मात्र आपल्या गुणांमुळे आपल्याला जर भविष्यात पैसा मिळाला ,आपला गौरव झाला तर आपल्या कष्टाच्या, धडपडीच्या वेळी  आपल्याला त्रास, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्ती, आम्हीच त्याला त्याचा धडपडीच्या काळात कसी मदत केली, याविषयी खोटे का असेना जगाला सांगतात. हा संदेश या चित्रपटातून सहजतेने देण्यात आला आहे. " सुखके साथी सब , दुखमे मे ना कोई" हा हे संतवचन आपणास हा चित्रपट बघताना सातत्याने आठवते.

.       आपण एखादया कलाकृतीला झिडकारले,  मात्र त्यानंतर त्याच कलाकृतीला जगमान्यता मिळाल्यावर त्याविषयी आपली मुळात नसलेली आपुलकी दाखवणे. इत्यादी रोजच्या आयुष्यात जगताना नेहमी सामोरे जावे लागणाऱ्या प्रसंगावर या चित्रपटातून मार्मिक भाष्य करण्यात आले आहे.
रक्ताचा नात्यापेक्षा भावनेने जोडलेली नाती अधिक उपयुक्त पडु शकतात. हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. मानवी मन प्रेमापेक्षा सोइसवलतीत , आरामात कसे राहण्यासाठी कसे अधिक प्राधान्य देते. संपत्ती आणि दुसऱ्या विषयी ममत्व, आस्था असणे या दोन्ही बाबी पुर्णतः भिन्न बाबी आहेत. संपत्ती अधिक असली तरी आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा दुःःखात आपण सहभागी होवूच  हे शक्य  नाही  किंवा संपत्ती नसली तरी एखाद्याचा दुःखात त्याला आधार देण्याची भुमिका आपण बजावू शकतो, हे या चित्रपटातून सांगण्यात आले आहे.
चित्रपटाचे कथानक बंगालच्या पार्श्वभुमीवर आकाराला येते.एक अप्रतिम काव्यरचना करणारा मात्र निर्धन असलेला कवी हा चित्रपटाचा नायक. स्वतःच्या काव्यनिर्मितीचा जगात रममाण असलेल्या भावाचा पदोपदी अपमान करणारे भाउ, नायकाची प्रेयसी जीने महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यावर कोलकत्यातील धनाढ्य व्यवसाइकाशी लग्न केले असते. तसेच एक तेलमालीश करुन पोट भरणारा तेलवाला , नायकाला त्याचा अडचणीच्या काळात मदत करणारी गणिका  ही या चित्रपटातील प्रमुख पात्रे, 
नायकाच्या घरी नायकाचा नेहमी होणाऱ्या अपमानाला कंटाळून नायक रेल्वेखाली आत्महत्या करायला निघतो, मरतानाचा शेवटचे पुण्यकर्म म्हणून आपला कोट एका भिकाऱ्याला देतो, रेल्वे अचानक तीचा मार्ग बदलते, ज्यामुळे भिकारी मरतो, तर रेल्वेचा फटका लागून नायकाची स्मृती जाते, पण तो वाचतो. मात्र कोटामुळे सर्वजण नायक मेला असेच समजतात. मात्र   , इकडे ,नायकाच्या कलाकृती मोठ्या संख्येने प्रसिद्ध होतात .एका मनोरुग्णालयात  त्याला आपली रचना गुणगुणतांना आढळल्याने त्याची स्मृती परत येते. मात्र त्याचे भाउ त्याला ओळखण्यास नकार देतात. जगासाठी नायकाचा मृत्य झाल्याने नायकाच्या कलाकृती ची राँयल्टी त्याचे भाउ घेतात. नायकाला त्याचा कलाकृतीचे पैसे मिळतात का? नायिकाची प्रेयसी, त्याचा अडचणीचा काळी त्याला मदत करणारी वारांगणा त्याला मदत करते का? अन्य कोण कोण त्याला कस्या प्रकारे साह्य करतात. त्याचा प्रथम वर्षश्राद्धाला त्याचे आप्तेष्ठ कस्या प्रकारे सामोरे जातात. आपला प्रेमी जिवंत असल्यावर त्याचा प्रेयसीची अवस्था काय होते.हे समजण्यासाठी हा चित्रपट बघावाच.
भारतीय चित्रपटश्रुष्टीचा विचार करता गुणवत्तेचे दूसरे नाव असलेल्या  वसंतकुमार शिवशंकर पदूकोन अर्थात गुरुदत्त यांची निर्मिती  असल्यामुळे चित्रपट सर्वच बाबतीत सरस आहे. मुळची तेलगू भाषिक अभिनेत्री असणाऱ्या वहिदा रेहमान यांच्या हा पहिला चित्रपट . चित्रपटात त्यांनी गणिका(वारांगणा ){वेश्याची} ही भुमीका साकारली आहे. 
किमान एकदा तरी बघावा, असा हा चित्रपट आहे.मी बघीतला तसा तूम्हालाही तो आवडेल ,अशी कल्पना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?