मराठीतील वास्तवदर्शी चित्रपट


काही दिवसापुर्वी मी हिंदीतील वास्तवदर्शी चित्रपटाविषयी लिहले होते. त्यावेळेस माझ्या एका वाचकाने हिंदीपेक्षा मराठीत वास्तवदर्शी चित्रपट अधिक असल्याचे माझ्या लक्षात आणून दिले. आणि ते खरेही आहे ना ! मराठीत दहावी फ, सामना, सिंहासन ,सरकारनामा, झेंडा, कायद्याचे बोला, गोष्ट छोटी डोंगराएव्हढी, देवराई, सैराट अस्या एकाहून एक सरस वास्तवदर्शी चित्रपटांनी मराठी चित्रपटश्रुष्टी सजल्याचे आपणास वरवर बघीतले तरी सहजतेने लक्षात येते.
स्किझोफेनिया सारखा गंभीर मानसिक आजार, शेतकरी आत्महत्या, राजकारणी आणि बिल्डर यांचे सबंध, सहकारी क्षेत्र , तसेच विधीमंडळातील राजकारण , शैक्षणिक समस्या, जातीय वातावरण, न्यायव्यवस्था  मानवी जीवनातील सर्वच.क्षेत्रांवर मराठीत वास्तवदर्शी  चित्रपट निघाले आहेत. मी वर  उल्लेखलेले चित्रपट हे मुख्य धारेतील चित्रपट आहेत. प्रयोगशील, समांतर धारेतील चित्रपट, तसेच विविध महोत्सवात प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटांचा विचार करता , ही संख्या याहून कितीतरी मोठी होइल, हे नक्की.
नूकत्याच जाहिर झालेल्या चित्रपट पुरस्काराने यावर सोनेरी मोहरच उमटवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरायला नको.
मी पुण्यात असताना ज्या मेसमध्ये जेवायला जात असे .त्या ठिकाणी टिव्हीवर गुजराती चित्रपट लागलेले असत. भाषा काहीसी अपरीचित असली तरी आशय सहजतेने समजत असे. मी त्या वेळेस बघीतलेले गुजराती चित्रपट काहीसे भडक होते. आपल्याकडे काही दिवसापुर्वी तमाशा चित्रपट किंवा हिंदीचा विचार करता विद्रोही नायकाच्या कथेवर आधारीत असे .त्यापेक्षा ते वेगळे नव्हते. त्या वाहिनीवर दाखवण्यात येणारे चित्रपट हे रंगीत असले तरी जूने  1980 ते1990 च्या दरम्यान चित्रीत झालेले आहेत की नुकतेच प्रदर्शीत झालेले आहेत, हे कळायला मार्गच नव्हता. असो.

मराठी चित्रपटाश्रुष्टीतील वास्तवदर्शी चित्रपटांचा विचार करता ,सध्या अनेक वास्तवदर्शी चित्रपट निर्माण 
होत असले तरी याची सुरवात जब्बार पटेल यांचा सिंहासन , सामना या चित्रपटांपासून झाली, हे नाकरण्यात काही अर्थ नाही. सिंहासन हा चित्रपट तयार होवून चाळीस वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र आज देखील तेव्हढाच वास्तवदर्शी आहे. सरकारनामा हा सिंहासन, सामना च्या तूलनेत अलीकडचा चित्रपट मात्र राजकारणी आणि बिल्डर यांच्या सबंधावर खुपच प्रकाश टाकतो. शाळेतील मठ्ठ मुलांचे भावविश्व उलगडून सांगतो तो दहावी चित्रपट, शेतकऱ्यांचे दैन्य आणि न्यायव्यवस्थेचा दुरावस्थेबाबत मकरंद अनासपुरे यांचे गोष्ट छोटी डोंगराएव्हढी आणि कायद्याचे बोला हा चित्रपट भाष्य करतो.  याच मालिकेतील  चित्रपट म्हणून फँंड्री , सैराट या चित्रपटांचा विचार करता येतो, हे दोन्ही चित्रपट जाती व्यवस्थेचे विदारक चित्र पुढे करतात. देउळ हा चित्रपट एका वादगस्त मात्र ज्वलंत विषयावर भाष्य करतो.
मराठी चित्रपटांचा विचार करता ही यादी आणखी कितीही लांबवता येवू शकते. आपल्या मराठीची थोरवी ही मोठीच आहे. भारतात फक्त चित्रपटश्रुष्टीच नव्हे तर अनेक महिलांचा विकासाच्या, शैक्षणिकदृष्ट्या विकासाच्या, समाजोपयागाचा, प्रशासनातील सुधारणेच्या योजनांचा उगम हा महाराष्ट्रात झाला, नंतर तो समस्त भारतात अंमलात आणला गेला. या महाराष्ट्रीयन लोकांची भाषा म्हणून मराठी ओळखली जाते. या अश्या मराठीमध्ये यासारखे समाजोपयोगी, वास्तवदर्शी चित्रपट सातत्याने येवो, असी मनोकामना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?