बातम्यांमधील चीन (भाग 5)

 

मी आपणासी बोलत असताना, आजमितीस आपल्या भारताचा अशांत प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या , ज्या भागासाठी आपल्या संविधानात 6वे परीशिष्ठ अंतर्भुत करण्यात आले त्या इशान्य भारतातील मणीपुर, मिझोराम, नागालँड या राज्यांबरोबर सीमा शेअर करणाऱ्या म्यानमार या देशात सध्या राजकीय अस्थिरतेने , आंदोलकांनी कळस गाठला आहे. ज्यामुळे या देशाची फाळणी होते की काय ?अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अराजकतेची सुरवात ज्या लष्करी उठावापासून झाली, त्याला चीनचा पाठिंबा आहे, असी तेथील जनसामन्याची भावना आहे. त्यामुळे चीनविरोधी भावना तीव्र आहे. चीनने हा म्यानमारचा अंतर्गत प्नश्न आहे, आमच्या या बाबीसी काहीसी सबंध नाही, असे जाहिर केले आहे. चीनला इंधनपुरवठा करण्यासाठी इंधनवाहक पाइपलाइन  या देशातून जातात. या देशातील आंदोलकांनी या पाइपलाइन तोडून चीनचा इंधन पुरवठा तोडून टाकण्याची भाषा केली आहे. जर आमच्या दैन्यावस्थेला जवाबदार असणारा लष्करी उठाव आमच्या देशातील अंतर्गत गोष्ट असेल तर आम्ही तोडलेल्या पाइपलाइनसुद्धा आमचा अंतर्गत मुद्दा म्हणायला हवा, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. आपल्या देशाला इंधनपुरवठा  करणाऱ्या पाइपलाइनल आंदोलक खरेच तोडणार तर नाही ना या भीतीने चीनने आपले लष्कर या भागात तैनात केले आहे. जवळपास 4 हजार किलोमीटरची सीमा रेषा असणाऱ्या चीन म्यानमार या सीमेपासून जवळच भारताचा अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे.
म्यानमारमधील काही आंदोलक भारताच्या मिझोराम या राज्यात शिरल्याचे आणि स्थानिक भारतीयांनी त्याचे स्वागत केल्याचे  वृत्त द हिंदूने दिले आहे.(तसेच काही लोक शेजारील थायलंड मध्ये शिरल्याचे वृत्त बिबिसीने दिले आहे) चीन म्यानमार या सीमेजवळच चीनचे  जगातील सर्वात मोठा जलसाठा असणारे  ग्राजेस हे धरण चीन बांधत आहे.

म्यानमार आणि चीनमधील जनसमुदायामध्ये वंश,संस्कृती, भाषा, खाद्यप्रकार याबाबत खुपच मोठ्या प्रमाणात साम्य आहे. म्यानमार आणि चीनी जनसमुदायात रोटीबेटीचे व्यवहार आहेत असे असून देखील म्यानमारमध्ये प्रचंड प्रमाणात चीनविरोधी आक्रोस आहे., हे आपण लक्षात घेतले पाहिजे .
चीनच्या प्रगतीमध्ये मुळचे आखाती देशातील मात्र तेथून जहाजाद्वारे म्यानमार मध्ये आणले गेलेल्या आणि तेथून पाइपलाइनद्वारा चीनमध्ये आणण्यात आलेल्या इंधनाचा मोठा वाटा आहे. जगाच्या व्यापार मार्गाचा विचार करता आखाती देशातून समुद्री मार्गे इंधन आणायचे झाल्यास आपली जहाजे इंडोनेशिया, आँस्ट्रोलीया , भारताचे नाविक दल सहजतेने अडवू शकतात, असी भिती चीनला असल्याने चीनने हे मार्ग बांधले होते . 
गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बातम्या बघीतल्या तर दर दोन ते तीन दिवसांनी चीनबाबत एखादी बातमी असेतच. आपल्या भारताचा मुख्य शत्रू असणाऱ्या चीनबाबत मी वेळोवेळी सांगेलच , तूर्तास इतकेच, नमस्कार
(या लेखासाठी द हिंदू या दैनिकाच्या आणि बिबिसी वरील बातम्यांची मदत घेण्यात आली आहे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?