बातमीतील खगोलशास्त्र


आपल्या भारतात 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधी मंडळाच्या निवडणूकीमुळे  भारत आणि महाराष्ट्र कोरोना रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्र  ढवळून निघत असताना खगोलशास्त्रामध्ये दोन मोठे शोध लागल्यामुळे ते सुद्धा ढयावळून निघत आहे. मात्र आपली मराठी माध्यमांमध्ये या विषयी खुपच कमी माहिती मला दिसल्याने त्याविषयी माहिती सांगण्यासाठी आजचे लेखन 
       तर मित्रांनो, नुकतेच अमेरीकन संशोधन संस्था अर्थात नासाने  अँफोफेस नावाचा लघूग्रह पुढील किमान 100 वर्षे तरी पृथ्वीवर आदळणार नसल्याचे जाहिर केले आहे. सन 2004पासून पृथ्वीला धडकू शकणाऱ्या लघूग्रहांचा यादीत सातत्याने चर्चेत राहणाऱ्या या लघूग्रहाचे नाव प्राचीन इजिप्तच्या  संस्कृतीतील अराज्यकतेचा देवावरुन अँफोफेस असे ठेवले आहे.
(याला god of ghose अर्थात अराज्यकतेचा देव असे टोपणनाव देखील आहे.) हा पृथ्वीवर आदळल्यास अराज्यकता पसरु शकते (प्रचंड विध्वंस होवू शकतो) असे समजून याचे नामकरण असे करण्यात आले आहे. याचा आकार 340 मीटर इतका आहे. खगोलशास्त्रज्ञांचा मते डायनाँसोर यांच्या विध्वंस झाला तसा विध्वंस होण्यासाठी एक किलोमीटरच्या लघूग्रहाची पृथ्वीबरोबर टक्कर व्हायला हवी. ते बघता स्थानिक प्रकारची हानी या लघूग्रहाच्या टक्करीतून होवू शकते असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या लघूग्रहाची टक्कर झाल्यास लोणार सारखे विवर तयार होवू शकते असे आपण म्हणू शकतो. हा लघूग्रह near to earth या कक्षेत फिरणारा लघूग्रह आहे. ( आपल्या सौरमालीकेत near to earth या कक्षेखेरीज लघूग्रह पट्टा {मंगळ ते गुरु }आणि गुरुच्या कक्षेत लघूग्रह प्रामुख्याने फिरतात ) सन 2029 साली हा लघूग्रह पृथ्वी ते चंद्र यातील अंतराच्या एक दशांश अंतरावरुन म्हणजे 32 हजार किमीवरुन सुर्याभोवती प्रदक्षीणा मारणार आहे. त्यानंतर 2036 आणि 2068 हा लघूग्रह पृथ्वीसमीप येणार आहे. या तिन्ही वेळेस तो आणि पृथ्वीची टक्कर होणार नाही, असे शास्त्रज्ञांनी जाहिर केले आहे.

आता बघूया दूसरी घडामोड. तर भारतीय वंशाचे मात्र अमेरीकी नागरीक असणारे नोबेल पदक विजेते खगोलशास्त्रज्ञ म्हणून सुब्रह्मम चंद्रशेखर विख्यात आहेत. त्यांच्या नावे नासाची चंद्रा नावाची दुर्बिण आहे. जी   रेडिओ लहरीचा अभ्यास करते. या चंद्रा दुर्बिणीच्या आधारे युरेनस या ग्रहाबाबत नविन माहिती समोर  आली आहे. ज्या निरीक्षणाच्या आधारे ही माहिती समोर आली आहे, ती निरीक्षणे 2004 आणि 2012 साली करण्यात आली होती. या निरीक्षणाचे विश्लेषण करण्याचे काम आतापर्यत चालू होते.ते पुर्ण झाल्यावर हे निष्कर्ष जाहिर करण्यात आले आहे. तर या निरीक्षणा आधारे असे जाहिर करण्यात आले आहे, की युरेनसच्या कड्यातून{ आपल्याकडे शनीची कडी खुप प्रसिद्ध आहे, मात्र शनीसारखीच कडी गुरु, युरेनस ,नेपच्युन या गँस जायंट ग्रहांना आहे} एक्स रे कणांचे (प्रकाशाच्या अनेक  प्रकारापैकी मानवी डोळ्याला न दिसणारा प्रकार )उत्सर्जन होते. या एक्स रे चे कारण समजले तर श्वेतबटु ,[white draft], कृष्णविवर ,[black hole ],या सारख्या अनेक गोष्टींची उकल होवू शकते. या बाबत विविध शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामध्ये सोलर विंड आणि वातावरणाचे घर्षण , तसेच युरेनसच्या कड्यावर काही भारीत कण [charged particle ] आदळत असल्याने होत असावे या शक्यता प्रमुख आहे. 【तसेही युरेनसचे सुर्याभोवतीचे फिरणे खुप वेगळे आहेच】असो
 खगोलशास्त्र खुप रंजक आहे. यातील रंजकता मी वेळोवेळी तूम्हाला सांगेलच. तूर्तास इतकेच , नमस्कार .
【या लेखासाठी द हिंदू या भारतीय मात्र  बहुसंख्यांसाठी परदेशी वाटणाऱ्या दैनिकाची मदत घेतली आहे】

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?