पाक रशिया संरक्षण करार

 

 पाकिस्तान, भारताच्या पश्चिमेकडील सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणारा देश.(त्यामुळेच शिया पंथीय बहुसंख्य असणाऱ्या गिलगीट बाल्टिस्तान मध्ये पाकिस्तान स्थानिक जनतेवर अत्याचार करत असल्याचा बातम्या येतात) भारताबरोबर 3हजार 323 किमीची सीमा असणारा भारताचा सर्वात जास्त चर्चित शत्रूत्व असणारा देश. युके या देशाकडून भारताबरोबरच  स्वातंत्र्य मिळूनदेखील लोकशाही न रुजलेला देश . 1971 पर्यत आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मात्र आता अर्थव्यवस्था खुपच नाजूक असणारा देश. सातत्याने सर्वच क्षेत्रात भारताबरोबर किंबहूना भारताच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणारा देश. ज्या देशाची राष्ट्रीय भाषा त्या देशातील कोणत्याही समुहाची भाषा नाही, असा देश म्हणजे पाकिस्तान.तर या पाकिस्तानबरोबर नुकताच रशिया या एकेकाळच्या भारताच्या अत्यंत जवळच्या मित्राने( आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी  मित्र अथवा शत्रू नसतो, हे 100% खरे आहे पूर्वी भारत रशिया आणि पाकिस्तान अमेरीका मित्र होते. आता भारत अमेरीका मित्र आहे तर पाकिस्तान रशिया यांच्यात मैत्री होत आहे. )  संरक्षणविषयक  करार केला आहे.
भारताला भेट दिल्यावर रशियाचे परराष्ट्र मंत्री sergey Lavrov {उच्चार काय करावा? हे माहिती नसल्याने स्पेलिंग तसेच ठेवले आहे} यांनी पाकिस्तानला. दोन दिवसांची भेट दिली, त्यावेळी हा करार करण्यात आला. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी  या आधी पाकिस्तानला 9 वर्षापूर्वी अर्थात 2012 साली भेट दिली होती. 2018 मध्ये   रशियाने पाकिस्तानला दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी साह्य या सबबीखाली MI35 ही ही लढावू विमाने देण्यासाठी करार केला होता. [अमेरीकने 1971 च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानच्या बाजूने भाग घेतला होता, तर रशियाने भारताच्या बाजूने युद्धात भाग  घेतला होता ] या आधी अमेरीकेकडून दहशतवाद्याचा बिमोड करण्याचा उद्देश्याने घेतलेल्या F16 विमानाचा भारताविरोधात वापर केल्याचा इतिहास आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे मागच्या वर्षी रशिया भेटीवर गेले असता रशियाने त्यांना पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी शस्त्रात्रे न देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यावेळच्या बातम्यांंमध्ये छापून आल्याचे आपणास आठवत असेलच .
या खेरीज यापूर्वी फक्त पाकिस्तानी लष्कर आणि रशियाचे लष्कर यांच्यात DUZBA नावाने होणाऱ्या युद्ध अभ्यासामध्ये नौदल आणि वायूदलाचा देखील समावेश करण्याबाबत चर्चा केली .तसेच अनेक लष्करी उपकरणे पाकिस्तानला देण्याबाबत प्राथमिक बोलणी केली. या उपकरणाबाबत विविध मतप्रवाह आहेत.  या लेखाच्या तयारीसाठी बिबिसी आणि द हिंदूमधील  बातम्या वाचताना या उपकरणांबाबत बरीच भिन्नता आढळली. मात्र आपण T90  या रनगाडे, तसेच जमिनीवरुन जिथे उभे आहे, त्याचा सुमारे 25 ते35किमी अंतरावरील  आकाशातील विमानांचा लक्ष्यभेद करण्यासाठी  उपयोगात येत असलेली pantsir missle system  रशिया पाकिस्तानला देवू शकतो, असे मानू शकतो.
पाकिस्तानला जाण्याआधी रशियाचे परराष्ट्र मंत्री sergey Lavrov यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बरोबर बोलणी केली होती. ज्यामध्ये झालेल्या चर्चेतून भारतासाठी सकारात्मक म्हणता येईल. अश्या कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. भारताची लष्करी गरज भागवण्यासाठी भारत आणि रशियाने एकत्र आले पाहिजे. दोघांचे एकत्र येण्यातच कल्याण आहे. अस्या प्रकारची चर्चा झाली. भारताला रशियाकडून अपेक्षीत असणाऱ्या जमिनीवरुन जिथे उभे आहे, त्याचा सुमारे 400 किमी  अंतरावरील  आकाशातील विमानांचा लक्ष्यभेद करण्यासाठी  उपयोगात येत असलेली pantsir missle system सारखी S4 सारखी प्रणाली कधी देणार ?याबाबत काहीही भाष्य या दौऱ्यात करण्यात आले नाही.
अर्थात असे करार अत्यंत गुप्त असतात. करारातील सर्वच बाबी  ऊघड केल्या जात नाहीत .हे जाणून ही घडामोडीत आपणापर्यत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आपणाला आवडला असेल, असे मनोमनी मानून सध्यापुरते थांबतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?