नाँट आउट 168 !

     

येत्या 16 एप्रिलला आपली भारतीय रेल्वे नाबाद 168 वर्षे पुर्ण करुन 169 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या बद्दल समस्त भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपली भारतीय रेल्वे आशिया खंडातील पहिली रेल्वे आहे. आजमितीस रेल्वेच्या 17 उपकंपन्या (RVNL, IRCTC, Railtel ,RECON वगैरे) { मनमाड -इंदोर, नाशिक पुणे रेल्वेमार्गाची  उभारणी करण्यासाठी उभारलेल्या कंपन्या आदी प्रादेशिक कंपन्या वेगळ्या त्या या 17 मध्ये येत नाहीत} उभारण्यात आलेल्या आहेत.  17 प्रकारच्या विविध रेल्वे (राजधानी, दुरंतो, राज्यराणी, गरीबरथ वगैरे) तसेच 9 प्रकारच्या डब्यातून (एस टु टायर, एसी चेअर कार, स्पिलर, जनरल वगैरे)  आँस्ट्रोलिया या देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढ्या (सध्याचा कोरोना कालखंड वगळू या ) प्रवाश्यांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे  जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम आहे. लवकरत संपुर्णतः विद्युतीकरण झालेली जगातील पहिली रेल्वे म्हणून आपली भारतीय रेल्वे ओळखली जाणार आहे. रेल्वे रूळांच्या बाबतीत आपली भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकाची रेल्वे आहे. अशी भारतीय रेल्वे 169  व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याबद्दल तीचे कौतूक करावे तितके थोडेच आहे.आणि असी रेल्वे मिळाली, म्हणून भारतीयांना स्वतःच्या अभिमान वाटायला हवा.
      प्रवाश्यांना आरामदायी वेगवान सेवा देता यावी, या हेतूने सध्या आपल्या भारतीय रेल्वेत प्रचंड बदल ट स्वरुपात बदल घडत आहे. पुर्णतः वातानुकूलीत (एसी) स्वरुपाचा जनरलचा डब्बा, हा भारतीय रेल्वेत अमुलाग्र बदल घडवणारा निर्णय त्याच मालिकेतील .त्याच बरोबर अधिक प्रवासीभुमिख सेवा देणारी IRCTCची वेबसाइट हे त्याचे दुसरे उदाहरण.
        जेव्हा भारतात ही रेल्वे आली, त्यावेळेस याबाबत लोकांचे प्रचंड प्रमाणात अज्ञान होते. त्यामुळे अनेक लोकांनी हे तंत्रज्ञान नाकारले.आमच्या कडे रेल्वे नको, म्हणून आंदोलने झाली. मात्र कालांतराने याची उपयुक्तता लक्षात आल्यावर विरोध मावळला. ते लोक रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात वापर करु लागले. आपल्या भागातून रेल्वे आणावी यासाठी आंदोलने करु लागली.  कल्याण -अहमदनगर-बीड, रत्नागिरी-कोल्हापूर- बेळगाव, कराड- चिपळून, आदी रेल्वेमार्गांची मागणी ही त्याचीच उदाहरणे. सुरवातीला खाजगी कंपन्यांची असणारी रेल्वे स्वातंत्र्यानंतर सरकारी खात्यात परीवर्तीत झाली. आता आतापर्यत अर्थखाते सोडून रेल्वे असे एकच सरकारी खाते होते ज्याचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जात असे (कृषी खात्याचा अर्थसंकल्प स्वतंत्र्य अर्थसंकल्प मांडावा, अशी एक मागणी आहे. जर ती प्रत्यक्षात आली तर पुन्हा दोन अर्थसंकल्प सुरु होतील) रेल्वे असे एकच खाते आहे, की ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दोन  वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात .एक म्हणजे नागरी सेवा परीक्षा ज्यातून IRS दुसरी म्हणजे अभियांत्रीकी परीक्षा .(याच  अभियांत्रीकी परीक्षेचे एकत्रीकरण करण्यात आले आहे) तसेच दोन वेगळे परीक्षा बोर्ड आहे. ज्याद्वारे रेल्वेत भरती होता येते.
भारतीय रेल्वे सर्व भारतीयांना जोडणारा एक महत्तवाचा धागा आहे. आजमितीस इशान्य भारतातील काही राज्यांचा अपवाद वगळता सर्व राज्यातून रेल्वे जाते(त्यांनाही रेल्वेचा नकाश्यावर आणण्याचे  प्रयत्न सुरु आहेत) जगातील उंचीने सर्वात मोठा बोगदा, एका विशिष्ठ पद्धतीने बांधलेला रेल्वेचा जगातील सर्वात उंच पुल, तसेच पाण्याचा पातळीपासून रेल्वे रूळाचा विचार करता रेल्वेचा जगातील सर्वात उंच पुलाचा मान भारतीय रेल्वेकडे आहे.
अस्या भारतीय रेल्वेच्या 168 व्या वर्धापन दिनाच्या तूम्हा सर्वांना पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा. जय हिंद !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?