मांगल्याचे प्रतिक गुढीपाडवा

       

  गुढीपाडवा, हिंदू धर्मियांचे नविन वर्ष सुरु होण्याचा दिवस,  हिंदू धर्मियांचा साडेतीन शुभमुहुर्तांपैकी पहिला मुहुर्त . राशीचक्रातील पहिली रास असणाऱ्या मेष राशीत सुर्याचे भासमान भ्रमण ज्या महिन्यात होते, त्या महिन्याचा पहिला दिवस. त्यानिमित्ताने समस्त वाचकांना नववर्षाभिनंदन .नुतन वर्ष आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करणारे ठरो, ही मनोकामना. मागचे वर्ष कोरोनामुळे अवघड गेले, मात्र नुतन वर्ष ते अपयश मागे सरणारे ठरो, ही इश्वरचरणी प्रार्थना 
        आजच्या दिवसापासून मराठी भाषिकांचे शालीवाहन शक तर उत्तर भारतीयांचे विक्रमसवंत सुरू होते. सध्या सुरु असलेल्या इसवी सनातून 78 वजा केले की, शालीवाहन शकाचा क्रमांक मिळतो . सध्या इसवी सन 2021 सुरु असल्याने या गुढीपाडव्यापासून शालीवाहन शक 1943  सुरु होईल.
या दिवशी कडुलिंबाचे सेवन करुन घराबाहेर गुढी उभारण्याची प्रथा आहे. आजच्या दिवसापासून वसंत ऋतू सुरु होतो. वसंत ऋतूमध्ये पानगळीच्या  झाडांना नवी पालवी फुटते.सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार होते, ज्याचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी व्याखानमालांचे आयोजन करण्यात येते .(सध्याचा अपवाद करुया)
        घराबाहेर उभारलेली गुढी ही मांगल्याचे प्रतिक समजले जाते.या गुढीला केशरी , लाल रंगाचे वस्त्र  परीधान केले जाते. साखरेच्या रंगीबेरंगी दागिन्यांनी सजवले जाते. सकाळी विधीवत पुजा करुन उभारलेली गुढी सायंकाळी  सुर्यास्तानंतर  गुढीला नमस्कार  करुन काढली जाते .कडुलिंबाचे सेवन करुन आरोग्याची काळजी घेतली जाते आयुर्वेदानुसार कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंपरा म्हणून नाही, तर औषध म्हणून आपण  कडुलिंबाचे सेवन करायलाच हवे.या दिवशी घरात गोडाचे जेवण तयार केले जाते. गेल्या काही वर्षापासून (सध्याचा अपवाद करुया) विविध शहरात सांस्कृतिक मिरवणूका काढण्यात येतात. ज्यामध्ये पारंपरिक मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक वारसा दाखवला असतो.
            हा सण का साजरा करतात ? याविषयी 3आख्याइका सांगितल्या जातात.  महाभारताच्या आदीपर्वात या बाबत एक कथा आढळते. या कथेनूसार शं उपचर राजा हे इंद्राकडे गेले असता हे इंद्राने त्यांना एक वेळूची काठी दिली. ते आपल्या राज्यात परत आले असता, त्यांनी त्या काठीस सजवले.आणि जमिनीत पुरले. आणि नववर्ष सुरु होणार असल्याचे सांगितले. तेव्हापासून गुढी पाडवा साजरा करतात.दुसऱ्या आख्याइकेनुसार रावणाचा वध केल्यावर प्रभू रामचंद्र अयोद्धेला परत आल्यावर नागरीकांनी गुढी उभारुन स्वागत केले, तेव्हापासून गुढी पाडवा हा सण सुरु झाला. तिसऱ्या आख्याइकेनुसार ब्रम्हदेवांनी ज्या दिवसापासून सृष्टी निर्मिती केली, तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ज्याचा प्रित्यर्थ हा सण साजरा करतात.
यातील कोणतीही आख्याइका खरी मानली तरी गुढीपाडवा या सणाचे महत्व कमी होत नाही. हिंदू वर्षातील या पहिल्या सणाच्या तूम्हा सर्वांना  मनपासून खुप खुप शुभेच्छा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?