अस्थिरतेच्या वळणावर पाकिस्तान!


सध्या आपल्या भारतात कोरोनामुळे थैमान घातले गेलेले असताना, आपल्या शेजारच्या पाकिस्तानात एका विषारी वृक्षाला विषारी फळे आली आहेत. पाकिस्तानात कट्टर धार्मिक लोकांनी तिथे प्रचंड दंगली घडवल्या आहेत. पोलीस प्रशासनातील लोकांना बंदीस्त करण्यापर्यत या दंगलखोरांची त्यांची मजल गेली आहे. 
     मुळात धार्मिक बहुसंख्यतेचे कारण देत निर्माण झालेल्या या देशात कायमच राजकीय अशांतता राहिली, ज्याचा परीपाक धार्मिक कट्टरता   होण्यास वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होण्यात झाली.  त्यातही 25 जूलै 1977 ते 11 आँगस्ट 1988 पर्यत पाकिस्तानात असणाऱ्या जनरल झीया उल झक् सारख्या कट्टर धार्मिक प्रवृत्तीच्या हुकुमशाहाच्या कार्यकाळात तीला खतपाणीच मिळाले.
         पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरतेचा अभ्यास करताना जिया उल झक यांच्या कार्यकाळापूर्वीची पुर्वीची कट्टरता, जिया उल झक् यांच्या कार्यकाळातील कट्टरता , आणि त्यांचा अनपेक्षीत झालेल्या मृत्यूनंतरच्या (त्याचा मृत्यू, हा अपघात की खून याबाबत विविध दावे केली जातात असो) काळातील कट्टरता असे टप्पे निर्माण करावेच लागतील. जिया उल झक यांच्या काळात पाकिस्तानात धार्मिक कट्टरता प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते.त्यावेळी लागलेल्या विषारी वृक्षाची फळे आज त्यानंतर जवळपास 31 वर्षानंतर पाकिस्तानात दिसत आहे. पाकिस्तान जळत आहे. पाकिस्तानातील सर्व प्रांत कमी अधिक प्रमाणात जळत आहे.
 सध्या कोरोनामुळे आपल्या माध्यमांचे त्याकडे कमी लक्ष गेले आहे. अन्यथा हा विषय त्यांनी उचलून धरला असता, हे नक्की . पाकिस्तानात नागरी युद्ध पेटलेले आहे. पाकिस्तानचे तूकडे होत आहे, असे प्रकारच्या बातम्या त्यांनी दिल्या असत्या.
हा लेख लिहीत असताना या गोंधळाचा मुळाशी असणाऱ्या  फ्रान्सने त्यांचा  पाकिस्तानातील  वकीलातील कर्मचाऱ्यांना परत बोलावले आहे..आँक्टोबर 2020मध्ये फ्रान्समधील एका शाळेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी शिकवताना इस्लाम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या प्रेषित मोहमद्द पैगबरांचे छायाचित्र छापणाऱ्या शार्ली हेब्दो या मासिकाचे उदाहरण दिले.त्यावरुन मुस्लिम बांधवांचा भावना दुखावल्या. त्यांनी फ्रान्समध्ये आंदोलन सुरु केले. एका पाकिस्तान वंशाच्या (पर्सन आँफ पाकिस्तान ओरिजन्स) फ्रान्सच्या नागरीकाने या शिक्षकाची हत्या केली.या घटनेवर फ्रान्सचे अध्यक्ष मेक्राँन  यांनी काही विधान केले. मेक्राँन यांनी इस्लाम धर्माविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानने फ्रान्सबरोबर सर्व प्रकारचे सबंध तोडून टाकावे, अशी मागणी  रिझवी या एका 35 वर्षीय धार्मिक पक्षाच्या नेत्याने फेब्रुवारी 2021 रोजी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यावेळी पाकिस्तान सरकारने2021 एप्रिल 20पर्यत फ्रान्ससी असणारे सर्व प्रकारचे सबंध तोडण्यात येइल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानुसार काहीही कार्यवाही न केल्याने रिझवीने अचानक आंदोलन सुरू केले. 
मात्र पाकिस्तानात धार्मिक कट्टरता वाढवणाऱ्या पाकिस्तानचे लष्करी हुकुमशहा जनरल जिया उल हक यांचे योगदान याबाबत मोठेच आहे,हे नाकारण्यात काही अर्थ नाही. त्यांच्याच काळात पाकिस्तानात शारीया लाँ लावणे, कडक इस्लामी जीवनपद्धती समाजात रुजवणे, शिक्षणात इस्लामी पद्धतीचे अनुकरण करणे, धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना उत्तेजन देणे आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले.  अफगाणिस्तानवर युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने आक्रमण केले असता, त्याविरुद्ध लढण्यासाठी अमेरीकेच्या मदतीने अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात धार्मिक कट्टरता निर्माण करण्यात आली. ज्याचा वापर अफगाणिस्तान आणि त्यानंतर भारताविरुद्ध करण्यात आला. आता हे बुमरँग पाकिस्तानावरच उलटले आहे. जे आपण 12 एप्रिल पासून बघतच आहोत .तरी ही कट्टरता कमी व्हावी असी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते आपली रजा घेतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?