नको देवराया, अंत आता पाहू!


"नको देवराया, अंत आता पाहू! प्राण हा  जावू पाहे" असा मराठीतील सुप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल भक्तीत भान हरवलेल्या माझा अंत तू आता बघू नकोस, लवकरच माझ्यासाठी धाव घे , अशी आर्त विनवणी या अभंगातून संत कान्होपात्रांनी विठ्ठलास केली आहे. सध्या हाच अभंग वेगळ्या संदर्भात म्हटला जावू शकतो. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत नको देवराया, अंत आता पाहु,प्राण हा तळमळला जाहू पाहे, असे म्हंटले जावू शकते.
     कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात बेड मिळत नाही.जर बेड  मिळाला तर  आँक्सिजन किंवा व्हेंटीलिटर मिळत नाही. जर दोन्ही गोष्टी मिळाल्या तर, नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या अपघातासारखा दुर्देवी प्रसंग ओढवून प्राण जाण्याचे भय आहेच. मी नाशिकच्या रुग्णालय दुर्घटनेत  प्राणास मुकलेल्या जीवांप्रती संवेदना प्रगट करतो. इश्वर मृत्यम्यांच्या आतेष्ठांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना
    माझ्या ओळखीमध्ये एक व्यक्ती डोळ्यावरील उपचारासाठी दवाखन्यात दाखल झाली होती. ती व्यक्ती दवाखान्यात दाखल झाल्यावर त्यास कोरोना झाला. अर्थात ती व्यक्ती तरुण असल्याने यातून पुर्णतः बरी झाली. मात्र त्यामुळे एक समजले, कोणत्याही कारणासाठी दवाखान्याची पायरी चढल्यावर कोरोना दंख मारु शकत़ो. सबब प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबर डोळे, अथवा हाड अस्यांसारख्या अवयवांची पण काळजी घेणे आवश्यक आहे. कारण त्याचा उपचारासाठी दाखल झाल्यावर  लाँकितीही नाँन कोव्हिड  वार्ड असला तरी कोरोनाचा संसर्ग होवू शकतो.
     विविध स्मशानात, तसेच दफनभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीची रांग बघीतल्यावर देव अजून आपली किती परीक्षा घेणार आहे? देवाची परीक्षा कधी संपेल आणि हे कोरोनाचे संकट समस्त मानवजातींपासून कायमचे दूर जाइल?कोरोना संसर्गाची साखळी खंडीत व्हावी, यासाठी लावण्यात येणाऱ्या लाँकडाउनमुळे होणाऱ्या आर्थिक परीणामाचा विचार करता, माझ्याच नव्हे अनेकांच्या मनात जनाबाइचा हा अभंग मनात येणारच यात शंका नाही
नको देवराया, अंत आता पाहू , प्राण हा सर्वथा जावू पाहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?