जगात अशांतता निर्माण करणाऱ्या घटनेविषयी!


सध्या आपल्या भारतात कोरोना रुग्ण वाढीने भयावह परीस्थिती निर्माण केली असताना पश्चिमी आशिया (ज्याला मध्यपुर्व किंवा आखाती देश सुद्धा म्हणतात) प्रदेशात अत्यंत तणावाची, स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. आणि ही स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे इस्राइल या देशाने केलेल्या एका आक्रमक कृतीमुळे.
       तर मुस्लिम बांधवांसाठी मक्का आणि मदिना नंतर तिसऱ्या क्रमांकाचे पवित्र स्थळ असलेल्या अल अस्का मशिदीवर इस्राइलने  शुक्रवारी नमाजपठाण चालू असताना आपले शस्त्रधारी सैन्य घूसवले. आणि काही लोकांची धरपकड केली . ज्यामध्ये 200जण जखमी झाले , त्यातील 90जण अतिशय गंभीर असल्याचे वृत्त CNN ने दिले आहे.
मुस्लिम समाजबांधवांमध्ये मक्का आणि मदिनानंतर तिसरी पवित्र जागा म्हणून अल अस्का मशिद ओळखली जाते. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहमद्द पैंगबर  यांनी या जागेवरून स्वर्गारोहण केले असी श्रद्धा आहे. हे ठिकाणी जेलूसरेमच्या ओल्ड सिटी भागात येते.याच ओल्ड सिटी भागात ज्यू धर्मियांसाठी पवित्र असणाऱ्या मंदिराचे अवशेष असणारी भिंत आहे. तर ख्रिस्ती धर्मसंस्थापक येशू खिस्त यांचा जन्म देखील याच शहरात झाला. असी खिस्ती धर्मियांची श्रद्धा असल्याने त्यांना देखील सदर भाग पवित्र आहे हा  भाग पँलेस्टाइनच्या ताब्यात असणाऱ्या वेस्टबँक पासून जवळच आहे. त्यामुळे अनेकदा अनेक पँलेस्टानी मुस्लिम समाजबांधव या ठिकाणी नमाजपठणासाठी येतात. त्याचप्रमाणे ते शुक्रवार 7 मे रोजी नमाजपठाणासाठी आले असता इस्राइलने हे घृणास्पद कृत्य केले.
     इस्राइलने या ठिकाणाहून जवळच असणाऱ्या  शेख जरा  ठिकाणी  असणाऱ्या पँलेस्टाइन वंशाच्या नागरीकांना हटवून तिथे इस्राइली वंशाच्या नागरीकांना वसवावे, असा निर्णय इस्राइली सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली . या ठिकाणी कोणी वस्ती करावी? यावरुन बऱ्याच वर्षापासून इस्राइली सर्वोच्च न्यायालयात वाद सुरु होता. त्याचा निर्णय देताना इस्राइली सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. या निकालानंतर  परीस्थिती तणावाची असताना मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणाऱ्या अल अस्का मशिदीमध्ये पवित्र रमजान महिन्याचा अखेरच्या शुक्रवारी नमाजपठाण करण्यासाठी श्रद्धाळू एकत्र आले असता, इस्राइलविरोधात काही लोकांनी घोषणा दिल्या काही इस्राइली अधिकाऱ्यांवर दगडाने हल्ला केला, ज्याचा उत्तरादाखल इस्राइलने ही कार्यवाही केली, असे वृत्त बिबिसीने दिले आहे.
नुकतेच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाने इस्लामविरोधात वक्तव्य  केल्यामुळे आपल्या देशाने  फ्रान्सशी असणारे सर्व सबंध तोडून टाकावे, या मागणीसाठी पाकिस्तानात अत्यंत हिंसक आंदोलन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. माजी अमेरीकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपुर्व आशियातील मुस्लिम राष्ट्रांनी इस्राइलला मान्यता द्यावी, यासाठी विशेष प्रयत्न केले होते.त्यांचा या कारणासाठी ते शांततेचँया नोबेलचा  शर्यतीत देखील आले होते.. त्या गोष्टीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . जगभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. इराणतर्फे इस्राइल हा देश नसून  दहशतवादी भुमी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.पाकिस्तान आणि तूर्कस्थान या देशानी देखील कडक शद्बात याचा निषेध व्यक्त केला आहे. 
सध्या कोरोनामुळे  जगातील अर्थव्यवस्था आधीच डळमळीत असताना जगाला हे संकट परवडणारे नाही. त्यामुळे हा तणाव लवकरात लवकर निवळणे अत्यावश्यक आहे. तो निवळावाच ,असी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?