चोराच्या उलट्या बोंबा !


सध्या आपल्या महाराष्ट्रात वाढत कोरोना संसर्गामुळे आणि लसीकरणामुळे वातावरण तप्त असताना, जगाचा विचार करता इस्राइल आणि पँलेस्टाइन यातील संघर्षाने  जगाची झोप उडवली आहे. या संघर्षाचे तात्कालीन कारण आपणास आतापर्यत माहिती झालेच असेल. माझा या लेखाद्वारे याचा इतिहास आपणापर्यत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
तर 19 व्या शतकाच्या उतरार्धात युरोपात राष्ट्रवादाची भावना प्रबळ होती. या राष्ट्रवादाच्या प्रबळ विचारधारेत तो पर्यत स्वतंत्र्य असलेली जर्मन भाषिक राज्ये एकत्र येवून जर्मन हा देश तयार होणे फ्रेंच भाषिक प्रदेश एकत्र फ्रान्स हा देश उदयास येण्यासारख्या घटना घडल्या. त्याच मालिकेत ज्यू धर्मियांची मूळ भूमी ज्यातून त्यांना काही हजारो वर्षापूर्वी निर्वासीत केले होते, त्या पँलेस्टाइनच्या भूमीत ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र्य इस्राइलची स्वप्ने काही ज्यू धर्मियांना पडू लागली. मात्र त्यांचे प्रमाण कमी होते. याला मोठ्या प्रमाणात धूमारे फुटले ते पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस 1917 साली स्वतःच्या ताब्यात असणाऱ्या या प्रदेशात युनाटेड किंग्डम या देशाने या ठिकाणी लवकरात लवकर ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र्य राष्ट्र उभारण्याचे आश्वासन दिल्यावर. हे आश्वासन मिळाल्यावर युरोपातील अनेक ज्यू धर्मियांनी विविध वैध अवैध मार्गाने{अशिक्षीत अरबांना फसवून, धमकावून त्यांची जमिन स्वतःच्या  नावावर करणे आदी उपयांद्वारे} या ठिकाणी जमिनी खरेदी करण्यास सुरवात केली. यावेळी युनाटेड किंग्डमने येथील अरबांना या ठिकाणी पँलेस्टाइन हे राष्ट्र उभारण्याचे आश्वासन दिले होते. पुढे 1948 साली जगातील विविध वसाहती स्वतंत्र होत असताना पँलेस्टाइन ही युनाटेड किंग्डमची वसाहत देखील स्वतंत्र्य झाली. मात्र ही वसाहत स्वतंत्र करताना युनाटेड किंग्डमने एक खेळी केली. येथील अरबांना विश्वासात न घेता मुळच्या पँलेस्टाइन या देशाची इस्राइल आणि पँलेस्टाइन अशी फाळणी केली. जी येथील अरबांना मान्य नव्हती. मूळ फाळणीच्या वेळी या दोन्ही राष्ट्रांचे क्षेत्रफळ निम्मे निम्मे होते. ज्यू धर्मियांची  मोठ्या प्रमाणात वस्ती असणाऱ्या प्रदेशात इस्राइल हे राष्ट्र आकारास आले. मात्र ही फाळणी मान्य नसणाऱ्या अरबांनी इस्राइलवर लगेच आक्रमण केले.  जे अमेरीकेच्या मदतीमुळे इस्राइल जिंकले. या लढाइत नूतन पँलेस्टाइन राष्ट्राच्या काही भुभागास अन्य अरब राष्ट्रांचा भुभाग इस्राइलने घेतला.  त्यातील काही भुभाग अजूनही त्यांच्याकडे अनधिकृत रित्या आहे. (अमेरीकेमध्ये ज्यू धर्मिय राजकरणात महत्तवाचा पदावर आहेत. इस्राइल हे ज्यू धर्मिय राष्ट्र असल्याने अमेरीकेची इस्राइलला सहानभूती आहे. किंबहूना इस्राइल अमेरीकेचे 51 वे राज्य आहे. असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही किंबहुना याच मुद्दयामुळे इस्राइल अरबांशी नेहमी जिंकते) मुद्द्यावरुन यानंतर इस्राइलची अरब राष्ट्रांबरोबर 4 युद्धे झाली. तसेच त्यांचा अनेक चकमकी झाल्या. इस्राइलने त्यांचा ताब्यातील अन्य राष्ट्रांचा भुभाग मोकळा करुन 1948ची स्थिती आणावी, अशी सातत्याने मागणी केली. मात्र त्यास सातत्याने इस्राइलने वाटाण्याचा अक्षता लावल्या. या वादग्रस्त भागामध्ये जेलूसरेम या शहराचा समावेश करावाच लागेल. ज्यू, खिस्ती आणि मुस्लिम बांधवांना पुज्यणीय असणाऱ्या या शहराची मालकी नक्की कोणाची ?  यावरुन या दोघांमध्ये वारवारं धूसमुस सुरु असते.         पँलेस्टाइनच्या निर्मितीसाठी पँलेस्टाइन लिबरेशन आर्मी ही संघटना कार्यरत होती. सुरवातीला दहशतवादी संघटना म्हणून.ख्याती असणाऱ्या या संघटनेला नंतर इस्राइलकडूनही पँलेस्टाइन मधील नागरीकांची संघटना म्हणून मान्यता मिळाली. मात्र ही संघटना अनेक महत्तवाचा मुद्यावर मवाळ भूमिका घेते, या मुद्यावर यात फुट पडून हमास ही संघटना जन्माला आली. सध्या हमास ही संघटना विशेष चर्चेत  आहे. 
आपल्याकडे अनेकांना इस्राइलचे विशेष कौतूक असते. मात्र ते विसरतात , की पहिल्यांदा इस्राइलने त्यांची कुरापत काढली असते. त्या कुरापतीविरोधात केलेल्या कृतीचा वचपा काढण्याचा हेतूने मग पँलेस्टाइनवर इस्राइल प्रचंड गोळीबार करते. अनेकजण इस्राइलची कुरापत लक्षात न घेता पँलेस्टाइन त्यांची कुरापत काढते, ज्याला इस्राइल मोठ्या प्रमाणात उत्तर देते, असा दृष्टिकोन या लढ्यासाठी ठेवतात. जो चुकीचा आहे. आता देखील अल् आस्का या मशिदीमध्ये इस्राइलने सैन्य घूसवून या अशांततेला सुरवात केली आहे. ज्यामध्ये हा लेख लिहीत असताना तरी तेलसंपन्न आखाती राष्ट्रांनी प्रत्यक्ष उडी घेतली नाही. जर ती घेतली तर सन1979 प्रमाणे आँइल शाँक लागू शकतो, जे कोणालाही परवडणारे नाही. आपल्या भारताला तर नाहीच नाही. परीस्थिती इतकी गंभीर न होवो, अशी मनोकामना व्यक्त करत सध्यापुरते थांबतो नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?