बातमीमधील यस्टी

 

   सध्या माध्यमांतून कोरोना आणि ताक्तो चक्रिवादळाविषयी बातम्यांचा महापूर आलेला असताना  एक वेगळी बातमी माध्यमांत चमकून गेल्याचे मला दिसले या बातमीविषयी अन्य बातम्यांचा कोलाहलात फारसे काही बोलले गेले नाही. या बातमीचा परीणाम आपल्या सर्वांचा आयुष्यावर होणार आहे. त्यामुळे त्या विषयी आपणास सांगण्यासाठी आजचे लेखन.
तर मित्रांनो आपली महाराष्ट्राची एसटी जी लवकरच 73 वर्षे पुर्ण करुन 74 व्या वर्षात पदार्पण करणार आहे, तीच्या मार्फत 500 साध्या गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. यापुर्वी शिवशाही, शिवनेरी सारख्या आरामदायी गाड्या आपल्या एसटीने भाड्याने घेतल्या आहेत. मात्र ढासळत्या आर्थिक डोलाऱ्यास सावरण्यासाठी आता साध्या गाड्या भाड्याने घेण्याची वेळ महामंडळावर आली आहे. प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या गाड्यांमधून सेवा देता यावी यासाठी यासाठी या गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहे. एकेकाळी आपल्या कार्यशाळेद्वारे भारतातील सर्वाधिक बस निर्मित करणाऱ्या आपल्या महामंडळावर बस स्वतः निर्मित करुन घेण्याऐवजी भाड्याने घेवून चालवण्याची वेळ आली आहे. यावेळी 700 बसेस स्वतः  एसटी आपल्या कार्यशाळेत तयार करणार आहे, हीच ती काय आनंदाची बाब. यावेळी मोडीत निघणाऱ्या काही बसेसचे रुपांतर मालट्रकमध्ये करण्यात येणार आहे. आपणास माहिती आहेच की "महाकार्गो" या ब्रँडनेम अंतर्गत एसटीने नुकतेच मालवाहतूकीत पदार्पण केले आहे. त्याचा सेवांमध्ये हे मालट्रक वापरले जातील.विविध माध्यमांतून या1200 बसेसमधून सध्याची गरज भागवली जाइल .याबाबत प्राथमिक प्रस्ताव तयार असून बोर्डामार्फत मंजूरी मिळाल्यावर तो अमंलात आणण्याची शक्यता आहे.
     एकेकाळी देशातील सार्वजनिक बसवाहतूकीमध्ये अग्रगण्य असणारी आपली एसटी सध्या प्रचंड अस्या आर्थिक विवंचनेत आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गून मास या म्हणीप्रमाणे कोरोनामुळे तिच्या आर्थिक विवंचनेत भरच पडली आहे. एसटी आज देखील ग्रामीण वाहतूकीचा कणा आहे. कोणीही खासगी वाहतूकदार ग्रामीण क्षेत्रात आपली सेवा देणार नाही. तिथे प्रसंगी आर्थिक झळ सोसून आपली एसटीच सेवा देईल. तेव्हा कोणत्याही आंदोलनात  जाळपोळ करताना  याचा नक्कीच विचार करावा. 
एसटीचे उत्पनाचे नवे स्त्रोत शोधण्याचा कसोसीने प्रयत्न करत आहे. महाकार्गो या ब्रँडनेमने मालवाहतूक क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न देखील त्यापैकीच एक. सध्याचा कोरोनाच्या काळात प्रचंड हाल अपेष्ठा सोसत एसटीचे चालक आपली सेवा देत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतूक करावे तितके कमीच आहे. लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या रंगाचा आडव्या 2 रेषा ज्या एके ठिकाणी जरा त्रिकोण तयार करतात. आणि त्याच ठिकाणी महाकार्गो हे पिवळ्या अक्षरातील नाव असणारा महाकार्गो चा लोगो खरोखरीच उठावदार आहे, याबाबत कोणाच्या मनात शंका नसावी.
आपण सर्वांनी साथ दिली तर एसटी पुन्हा गतवैभवाचे दिवस बघेल यात शंका नाही. मग देताय ना साथ आपल्या यस्टीला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?