वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

   

  1991 मे 21 ही एक साधीसुधी तारीख नाहीये. भारताला एका नव्या उंचीवर घेवून जाण्याची इच्छा असणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान मानवी बाँम्बस्फोटाद्वारे हत्या झाल्याची ही तारीख होय. आज या तारखेला 20 वर्षे अर्थात एका पिढीचा कालावधी पुर्ण झाला आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली. 
        राजीव गांधी, स्वतःची इच्छा नसताना, राजकाराणाची आवड असलेल्या धाकट्या भावाचे अपघाती निधन झाल्यामुळे, एक कुटुंबवच्छल,  घराण्याची परंपरा चालवण्यासाठी राजकारणात उतरलेला राजकारणी. ज्यांनी काळाची पाउले ओळखून भारतात तंत्रज्ञानाची मुहुर्तमेढ रोवली. आज आपण ज्या तंत्रज्ञानाचा, आयटीच्या युगात राहातो, त्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी जनमताचा विरोध पत्कारुन केली.
        त्यांचे काही निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरले. ज्यामध्ये शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करावाच लागेल. भोपाळच्या मुस्लिम  बांधव परीवारातील शहाबानो या घटोस्फोटीत महिलेला पोटगी देण्याबाबात सर्वोच्च न्यायालय सुरु असलेल्या खटल्याचा निर्णयासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ते वादग्रस्त ठरले.  स्विडनची शस्त्रात्र निर्मिती कंपनी असणाऱ्या बोफोर्स या कंपनीस तोफेसाठी लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. जो सिद्ध होवू शकला नाही. मात्र त्यामध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले  .
   त्यांनी केलेल्या तिसऱ्या चूकीची किंमत त्यांना प्राणाचे मोल देवूनच चूकवावी लागली.  श्रीलंकेच्या अंतर्गत समस्येत हस्तक्षेप करत तेथील भारतीय मूळवंशाच्या तामिळी नागरीकांच्या रक्षणासाठी उडी घेतली, हीच ती चूक. ज्यामुळे लिबरेशन ईमल तमिळ टायगर्स  या संघटनेच्या दहशतवाद्यांनी त्यांची ते लोकसभेच्या निवडणूकीसाठी तामिळनाडूत आले असता हत्या केली.लिबरेशन फाँर तमिळ टायगर्स इमल ही संघटना लिट्टे या नावाने प्रसिद्ध आहे. राजीव गांधी यांच्या हत्येवर आज पासून सात वर्षापुर्वी 2014 साली मद्रास कँफे हा चित्रपट आलेला होता. सुरवात काहीसी रक्तरंजीत असलेला हा चित्रपट एकदा बघावाच असा आहे. राजीव गांधी यांच्या हत्येची तयारी कसी झाली? या हत्येचा तपास कसा झाला? याबाबत नाट्यमय रितीने यात माहिती सांगितली आहे.
जर त्यांना अजून काही कार्यकाळ पंतप्रधान म्हणून मिळाला असता तर भारताची वेगाने प्रगती झाली असती यात शंका नाही. त्यांची सत्ता गेल्यावर भारतात अनिश्चितेच्या भोवऱ्याचे एक पर्व सुरु झाल्याचे आपणास दिसून येते .जे पुढील जवळपास दहा वर्ष सुरु होते. विश्रनाथ चौधरी, नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल, देवोगडा, अटलबिहारी वाजपेयी यांची दोनदा कारकिर्द ही त्याची ठळक उदाहरणे. जर त्यांची सत्ता गेली नसती तर या अनिश्चितेला निश्चितच खिळ बसली असती यात शंका नाही असो.
आज त्यांच्या मृत्यूनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यांनी आणलेल्या क्रांतीचा फायदा घेत त्यांच्याबाबत, त्याच्या पुर्वजांबाबत त्यांचा वारश्यांबाबत चूकीचा प्रचार सुरु आहे. जे चूकीचे आहे असो. भारताला खऱ्या अर्थाने आधुनिक 21व्या शतकातील देश म्हणून उभारण्यासाठी स्वतः जीवाचे पाणी करणारा पंतप्रधान म्हणून जग राजीव गांधीना ओळखेल हे नक्की.
आज त्यांच्या 20 व्या स्मृतिदिनानिमित्य त्यांना पुन्हा एकदा विनम्र आदरांजली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?