अंताकडे वेगाने वाटचाल!

             

   आपल्याकडे कोरोना, कोरोनापश्चात प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होणारा बुरशीजन्य आजार, तेक्तो चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानीचे वार्तांकन करताना, माध्यमे थकत नसताना, समस्त जगाच्या छातीचे ठोके वाढवणारी घटना  घडली आहे. अंटार्टिका या क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावरील खंडावरील  विस्तृत अस्या  हिमनगापैकी 175 किमी लांबी आणि 25 किमी रुंदीचा हिमनग तूटला आहे. आपल्या भारताची राजधानी नवी दिल्लीपेक्षा हे क्षेत्रफळ तिपट्टीने जास्त आहे. अटार्टिका खंडाच्या पश्चिमेस असलेल्या रोम हिमखंडानजीक weddle समुद्रात हा हिमनग तूटला आहे   हा हिमनग जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने एक क्रमांकाचा हिमनग आहे. शास्त्रज्ञांनी याचे नामकरण A76 असे केले आहे.. काही दिवसापुर्वीच अंटार्टिकामध्ये त्या वेळच्या सर्वात मोठा हिमनग तूटला होता.(ज्याचे नामकरण शास्त्रज्ञांनी a68a असे केले होते) आताचा हिमनग त्याहीपेक्षा मोठा आहे. युनाटेड किंग्डमच्या अटार्टिका खंडाचे अध्ययन करणाऱ्या शास्त्रज्ञांना तो पहिल्यांदा आढळला होता. पुढे युरोपीय स्पेस एजन्सीच्या उपग्रहामार्फत अधिक संशोधन केल्यावर याची घोषणा करण्यात आली. जगातील अन्य ठिकाणच्या बर्फ वितळ्याचा वेगापेक्षा अंटार्टिकावरील बर्फ वितळ्याचा वेग जास्त असल्याचे या घटनेतून  पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत.
मानवाचा कृतीमुळे जगाचे हवामान दिवसोंदिवस सजीवश्रुष्टीसाठी  धोकादायक बनत चालले असल्याची ती खुण आहे. जागतिक तापमानवाढीसाठी आता करो अथवा मरो ही वेळ आल्याची ही खुण आहे.           सध्या जगभरात वाढलेली चक्रीवादळांची संख्या तसेच तीव्रता याचीच साक्ष देत आहे. मानवजात जागतिक हवामान बदल प्रतीकुल बनण्यापासून रोखण्यासाठी करत असलेले प्रयत्न तोकडे आहेत, यासाठी करावायचा उपाययोजनांची गती वाढवणे क्रमप्राप्त असल्याची ती खुण आहे. आता नाही तर कधीच नाही, हे जागतिक हवामानवाढ रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी अत्यंत लागू आहे. जर आता काही केले नाही तर भारतीय पुराणातील मनूची गोष्ट( मत्सावतार) किंवा बायबलमधील नोवाची गोष्ट पुन्हा एकदा घडणार यात शंका नाही.
झाडे लावल्यापेक्षा मुळातच ग्रीनहाउस गँसेस कसे कमी निर्माण होतील ? याकडे लक्ष देण्याची आता गरज आहे. जगभरातील शास्त्रज्ञांचे सौरउर्जेसारख्या पर्यावरणपुरक उर्जास्त्रोताबाबत संशोधन चालू आहे,गरज आहे, त्यांचे हात बळकट करण्याचे. ते आपण आपल्या परीने ते करत असालच, अशी आशा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?