नेपाळ वीस वर्षापुर्वीचा आणि आताचा !

               

        तारीख 1 जून 2001..... स्थळ काठमांडूतील राजाचा राजवाडा ........  वेळ नेपाळी प्रमाणवेळेनुसार रात्री सव्वा नउची.....   राजपरीवातील एक सदस्य राजाचा सख्खा भाउ वगळता सर्वजण साप्ताहिक पारीवारीक भोजनासाठी एकत्र आलेले. अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसताना भावी राजा दिपेंद्र याने स्वतःच्या रायफलीमधून बेछूट गोळीबार केला.नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. या गोळीबारातून भावी राजा  दिपेंद्रची  काकू, त्याचा चूलत भाउ, आणि त्या वेळेस तिथे नसणारा काका सोडून सर्व जण तात्काळ मरण पावतात. भावी राजा दिपेंद्रचे  3जून रोजी निधन होते. भावी राजा दिपेंद्रचे एका मुलीवर प्रेम होते. तो तीला घराण्याची सून म्हणून घरी आणू इच्छित असतो. मात्र राजाचा किंबहूना राणीचा त्यास विरोध असतो. यातून घराण्यात धूसफूस सुरु असते. या धूसफुसीतून भावी राजाने हे हत्याकांड केल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.मात्र अनेकांचा मते भावी राजा दिपेंद्र असे कृत्य करण्यास धजावणार नाही. राजाचा भावाने सत्ता मिळवण्यासाठीच हे काम केले , त्यासाठी त्याच मुलगाच आणि पत्नी कशी काय वाचली ? तसेच नेमक्या वेळी तोच बाहेर कसा ?असा प्रश्न उपस्थित करतात. त्यावेळी तेथील संरक्षण व्यवस्थेने काहीच का केले नाही? याबाबत देखील संशय व्यक्त केला जातो.या हत्याकांडानंतर राजाचा भाउ सत्तेवर आला. राजा ग्यानेंद्र आणि त्याचा मुलाविषयी नेपाळी जनतेत आदराची भावना होती. याउलट त्याचा भाउ आणि त्या भावाचा मुलाविषयी होती. नेपाळी जनता त्यांना बडे  घरकी बुगडी हुऐ औलांत असे समजत असे . . नव्या राजाने काही निर्णय घेतले त्यामुळे या असंतोषात भरच पडली . त्यामुळे नेपाळमध्ये राजेशाही नकोच अशी भूमिका घेऊन आंदोलन सुरु झाले .ज्याला यश मिळाले आणि सध्या आहे ती व्यवस्था निर्मण झाली 
आज या घटनेला एका पिढीचा अर्थात 20वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे राजे ग्यानेंद्र असताना नेपाळमध्ये घटनने मान्य  केलेली राजेशाही होती तसेच लोकनियुक्त सरकार सुद्धा होते . या लोकनियुक्त सरकारचे प्रमुख पंतप्रधान देखील होते 

त्यानंतर अनेक लाथाळ्या, कोलांट्या उड्या , स्वीकार , अस्वीकार होत तसेच घटना समितीची स्थापना बरखास्ती पुन्हा नव्याने घटना समितीची स्थापना असे अनेक नाट्यमय घडामोडी होत अखेर नेपाळचे संविधान तयार झाले . (नेपाळच्या  सध्याच्या संविधानाची  निर्मिती ही  नेपाळ आणि भारतासाठी  अत्यंत क्लेशदायक स्थिती  होती .सुदैवाने सध्या ती थांबली आहे ) ही संविधान निर्मितीची प्रक्रिया सुमारे 8 ते 9 वर्षे चालली . \या कालावधीत नेपाळमध्ये कम्युनिष्ट पक्षांनी जोर धरला ज्याची परिणीती नेपाक चीनच्या कळपात  जाण्यात झाली.  आज हे लिहीत असताना जेमतेम काही लाख लोकसंख्या असणाऱ्या नेपाळचा चीनमधील  पाचवा दूतावास (भारताचे चीमध्ये चारच दूतावास आहे ,हे लक्षात घ्या ) दोन तीन दिवसापूर्वी येथे स्थापन करण्यास दोन्ही देशांनी मंजुरी दिल्याचे वृत्त WION ने दिल्याचे आपणास माहिती असेलच नेपाळचे आडवेतीन  भाग केल्यास(या तीन भागात मैदानी पठारी आणि पर्वतीय संरचना आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे लोकसंख्या वाढत जाते ) दक्षिणेकडून पहिल्या असणाऱ्या तराई प्रदेशातील लोकांना पुरेशे अधिकार नसल्याने त्यांनी केलेल्या आदोंलनामुळे नेपाळमध्ये इंधनाची कोंडी झाल्यामुळे चीनचा फायदाच झाला . असो 

       राजे ज्ञानेंद्र हे भारताला अनुकूल भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध होते त्यांची बायको ग्वाल्हेरच्या राजघराण्याशी संबंधित होती ज्यांना भारत नेपाळ संबंधाविषयी अधिक अभ्यास करायचा आहे त्यांनी 1 जून 2001नंतरच्या नेपाळच्या विशेष  अभ्यास करणे आवश्यक आहे . भारत नेपाळ संबंधात पूर्णपणे 180 अंशात कलाटणी देणारी ती घटना होती . ज्याला एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे . तेव्हाचे संबंध पूर्णतः बदलून गेले आहेत .मात्र भारतासह अनेक देशांशी असणाऱ्या नेपाळच्या संबंधावर या घटनेने खूप मोठा परिणाम केला , एकाभावी राजाने लग्न कोणाशी करायचे ?  या वादातून परिवाराची परिवाराची हत्या नव्हती ती . ही अशी घटना होती तिने अनेक राजकारणाचे मार्ग बदललेज्यामध्ये नेपाळच्या  देशांतर्गत आणि आंतरराष्टीय राजकारणाचा समावेश होतो 
याविषयी खूप काही बोलता  शकते मात्र ज्यास सुरवात आहे गटयाचा शेवट करणे आवश्यक असते . तर सध्यापुरते इथेच थांबतो , नमस्कार !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?