बातमीतील चीन ( भाग8)

     

    चीन आपल्या आपल्या भारताच्या 27 राज्यांपैकी 4 आणि 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एका केंद्रशासित प्रदेशाबरोबर बॉर्डर शेअर करणाऱ्या चीनबाबत नुकत्याच 4 घडामोडी घडल्या . चीनची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात घटल्याने चीनने त्याचा लोकसंख्या धोरणात अमुलाग्र ठरेल असा  बदल करणे, तसेच सुर्याबरोबर  बरोबरी करू शकेल असे तापमान 121 सेकंड तापमान तयार करणे , तसेच नव्या प्रकारच्या इंफुलंझा चा रुग्ण सापडणे या बरोबरच अरुणाचल प्रदेशाजवळच्या सीमावर्ती प्रदेशात महामार्ग बांधणे यांचा समावेश करावाच लागेल . आपल्या मित्राबरोबर आपला शत्रू काय करत आहे? याची माहिती असणे अत्यावश्यक आहे, असे परराष्ट्र संबधात प्रसिद्ध तत्व आहे. त्यानुसार चीनविषयक या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे.  तर बघूया या घडामोडी.
             तर चीनने 1979 या वर्षी  एक मुल धोरण अमंलात आणण्यास सुरवात केली.ज्यामुळे  चीनची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. परीणामी चीनची कार्यप्रवण लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. तर वयोवृद्ध लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी चीनने त्याचा लोकसंख्या धोरणात प्रचंड बदल करत लोकसंख्यावृद्धीचे धोरण अमंलात आणायचे ठरवले आहे नुकत्याच चीनमध्ये  झालेल्या लोकसंख्येच्या सर्वेक्षणानुसार या वर्षी चीनमध्ये फक्त 12 दशलक्ष व्यक्ती जन्मला आल्या . ज्या 1961पेक्षाही कमी आहे . स्त्रियांचा प्रजोनोत्पादर  दर अर्थात एक स्त्री किती अपत्यांना जन्म देवू  शकते याचा दर हा चीनमध्ये 2.1 पेक्षा कमी झाला आहे . लोकसंख्या अभ्यासकांनुसार कोणत्याही देशाची लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी त्या देशाच्या  लोकसंख्याचा प्रजोनोत्पादर  दर किमान 2,1 असणे आवश्यक आहे 1979  एक अपत्य धोरण अमलात आणणे सुरु झाल्यावर बहुसंख्य चिनी लोकांनी  मुलांना प्राधान्य देत मुलीचा गर्भाला नकार दिल्यानं आज लिंग गुणोत्तर आज चीनमध्ये खूपच चिंताजनक स्थितीत आहे .त्यामुळे चीनने हे धोरण अमलात आणले आहे 
आता बघूया दुसरी घडामोड
      स्वच्छ वातावरणा निर्मितीत आपला मोठा सहभाग असावा या हेतूने चीनमध्ये सूर्यावर असते तशी स्थिती असते तशी स्थिती निर्माण करून ऊर्जा निर्मितीचे प्रयोग सूर आहेत . ज्याला काही प्रमाणात यश देखील मिळाले आहे . तर मित्रानो , Experimental Advanced Superconducting Tokamak अर्थात EAST , या आद्यक्षराने सुरु असणारी एक आण्विव प्रयोगशाळा चीनमध्ये आहे. ज्यामध्ये हा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे. या विक्रमाअंतर्गत 101 सेकंदासाठी 216 दशलक्ष सेल्यीयस तापमान तर 20 सेकंदासाठी 288 दशलक्ष सेल्यीयस तापमान निर्माण गेले. जे सुर्यावरील तापमानापेक्षा दहापटीने अधिक आहे. हा ऐताहासिक प्रयोग Heai या शहरातील  प्लाझ्मा फिजिक्स आँफ द चायनिझ सायन्स अँकेडमी येथे करण्यात आला. यासाठी फ्युजन या प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. या प्रयोगासाठी चीनमध्ये याच प्रकारच्या अजून दोन आण्विक प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात येत आहे. इंटरनँशनल थर्मो न्युक्यीलीअर इक्सपिमिटर रिकँटर या 1985 पासून 35 देशाचा सहभाग  असलेल्या प्रयोगाअंतर्गत ही चाचणी घेण्यात आली. या प्रयोगात आपला भारत , दक्षीण कोरीया, रशिया, अमेरीका, फ्रान्स, जपान हे प्रमुख देश आहेत. याची पुढील पायरी  हायड्रोजनच्या ड्रोटोरियम आणि ट्रिटोनियम या दोन समस्थानिकांचे अणूचे एकत्रीकरण करून उर्जा निर्माण करणे ही गोष्ट आहे . त्यासाठी लागणारे प्रचंड तापमान निर्माण करण्याचे सध्या सुरु आहेत.. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रदुषण विरहीत उर्जा निर्माण करणे शक्य होईल.

  आता बघूया तिसरी घडामोड
चीनमध्ये इंफ्रुइंझाचा नव्या विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे समोर आले आहे. इनफ्रुइंझाचा विषाणूचे विविध प्रकार अस्तिवात आहे..हे प्रकार विषाणूच्या रचनेत असणाऱ्या प्रोटीनवर पडतात .कोणत्याही विषाणूत दोन.प्रकारचे प्रोटीन असतात.Hemagaulltinin आणि Neuraamindas  या दोघांचे विविध प्रकार असतात .Hemagaulltininचे 18 उपप्रकार तर Neuraamindasचे 11 उपप्रकार पडतात  या उपप्रकाराचे काँम्बिनेशन होवून विविध विषाणू तयार होतात जसे H1N7, H9N5 वगैरै. सध्या नव्याने तयार झालेला विषाणू H 10 N 3 या प्रकारचा आहे. चीनच्या मते हा धोकादायक विषाणू नाही. अर्थात हा चीन आहे, त्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे असो .
आता बघूया चौथी घडामोड 
तर चीनने Nyingchi या शहरापासून तिबेटमधील medog कांउटीपर्यत 8 लेनचा प्रशस्त महामार्ग तयार केला आहे. जो अरुणाचल प्रदेश तिबेट सीमेपासून जवळच आहे. ब्रम्हपुत्रा नदीच्या घळीतून रस्ता तयार करण्याचे काम गेल्या सात वर्षापासून सुरु होते..जे नूकतेच पुर्ण करण्यात आले आहे. चीनचा पुर्व इतिहास बघता चीन या महामार्गाचा वापर करुन लष्करी साहित्याची ने आण करु शकतो. या महामार्गामुळे पुर्वीचे या दोन ठिकाणातील  346किमीचे अंतर 180 किलोमीटरने कमी झाले आहे. ज्यामुळे या दोन भागातील अंतर आठ तासांनी कमी झाले आहे.नुकतेच ब्रम्हपुत्रा नदीवर मोठे धरण बांधण्यास तेथील.सरकारने परवानगी दिली आहे. या धरणामुळे भारतात प्राकृतिक समस्या निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञ  व्यक्त करत आहेत. चीन भारत चीन सीमेवर अनेक ठिकाणी नव्याने सर्व.आधुनिक सोयीनी युक्त मानवी वस्त्या निर्माण करत आहे. जे भारतासाठी धोकादायक आहे.
चीन  हा  आता जागा जागृत झालेला ड्रँगन असून तो जगाची झोप उडवण्यास सज्ज झाल्याचीच ही नांदी म्हणायला हवी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?