बातमीतील चीन (भाग (9)

   

सध्या घडणाऱ्या आंतराष्ट्रीय घडामोडीचा विचार केला असता एका देशाचे नाव  सातत्याने चर्चेत आलेले दिसते , तो देश म्हणजे चीन  दोनच दिवसापूर्वी मी त्या देशातील चार घडामोडी आपणास सांगितल्या होत्या , त्या सांगून जेमतेम 48 तास होत नाहीत चीनविषयी नव्याने तीन मोठ्या घडामोडी घडल्याने त्याची माहिती करून देण्यासाठी आजचे लेखन 
     तर मित्रांनो, चीनचा गिलगिट बाल्टीस्तानला लागून असणारा प्रांत म्हणजे झिंकियाग (याचा उच्चार काही ठिकाणी सिंकीयांग असाही आढळतो) अर्थात पुर्व तूर्कस्थान. या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांंच्यावर चीनचे सरकार अत्याचार करत असल्याचा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खुपच गाजतो आहे. या मुस्लिम बांधवांना  विगूर मुस्लमान  म्हणतात. गेल्या 48 तासात घडलेल्या घडामोंडींमध्ये या मुद्द्याचा संदर्भात 2 घटना घडल्या आहेत. चीनचा आश्रीत म्हणता येईल, असा इस्लाम हा प्रमुख धर्म असलेला पाकिस्तान हा देश यावर जरी काही बोलत नसला तरी अन्य इस्लामी जगतात याचे पडसाद उमटत आहेत. या अन्य इस्लामी जगतातील एक देश असलेल्या  बांगलादेशामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. 3 जून या दिवशी बांगलादेशातील ढाका येथे या मुद्दयावरुन चीनचा निषेध करणारा मोर्चा काढण्यात आला. सध्या कोरोनामुळे बांगलादेशामध्ये लाँकडाउन असल्याने या मध्ये कमी लोक सहभागी असले तरी मोर्च्यामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांचे वर्तन बघता  बांगलादेशातील जनतेत चीनविषयक  राग प्रचंड प्रमाणात आहे. हे दिसून येत आहे. युट्युबवर या घटनेचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. आपण ते बघू  शकता.  3 जून 1989 रोजी लोकशाही हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या  आपल्याच कित्येक  नागरीकांना चीनने राजधानी बिजिंग मध्ये अत्यंत क्रुरपणे मारुन टाकले होते. त्यावेळी किती लोक मेले याबाबत अजूनही अधिकृत माहिती नाही. याबाबत काही हजारो सह काही  लाखो लोकांचा उल्लेख करण्यात येतो.त्याच दिवसाचे निमित्य साधून बांगलादेशातील नागरिकांनी चीनच्या मुस्लिम बांधव विरोधातीलदडपशाहीचा विरोध केला . 

आंतरराष्ट्रीय  राजकरणात या विषयी प्रचंड आग्रहीपणे मुद्दा मांडणाऱ्या मध्ये युनाटेड किग्डम आँफ ग्रेट ब्रिटन अँड नाँर्दन आयर्लंड (आपल्याकडे इंग्लड या नावाने प्रसिद्ध ) या  देशाचे पंतप्रधान जोरीस बाँनसन यांचा उल्लेख करावाच लागेल . या जोरीस बाँनसन यांचा काहीसा राग मनात धरुन चीनच्या सरकारकडून  त्यांचा अधिकृत अकाउंटवथ 4ट्टीट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये काश्मीर समस्या निर्माण होण्यासाठी युके कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्रात(चीनमध्ये खासगी वृत्तपत्रे नाहीत, हा मुद्दा लक्षात घ्या) अनेक खोट्या  चूकीच्या गोष्टींचा समावेश करत लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत ज्यामध्ये भारताचे माजी न्यायमुर्ती यांचा राजकरणी असा उल्लेख करत त्यांनी न लिहलेल्या पुस्तकाचा संदर्भ देत केलेल्या विधानाचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल. एकंदरीत हा मुद्दा चीनला चांगलाच जिव्हारी लागला आहे. येत्या काळात हा मुद्दा अजून तापणार हे नक्की .
जगातील सात ताकदवान अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समुह अर्थात जी7 मध्ये (जी7 मध्ये अमेरीका, कँनडा, फ्रान्स, जर्मनी युके इटली, जपान हे देश समाविष्ट होतात) चीनच्या बिल्ड अँड रोड इन्हेसेटिव्ह ला "क्लिन ग्रीन इनेसेटिव्ह" या नावाने दुसरा पर्याय उभा करावा का? याबाबत प्राथमिक स्तरावरील विचारमंथन सुरु आहे. चीनच्या बिल्ड अँड रोड इनेसेटिव्ह मध्ये उभारण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये पर्यावरणपुरक विकासकांमांचा विचार जवळपास 0%करण्यात आल्याने अमेरीकडुन पहिल्यांदा ही संकल्पना मांडण्यात आली.जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास चीनच्या कर्जाच्या विळख्यातून काही प्रमाणात देशाची सुटका होवू शकते. या प्रकल्पासाठी युकेमध्ये 11 ते13 जून दरम्यान होणारी जी 7 देशांची परीषद महत्तवाची आहे. त्यावेळेस मी त्याबाबत आपणासी संवाद साधेलच तूर्तास इतकेच नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?