बातमीतील पाकिस्तान (भाग 5)

,       

  आपल्या शत्रू राष्ट्रावर आपली कायम नजर असली पाहिजे तेथील सर्व  घडामोडींची इंत्यभूत माहिती आपणास असणे आवश्यक आहे , असे चाणक्य नीतीतील एकवचन आहे . पाकिस्तान भारताच्या पश्चिमेला असणारे शत्रू  राष्ट्र त्यामुळे तेथील घडामोडींची माहिती असणे आपणास आवश्यक आहे नुकत्याच तीन गोष्टी या पाकिस्तानसंबंधी घडल्या.  समर्थ रामदासस्वामी यांच्या जे जे आपणाशी ठाव , ते ते सकळांसी सांगावे शाहने करून सोडावे सकल जन . या उक्तीनुसार ते आपणा पर्यंत पोहचवून चाणक्यनीतीचे  देखील अनुसरण करण्यासाठी लेखन
            तर मित्रानो , बासमती तांदुळाच्या स्वामित्वहक्कावरून युरोपीय युनियनच्या व्यापार  विषयक न्ययालयात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दाखल करण्यात आलेला दावा , चीनच्या मदतीने बीबीसी , फ्रांस 24,रशिया टुडे यांसारखी सरकारी भांडलावर उभी असणारी आंतरराष्टीय वृत्तवाहिनी उभारण्यासाठी प्रयत्न सुरु करणे . आणि सौदी अरेबियाने  ग्वादार मधील आपला  प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पातील  गुंतवणुकीचा निर्णय मागे घेणे या तीन घडामोडी आहेत आता प्रत्येक घडामोड स्वतंत्रपणे बघूया . 
             स्वातंत्रपूर्व काळापासून  पाकिस्तान पासून कोलकाता पर्यंत बासमती हा तांदूळ पिकत होता . स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाल्यामुळे बासमती तांदूळ पिकवणारे क्षेत्र दोन देशात विभागले गेले जगात फक्त भारत आणि पाकिस्तानमध्येच बासमती पिकवला जातो . सुवासिक तसेच लांब दाणा असणाऱ्या बासमतीस जगात खूपच महत्व आहे त्यामुळे बासमती तांदुळाच्या जागतिक बाजरपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित व्हावे म्हणून दोन्ही देश प्रयत्नशील असतात . सध्याची घडामोड ही त्याच युद्धातील एक साखळी आहे . तर या सर्व प्रक्रियेत युरोपीय युनियनच्या बाजरपेठेत बासमती तांदूळ चा एकमेव उप्तादक म्हणून भारताला मान्यतादावा  मिळावी . म्हणून युरोपीय युनियनच्या व्यापार  विषयक न्ययालयात दावा दाखल केला आहे . सन 2010 मध्ये युरोपीय युनियममध्ये  भारताने बासमतीसाठी जॉग्रफिकल इंडिकेदार साठी दावा दाखल केला होता त्या नंतर पाकिस्ताने  त्यासाठी जॉग्रफिकल इंडिकेदार साठी दावा दाखल केला . त्यानंतर  युरोपीय युनियनच्या  निकर्ष  भारताकडून अमलात न आणल्या गेल्यामुळे  भारत मागे पडला आणि पाकिस्ताने  युरोपात निर्यात होणाऱ्या तांदुळाचा बाजरपेठेतील दोन तृतीयांश हिस्सा काबीज केला  .ज्यामध्ये बसमतीचा वाटा मोठा आहे . असो आता या पुढची पायरी म्हणजे प्रोटेक्टेड जॉग्रफिकल इंडिकेदार साठी दावा दाखल केला आहे . ( या प्रकारच्या दाव्याचे तीन प्रकार  एक जॉग्रफिकल इंडिकेदार दुसरा प्रोटेक्टेड जॉग्रफिकल इंडिकेदार आणि तिसरा प्रोटेक्टेड डेझीनेशन ओरिजिन )  जर  भारताचा हा दावा स्वीकारला गेला तर पाकिस्तानमध्ये  अणुबॉम्ब टाकल्यासारखी स्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . 

आता बघूया दुसरी घडामोड 
रशिया टुडे  सारख्या आंतराष्ट्रीय वृत्तवाहिन्या पाकिस्तानची  जगात नकारत्मक प्रतिमा निर्माण करत आहेत . पाकिस्तानमध्ये अनेक सकारत्मक बाबी आहेत त्या जगापुढे येणे आवश्यक आहे . यासाठी  पाकिस्तानी सरकारी ,मालकीची  आंतराष्ट्रीय वृत्तवाहिनी असावी या विचारातून पाकिस्तान  चीनच्या मदतीने आंतराष्ट्रीय वृत्तवाहिनी उभारत आहे .  ही वृत्तवाहिनी इस्राईल, युरोपीय युनियन , अमेरिका आदी देशातील प्रचाराला आळा बसेल अशी पाकिस्तानची अशा आहे . भारताने या आधीच डीडी इंटरनॅशनल या नावाने  अशी वृत्तवाहिनी उभारण्यास सुरवात केली आहे त्याद्वारे भारत काश्मीरविषयक भूमिका जगभर प्रसारित करेल.  त्याला  विरोध करणे हे देखील या वृत्त वाहिनीचे उद्दिष्ट आहे .त्यामुळे डीडी इंटरनॅशनल ही वृत्तवाहिनी यशस्वी होणे आवश्यक आहे . 

आता बघूया तिसरी घडामोड . 
सौदी अरेबियाने  ग्वादार मधील आपला  प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पातील  गुंतवणुकीचा निर्णय मागे घेतला आहे . येथे प्रकल्प उभारणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही असे कारण सौदी अरेबिया याने दिले आहे . जानेवारी 2019  मध्ये वीस बिलियन डॉलर्सची  गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते त्यातील 50% अर्थात दहा  बिलियन डॉलर्सचीगुतंवणूक ग्वादार या बंदरामध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्पात होती जी आता रद्द झाल्यात जमा आहे . ग्वादार ऐवजीकराची येथे ही गुंतवणूक करणे योग्य ठरेल असा सौदीचा दावा आहे . सौदी अरेबिया  काश्मीरचा मुद्दा  आंतराष्ट्रीय पातळीवर जोरकसपणे मांडत नाही अशा  आरोप पाकिस्तानने सौदी अरेबियावर केल्याने दुरावलेले  पाकिस्तान सौदी अरेबिया संबंध त्यामुळे अधिकच दुरवण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे . उरलेल्या अर्ध्या रक्कमेच्या गुंतवणुकीवर अजून काही भाष्य करण्यात आलेले नाही . ग्वादारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या निर्मितीची प्राथमिक तयारी झाली आहे . काही महिन्यापूर्वीच डिसेंबर 2021 पर्यंत तेल  शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येईल अशी घोषणा सौदी अरेबिया कडून करण्यात आली होती येत्या पाच वर्षात कराचीमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येईल अशे सौदी अरेबियाकडून जाहीर करण्यात आली आहे . आंतराष्ट्रीय संबंधात दाखवायचे दात आणि प्रत्यक्षातले दात वेगळे असतात . त्यामुळे याचे अनेक अर्थ निघू शकतात . असो 
 मी लेखाच्या सुरवातीलाच सांगितले तसे समर्थ रामदासस्वामी यांच्या जे जे आपणाशी ठाव , ते ते सकळांसी सांगावे शाहने करून सोडावे सकल जन . या उक्तीनुसार पाकिस्तानातील घडामोडी  आपणा पर्यंत पोहचवून आपल्या शत्रू राष्ट्रावर आपली कायम नजर असली पाहिजे तेथील सर्व  घडामोडींची इंत्यभूत माहिती आपणास असणे आवश्यक आहे या  चाणक्यनीतीचे  देखील अनुसरण करण्यासाठी केलेले लेखन आपणास आवडले असेल असे मानून सध्यापुरते थांबतो , नमस्कार लेखन
 
 . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?