असी आहे आपली एसटी .....!

   

  मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची एसटी भारतातील एक प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या 10 प्रमुख प्रकारच्या बससेवा या आपल्या एसटीमार्फत पुरवल्या जातात. या 10 प्रमुख प्रकारातील एका प्रकारचे 5 उपप्रकार देखील पडतात.  आपली एसटी महामंडळ विविध प्रादेशिक विभाग आणि आगारमधून ही सेवा पुरवली जाते. चला तर जाणून घेवूया एसटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध सेवा.
साधी बस 

1) परीवर्तन सेवा: एसटी महामंडळाची ही सर्वात स्वस्त आणि खेडोपाडी चालणारी सेवा आहे. या सेवेला लालपरी म्हणून देखील ओळखले जाते.  या सेवेचे विठाई, हरीत कुंभ,  विद्यार्थी सेवा, एम एस बाँडी, साधी बस असे उपप्रकार पडतात. आता जाणून घेवूया याचे उपप्रकार 
अ)हरीत कुंभ :नाशिकला कुंभमेळा असताना 2014-2015ला एसटी महामंडळामार्फत ही सेवा सुरु करण्यात आली. या बसेसचा रंग हिरवा असतो. पर्यावरणपुरक कुंभमेळ्याचा संदेश जनसामन्यापर्यत पोहोचवण्यासाठी या बसेसची निर्मिती करण्यात आली होती.
ब)विद्यार्थी सेवा: खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे, सोयीचे व्हावे यासाठी  महामंडळातर्फे ही सेवा सुरु करण्यात आली. शाळा, महाविद्यालयाचा वेळेत यामधून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. अन्य वेळी यामधून कोणीही प्रवास करू शकतो. या बसेसचा रंग निळा असतो.
विद्यार्थी बस 

क) एम एस बाँडी: नेहमीच्या परीवर्तन बसेसमध्ये आरामदायी सेवा देण्यात यावी म्हणून ही सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये बसचे वजन कमी व्हावे यासाठी स्टीलच्या ऐवजी अँल्युमिनीयमचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे या बसचे वजन नेहमीपेक्षा कमी झाले आहे. या बसमधील खिडक्यांचा आकार नेहमीपेक्षा मोठा आहे.या बसचा रंग लाल आणि पांढरा रंगाचा पट्टा बसलेला असतो.
ड)विठाई:  पंढरपूर येथे जाण्यासाठी या गाड्यांची रचना करण्यात आली आहे. याची रचना एम एस बाँडी सारखीच असते. फक्त या ठिकाणी डायव्हरचा बाजूला भगवान विठ्ठलाच्या मुर्तीचा फोटो रेखाटला असतो. तसेच डायव्हरचा बाजूस विठ्ठाई असे लिहलेले असते.
इ) साधी बस : या बसला रंग रक्तवर्णी लाल असतो. संपुर्ण बस एकाच रंगात रंगलेली असते. महामंडळाच्या ज्या बसला लाल डब्बा म्हणून हिनवण्यात येते ते याच बसला. पुर्वीपेक्षा या बसेसमध्ये अनेक सुधारणा करण्यात आला आहे.
2) हिरकणी: एशियाड या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या बसेस भारतातील पहिल्या आरामदायी बसेस आहेत. 1982 साली नवी दिल्लीत एशियाड या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खेळाडूंना हाँटेलमधून स्टेडीयममध्ये आणि परत
एशियाड 
स्टेडीयममध्ये आणि परत हाँटेलमध्ये आणण्यासाठी, महाराष्ट्र एसटीच्या पुणे येथील कार्यशाळेत खास तयार करण्यात आलेल्या बसेस वापरण्यात आल्या.  एशियाड संपल्यावर महामंडळाने त्या बसेस मुंबई पुणे दरम्यान वापरण्यास सुरवात केली. त्या बसेस म्हणजे एशियाड उर्फ हिरकणी. या.बसेसमध्ये दोन रंगसंगती आढळतात. टपाला जांभळा रंग आणि सगळ्या बसला पांढरा रंग ही एक रंगसंगती आणि दूसरी रंगसंगती म्हणजे टपाला हिरवा रंग आणि सगळ्या बसला पांढरा रंग ही होय. 
3)शीतल:  सुरवातीला एशियाड या बसेसमध्ये वातानुकीलन यंत्र नव्हते. कालांतराने एशियाड या बसमध्ये वातानुकीलीत यंत्र बसवण्यात आले. आणि या नव्या प्रकाराला शीतल असे नाव देण्यात आले. मात्र हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. आणि हा प्रयोग महामंडळाकडून गुंडाळण्यात आला. 
 
शिवनेरी 

4)यशवंती: अवघड घाटाच्या ठिकाणी तसेच कमी प्रवाशी संख्या असलेल्या मार्गावर महामंडळाकडून कमी लांबीच्या तसेच कमी प्रवाशी बसू शकतील अस्या बसेस चालवण्यात येतात. त्यास यशवंती म्हणतात.या बसेसला पोपटी रंग दिलेला असतो. वणी गाव ते सप्तशृंगी गड,  भुसावळ ते मुक्ताइनगर हे मार्ग यासाठी प्रसिद्ध आहेत.
5) स्लिपर अधिक सीटरच्या साधी बस :  भारतातील अन्य एसटी महामंडळाच्या तूलनेत उशीरा म्हणजेच नजीकच्या भुतकाळात आपल्या महामंडळाकडून.ही सेवा सुरू करण्यात आली. आपल्या आधी गुजरात वगैरे काही राज्य परीवहन.महामंडाळाच्या मार्फत ही सेवा या आधीच सुरु करण्यात आली आहे. या मध्ये बसून प्रवास करण्यासाठी काही आसने असतात. बसून प्रवास करण्यासाठी असणाऱ्या आसनावरती काही स्लिपर बर्थ असतात. या प्रकारच्या बसेसमध्ये वातानूकूलनाची यंत्रणा नसते. खिडकीमधून वायूविजन होते.
6) आसनी शिवशाही : या प्रकारच्या गाड्यांमध्ये वातानूकूलनाची यंत्रणा असते.रेल्वेच्या एसी चेअर कार सारखी याची रचना असते. याचे सध्या प्रचलन आहे. या बसेसपैकी काही बातम्या महामंडळाच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत.तर काही खासगी वाहतूकदारांकडून महामंडळाच्या नावाखाली चालवण्यात येतात. काही दिवसापुर्वी या बसेसच्या अपघातांची संख्या वाढल्याने या बसेस विशेष प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर पांढऱ्या रंगाच्या रंगसंगतीत धावणाऱ्या घोड्याचे चित्र असते
शिवशाही 

7)स्लिपर शिवशाही : या बसेसमध्ये वातानुकलनाची सोय असते.तसेच झोपून प्रवास करता येतो.  रेल्वेच्या थ्री टायर एसीच्या डब्यासारखी याची रचना असते. यावर पांढऱ्या रंगाच्या रंगसंगतीत धावणाऱ्या घोड्याचे चित्र असते
8)शिवनेरी : पुर्णतः आकाशी रंगाच्या रंगसंगतीतील हा बसप्रकार बसून प्रवास करण्यासाठी आहे. या व्होवो कंपनीच्या आरामदायी गाड्या आहेत. 
9) अश्वमेध:  मल्टि अँक्सल व्होल्वो या प्रकारच्या या बसेस आहेत. या बसेस आजमितीस फक्त मुंबई ते पुणे दरम्यान धावतात. तेलंगणा राज्य परीवहनाचा गरुडा प्लस किंवा कर्नाटक राज्य परीवहनाच्या ऐरावत प्रकारच्या बसेसच्या समकक्ष या बसेस आहेत. या बसेस चाँकलेटी रंगाच्या रंगसंगतीत असतात.
10)शहरी बसवाहतूक: सध्या आपल्या महामंडळामार्फत या प्रकारची सेवा कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सांगली-मिरज,  औरंगाबाद, रत्नागिरी, नाशिक आदी शहरात शहर बसवाहतूक पुरवली जाते. मात्र ही बससेवा सबंधीत स्थानिक स्वराज संस्थेमार्फत चालवण्यात यावी असे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. नाशिक शहरात यासाठी महामंडळाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. असो .
अशवमेध 

     याखेरीज इलेक्ट्रीक साधनावर शिवाई या ब्रँडनेम अंतर्गत बस चालवण्याचे प्रायोगिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. 
मित्रांनो ,आपली एसटी महामंडळ प्रवाशी वाहतूकीखेरीज महाकार्गो या ब्रँडनेम अंतर्गत मालवाहतूकीत देखील आपले नशीब अजमावत आहे. त्यात महामंडळाला यश लाभो, आणि सध्याचा तोट्याचा चक्रातून महामंडळाची  सुटका व्हावी असी मनोकामना  व्यक करुन सध्यापुरते थांबतो,नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?