ऐताहासिक महत्व असलेला दुर्ग ...त्रिंगलगड

     

सध्या कोरानाच्या संसर्ग कमी होत असल्याने, आणि लसीकरणास देखील वेग येत असल्याने अनेक दुर्ग मोहिमा सध्या आयोजित केल्या जात आहेत. अस्याच एका दुर्ग मोहिमेत सहभागी होण्याची मला नुकतीच संधी मिळाली. आजचे लेखन त्यात आलेल्या अनुभवांविषयी.
तर मित्रांनो, वाहतूक सुरक्षा अभियानासह नदी स्वच्छता, बेटी बचाव बेटी पढाव या सह विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि वाहतूक सुरक्षा अभियानाचे कित्येक जागतीक विक्रम करणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गभ्रमती गृपच्या माध्यमातून मी नूकतीच मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी या छोट्या शहरापासून.हाकेच्या अंतरावर असणाऊ त्रिंगलगड या गडावर दूर्गभ्रमती केली. खुपच छान अनुभव होता तो.
       त्रिंगल गडावर एक जैन लेणी आहे. मात्र समाजकंटकांनी लेण्याची प्रचंड दुर्दशा केली आहे. लेणी आणि किल्याची निर्मिती.दहाव्या शतकात झाल्याचे मानन्यात येते .मध्य युगात नाशिक आणि कोकणाचा व्यापार मार्गावरील मोक्याचा ठिकाणी हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी मोघलांकडून हा किल्ला जिंकला .पुढे सन 1688 मध्ये किल्ला पुन्हा मोघलांच्या ताब्यात गेला. सन1818मध्ये त्र्यंबकगड ब्रिटिशांचा अधिपत्याखाली गेल्यावर जे 16किल्लेपण ब्रिटीश अधिपत्याखाली आले, त्यापैकी एक म्हणजे हा त्रिलंगगड होय.
पावसळ्याचे दिवस असला तरी पाउस न पडता ढगाळ वातावरणात आम्ही गडावर चढण्यास सुरवात केली. गडावर चढण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत. दोन्ही फारश्या त्रास न घेता चढता येण्यासारख्या आहेत. गडावर मध्यावर पोहोचल्यावर टोक गावाकडून येणारी वाट दूभंगते, आणि दोन स्वतंत्र्य वाटा तयार होतात. एक वाट भल्या भल्यांचा घाम काढणारी दुर्गम आहे. तर दुसरी वाट तूलनेने सोपी मात्र लांबचा प्रवास करायला लावणारी आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या नव्या लोकांनी वर जाण्यासाठी वाटा शोधताना  याचा विचार करायला हवा.
टोक गावातून येणारी वाट दूंभगल्यावर जी अवघड वाट आहे, त्या वाटेवर  आपणास एका मारुतीच्या सुंदर मुर्तीचे दर्शन होते आणि आपला शीण कुठच्या कुठे पळून जातो..याच वाटेवर एका शाँटकटचा विचार केल्यास आपणास एका नेढ्यातून जाण्याचा सुखद अनुभव घेता येतो. या अवघड वाटेवर एक टप्पा अवघड आहे. उंच शेवाळलेल्या पायऱ्या आणि त्यावरुन वाहणारे पाणी  आणि जरा पाय सटकल्यास मागे खोल दरी हाच तो टप्पा . हा अवघड टप्पा यशस्वी पार केल्यास अवघड वाट देखील प्रचंड मनप्रसन्न करणारी आहे. मी गडावर चढताना अवघड वाट तर उतरताना सोप्या वाटेने वाटचाल केली. 

मला उतरताना मात्र क्षणार्धात येणाऱ्या आणि क्षणार्धात जाणाऱ्या पावसाने तीन चारदा गाठले. सँकमधून रेनकोट काढोस्तोवर पाउस संपण्याचा अनुभव मला उतरताना दोनदा आला. असो.
      आजमितीस गडावर एक छोटेसे मंदिर आणि एक कुंड  वगळता पाहण्यासारखे काहीही नाही. गडावर सर्वात वरती विस्तिर्ण मैदान आहे. या मैदानाच्या एका टोकाला हे मंदिर आहे. तर कुंड  मंदिरापासून जवळच आहे.बाकीचे सर्व अवशेष दुर्देवाने पडून गेले आहेत. गडाच्या पायथ्यासी एक जैन लेणी आहे. ज्याची समाजकंटकांनी दुर्दशा केली आहे सह्याद्रीच्या अन्य डोंगरावर असते तितकेच वनाच्छादान या किल्यावर आहे.. इतर ठिकाणी हमखास येणाऱ्या माकडांचा त्रास हा  किल्ला चढताना होत नाही. 
नाशिकहून मुंबईला जाताना  मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी टोल नाका ओलांडल्यावर अर्धा एक किलोमीटर गेल्यावर  आपणास टोक गावाकडे जाण्याचा रस्ता उजवीकडे दिसतो.त्या रस्त्याहून अकरा किमी प्रवास केल्यावर आपण गडाच्या पायथ्यासी पोहोचतो. मुख्य महामार्गावरील सोडून अन्य रस्ता अपवाद वगळता ठिकठाक आहे. या ठिकठाक रस्त्यामुळे हे अंतर जरी 11 किमीचे असले तरी हे अंतर कापण्यास तसा जास्त वेळ.लागतो. इथे येणाऱ्यांंनी ही गोष्ट लक्षात घेयला हवी.
तर मित्रांनो, मी तर त्रिलंगड बघीतला! तूम्ही कधी जाताय गड बघायला !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?