बातमीतील चीन (भाग12)

 

सध्या आपल्या  महाराष्ट्रात आरक्षण विषयक चर्चांवर, माध्यमे चर्चांचा खल करत असताना जागतिक स्तरावर कोणता मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे? याचा विचार केला असता, एकच मुद्दा सध्या जागतिक स्तरावर विविध स्तरावर आणि विविध भौगोलीक स्तरावर चर्चीला जातोय , तो म्हणजे चीन. सध्या एक दिवसाआड चीनविषयी काहीतरी ऐकायला मिळते.जर एखाद्या दिवशी चीन विषयक ऐकायला मिळाले नाही.. तर भयंकर काहीतर घडल्यासारखे वाटावे, इतक्या मोठ्या प्रमाणात चीन चर्चेला जातोय. चीन हा आपला प्रमुख शत्रू आहे. पाकिस्तान आपल्याविरोधात जी गरळ ओकतोय त्याचा पाया चीनच असतो.त्यामुळे त्या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेवूया गेल्या तीन चार दिवसात चीन संदर्भात घडलेल्या गोष्टी.
तर मित्रांनो गेल्या तीन चार दिवसात चीन प्रमुख 3 घडामोडींमुळे चर्चेत आला.एक घडामोड चीन नेपाळ सबंधावर आधारित आहे.एक घडामोड चीन पाकिस्तान सबंधावर आधारित आहे. तर एक घडामोड चीन आँस्टोलीया या सबंधावर आधारित आहे. आता बघूया या घडामोड.
     तर सध्या जगात सर्वत्र कोरोना लशीकरण चालू आहे. तसे ते नेपाळमध्ये देखील चालू आहे. भारताकडून काही लसी नेपाळला मिळाल्या. मात्र भारतात कोरोनाची स्थिती गंभीर बनल्याने भारताकडून नेपाळला होणारा  लशींचा पुरवठा थांबला.  तेव्हा आपल्या नागरीकांना लशीकरण व्हावे यासाठी नेपाळने चीनची सरकारी मालकाची औषध कंपनी सायनो फ्राम कडून प्रती लस 10अमेरीका डाँलर या दराने खरेदी करण्यासाठी करार केला. या करारातील अटीनूसार हा दर गुप्त राखायचा होता.मात्र नेपाळच्या शोध पत्रकारांमुळे हा दर जनतेला माहिती झाला. चीनमार्फत आपला प्रभाव निर्माण करण्याचा हेतूने  नेपाळ आणि बांगलादेशला या दराकडून लस पुरवठा होत आहे. मात्र चीनच्या कर्जाचा पंज्यात अडकलेल्या श्रीलंकेला मात्र याच लसीसाठी 15 अमेरीकी डाँलर हा दर निश्चित केला आहे. ज्यामुळे श्रीलंकेमध्ये चीनविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडीमुळे चीन नेपाळवर काहीसा संतापला आहे. यावर नेपाळच्या सरकारमार्फत हा दर असावा का ?याबाबत कंपनीशी चर्चा सुरु असून दराबाबत काही ठरलेले नाही असे उत्तर दिले आहे.असो 

   पाकिस्तानच्या सुप्रसिद्ध ग्वादर बंदराचा हद्दीत चीनच्या मासेमारी करणाऱ्या नौकांमार्फत मोठ्या प्रमाणावर मासेमारी सध्या सुरु आहे. संपुर्ण पाकिस्तान एका वर्षात जेव्हढी मासेमारी करेल, तितकी मासेमारी दोन ते तीन दिवसात करण्याची या नौकांची क्षमता आहे. या मासेमारी मुळे आमच्या उरल्या सुरल्या रोजगारावर गदा आल्याचा आरोप स्थानिक जनतेकडून करण्यात येत आहे. चायना पाकिस्तान इकाँनाँमिक काँरीडारमुळे आमच्या रोजगारावर प्रचंड प्रमाणात बंधने आली..आता उरला सुरला रोजगार देखील यामुळे हिरावला जाण्याची स्थानिकांची भावना आहे. पाकिस्तान सरकारमार्फत सरकारला उत्पन मिळावे, यासाठी चीनला मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे.  या अस्या प्रकारामुळे पंजाब आणि खैबर ए पखतूनवा या प्रांतात काही विशेष परीणाम होणार नाही. मात्र सिंध बलूचिस्थानात या प्रातांत स्वातंत्र्याची भावना वाढीस लागेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मासेमारीला काही प्रमाणात बंधने यावी, म्हणून पाकिस्तानने काही बोटी ताब्यात घेतल्या,  मात्र काही तासानंतर त्या सोडून दिल्या. मास्यांवर विविध प्रक्रिया करण्याची चीनच्या मासेमारी बोटींची क्षमता आहे.असो 
आता बघूया तिसरी घडामोड .तर मित्रांनो. आँस्टोलियातून चीनला निर्यात होणाऱ्या वाइनवर चीनने तब्बल 218 टक्के आयात शुल्क लागू केले आहे. ज्यामुळे या वाइनची किंमत दोन ते तीन पट वाढली आहे. परीणामी त्यांची विक्री जवळपास शुन्यावर आली.ज्या विरोधात आँस्टोलिया जागतिक व्यापार संघटनेत चीनच्या विरोधात खटला दाखल करणार आहे.

आंतरराष्ट्रीय अर्थकारणात कधी कधी एखादा देश दुसऱ्या देशात बाजारपेठ काबीज करण्यासाठी तेच उत्पादन स्वतःच्या देशात ज्या किमतीत विकतो, त्यापेक्षा कमी किंमतीत दुसऱ्या देशात विकतो. ज्यामुळे त्या दुसऱ्या देशातील उत्पादक किंवा इतर उत्पादक त्यांचा दरासी स्पर्धा करु शकत नाही. याला वस्तू डम्प करणे म्हणतात. चीन या डम्पिगसाठी कुप्रसिद्ध आहे. हे टाळण्यासाठी आयातदार देश निर्यातदार देशाचा वस्तूवर कर लावू शकतो. चीन याच मुद्यावरुन आँस्टोलीयातील वाइनवर कर आकरत आहे. आँस्टोलीयाच्या मते चीनविरोधात काही राजकीय वक्तव्ये केल्यामुळे चीनने आकसातून हे कृत्य केले आहे. यात कोण बरोबर कोण चूक याचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेत होईलच .
चीन हा आँक्टोपससारखा विविध पायांनी आपला दबदबा निर्माण करत आहे. हेच या घडामोडीतून स्पष्ट होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?