काळ्या पर्वानंतरची 46 वर्षे

   

आजपासून 46 वर्षापुर्वीची गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एका काळ्या पर्वाची सुरवात होती ती. ज्यामध्ये तत्कालीन माध्यमांचा स्वातंत्र्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात संकोच करण्यात आला होता. वृत्तपत्रात काय छापायचे?काय छापायचे नाही. याचा निर्णय वृत्तपत्रातील संपादकीय मंडळ न घेता ते वर्तमानपत्राचे कार्यालय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे, त्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत असत. सत्ताधिकाऱ्यांचे सर्व विरोधक बंदीवासात बंदी होते. उत्तर भारतात मोठे पुरुष सोडा, लहान मुलांच्या देखील नसबंदी शस्त्रक्रिया जोरात सुरु होत्या.नागरीकांचे मुलभूत हक्क मोठ्या प्रमाणात गोठवण्यात आले होते. गुन्हेगारांचे निर्दलन करण्यासाठी अनेक कडक कायदे करण्यात आले होते.ज्याचा काहीसा गैर वापर देखील होत होता. विरोधक नसल्याने संविधानातील महत्तवाचे बदल या काळात करण्यात आले.आज या कालखंडास आपण आणिबाणी म्हणून ओळखतो. आणिबाणीची सुरवात होवून आज 25जून 2021रोजी  46 वर्षे झाली. सन 1975 जून 25 रोजी सुरू झालेली आणिबाणी पुढे  तेवीस महिने सुरु होती. 
        आणिबाणी उठल्यावर झालेल्या निवडणूकीत क्राँग्रेस पक्षाचा पराभव झाला. नर्मदेच्या उत्तरेकडे क्राँग्रेस पक्षाचा एक देखील खासदार निवडून आला नाही. आणिबाणीकाळात बंदीवासात असलेल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी तयार केलेल्या जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. या जनता पक्षात डावे कम्युनिस्ट, मध्यम विचारांचे पक्ष आणि  उजव्या विचारसरणीच्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा समावेश होतो. फक्त क्राँग्रेस विरोध या एकाच ध्येयाखाली एकत्र आलेल्या टोकाच्या विरोधी पक्षातील कार्यकर्ते नेत्यांमुळे या नव्या पक्षात अंतर्गत भांडणास लवकरच सुरवात झाली. आणि जनता पक्षाचे तूकडे झाले. आज आपण जे बिजू जनता दल,  लोकशक्ती जनता दल, राष्ट्रीय जनता दल असे विविध पक्ष बघतो, ते सर्व या फुटीची आठवण करुन देणारे पक्ष आहेत. जनसंघाचे कार्यकर्ते एकाच वेळी जनता दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कसे काय असू शकतात? हा प्रश्न डाव्या पक्षांमार्फत उपस्थित करण्यात आल्याने भांडणास सुरवात झाली.परीणामी दोन वर्षात पक्षच संपला आणि पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. जर हा प्रयोग यशस्वी झाला असता, तर अमेरीका, पश्चिम  यूरोपीय देशाप्रमाणे देशात मोजकेच पक्ष शिल्लक राहिले असते. मात्र भारताच्या नशिबात तो योग नव्हता
        गुजरात राज्यात विद्यार्थ्यांचा भोजनाच्या प्रश्नांवरुन वसतीगृहात सुरु असलेल्या आंदोलनाने देशव्यापी स्वरुप घेतले. जयप्रकाश नारायण यांनी विविध मुद्यांवरुन इंदिरा गांधीविरूद्ध आंदोलन सुरु केले.त्यातच 1972 च्या लोकसभेच्या निवडणूकीत बरेली लोकसभा मतदारसंघात निवडुन येण्यासाठी अयोग्य मार्गाचा अवलंब केला आहे, सबब त्यांची निवड रद्द करत त्यांना पुढील 6 वर्ष निवडणूकीस उभे राहण्याचा निर्णय इलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. मात्र तरी देखील इंदिरा गांधीनी सत्ता सोडली नाही त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशभरात असंतोष उफळून आला. या सर्व कारणाचा विचार करत भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट करण्यात येत

आहे, असे कारण देत इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लादली. काही वर्षापुर्वी अमेरीकेने लोकांसाठी खुल्या केलेल्या सरकारी कागदपत्रांवरून ही बाब काही अंशी खरी असल्याचे स्पष्ट झाले होते.
आजमितीस या घटनेची सुरवात होवून 46वर्षे पुर्ण झाली आहेत. तर आणिबाणी संपुन 44 वर्षे झाली आहेत. मात्र अजूनही राजकारणात अजूनही त्याचा वारंवार  संदर्भ येतो . यावरुन या प्रसंगाची दाहकता स्पष्ट होते. 
लोकशाहीची हत्या म्हणून याकडे बघीतले जाते.त्यानंतर भारतात एकदाही राष्ट्रीय  राजकीय आणिबाणी जाहिर करण्यात आली नाही. मी राजकीय आणिबाणी म्हणतोय हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सन.1999ला कारगील युद्धाचा वेळी थोड्या काळासाठी संरक्षणाच्या हेतूने राष्ट्रीय आणिबाणी जाहिर करण्यात आली होती. मात्र तीचे गंभीर परीणाम झाले नाहीत.सन 1999 सारखी आणिबाणी 1962साली चीन युद्धाचा वेळी आणि 1965 च्या पाकिस्तान युद्धाचा वेळी जाहिर करण्यात आली होती. मात्र आणिबाणी म्हटल्यावर आठवते ती25 जून 1975चीच आणिबाणि.इतकी तीची दहशत घृणा आपल्या समाजात आहे.
आजचे राजकारण त्या वेळच्या स्थितीपेक्षा पुर्णतः वेगळे आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होईल का ? याबाबत काहीही सांगता येणे अशक्य आहे. मात्र देवाने आपणास या  काळ्या अनुभवाची पुनरावृत्ती देवूच नये, असी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो,नमस्कार.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?