मानवा तूझे दिवस भरत आले आहेत!

   

  आपल्या महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरीवर्ग  चिंतेत सापडला असताना जगभरात विविध ठिकाणी हवामानाने मानवाचे दिवस भरल्याचे स्पष्ट संकेत दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे . .  कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसात  नोंदवण्यात आलेले तापमान हे याचीच साक्ष देतात  कँनडा सारख्या अन्यवेळी उन्हाळ्यात देखील 25 ते 30 अंश सेल्यीयस तापमान असणाऱ्या देशाच्या पश्चिम भागात 49.5 अंश सेल्यीयस तापमानाची नोंद झाली आहे. कँनडा या देशाच्या एक तृतीयांश भाग हा जगात सर्वात थंड भाग म्हणून परीचीत असलेल्या ध्रुवीय प्रदेशात मोडतो,हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
 कँनडा या देशाच्या ब्रिटीश कोलंबिया या राज्यात हा मजकूर लिहीत असताना तब्बल 145 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर संपुर्ण कँनडा देशात हा आकडा 300 च्या आसपास आहे. कँनडा सारख्या जगातील सर्वात मोठ्या 7अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाचा समुहातील अर्थात   जी 7 मध्ये मोडणाऱ्या देशात असी स्थिती आहे. हे विशेष. जगात राहण्यास उत्तम देशांचा निर्देशांक अर्थात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये सुद्धा  कँनडा पहिल्या
दहामध्ये येतो हे आपण लक्षात घेयला हवे. त्या देशात उष्माघाताने 145 जणांचा बळी जातो, हवामान बदलाच्या पेटाऱ्यात काय भीषण वास्तव मांडून ठेवलं आहे. याची दाहकता लक्षात येयला हे पुरेसे आहे. कँनडा, अमेरीका सीमेवर पश्चिमेला जास्त हवेचा प्रदेश तयार झाल्याने गरम वायू वहायला लागले.परीणामस्वरुप त्या ठिकाणी ही स्थिती निर्माण झाली, असे सांगण्यात येत आहे. ही स्थिती त्या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसांपासून आहे. रशिया मध्येसुद्धा सध्या काहीसे अधिक तापमान आहे. या वर्षी जगभरात विविध ठिकाणी जास्त तापमान नोंदवले आहे.कँनडा देशात या आधी बहुतांश वेळ थंड वातावरण असल्याने अनेक ठिकाणी वातानुकलन यंत्र आणि फँनची सोय नाहीये.त्यामुळे मृत्यू जास्त झाल्याचे बोलले जात आहे.कॅनडामध्ये नोदनवण्यात आलेले ते तापमान आतापर्यतचे सर्वोच्च आहे 
हे कमी की काय म्हणून आपल्या शेजारच्या पाकिस्तानातील सिंध प्रातांत असणाऱ्या जकोदाबाद  या गावी 52 अंश सेल्यीयस तापमान गुरूवारी नोंदवण्यात आले ,. हे जकोदाबाद शहर सिंध बलूचीस्थान आणि पंजाब या प्रांताच्या सीमा एकत्र येतात त्याचा जवळ आहे. पाकिस्तानच्या भुगोलाचा विचार करता पंजाबमधील वातावरण स्वर्ग आहे. पुरेसा पाउस सुपिक जमिन मध्यम तापमान . तर बलूचीस्थान मधील वातावरण नरकासमान आहे  कमी पाउस कोरडी हवा अन्य प्रांताच्या तूलनेत जास्त तापमान . तर सिंध सर्वच बाबतीत मध्यम आहे. हा  मुद्दा
विचारात घेता वाढत्या तापमानाचा प्रदेश वाढणे मानवास हितकारक नाही. हे सहज लक्षात येते.हे तापमान आद्र तापमानापक वापरून मोजलेले आहे [ जेव्हा तापमापकाच्या पारा असलेल्या खालच्या अर्ध्या  भागात ओले फडके बांधून तापमान मोजले जाते तेव्हा तो आद्र तापमानापक असतो त जेव्हा असे ना करता तापमान मोजले जाते त्यावेळी  शुष्क तापमापक म्हणतात आद्र तापमानापका मुळे हवेतील आद्रता देखील समजते  याउलट स्थिती शुष्क तापमापकात असते ] आद्र तापमानापकाचे जेव्हा तापमान 35 अंश सेल्सियस असते तेव्हा मानवास घाम येयला सुरवात होते घामावाटे शरीर तापमान कमी करण्याचा प्रयत्न करते आज नोंदवलेले तापमान 52 अंश सेल्सियस आहे  सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासामागे हवामान बदल हे एक महतवाचे कारण आहे हे आपण लक्षात घेयला हवे 
 विविध धर्मात पृथ्वीचा  विनाश कोणत्या प्रकारे होणार याचे विविध प्रकारे वर्णन करण्यात आले आहे याचा आढावा घेतल्यास  इस्लाम या धर्मियांचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणानुसार जगाच्या अंतासमयी समुद्राच्या पाण्याच्या वाफ होण्यापर्यँत तापमान वाढेल ज्यामुळे  पापी आत्मे यातना भोगतील असे वर्णन आहे सध्याची स्थिती बघता याची सातत्याने आठवण येते म्हणूनच म्हणावेसे वाटते  मानवा तूझे दिवस भरत आले आहेत! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?