स्वामी विवेकानंद भगव्या कपड्यांना नवा अर्थ देणारे व्यक्तीमत्व


       स्वामी विवेकानंद यांचे नाव ऐकलेले नाही, असा खचितच कोणी भारतात असेल.येत्या रविवारी अर्थात 4 जूलै त्यांची 119वी पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली. 
               स्वामी विवेकानंद यांनी संन्यास्याश्रमाला व्यापक अर्थ दिला. संन्याशी म्हणजे समाजापासून दूर झालेला मोक्ष मिळण्यासाठी सर्व परीत्याग करुन, इश्वरभक्तीत गुंतलेला व्यक्ती ही ओळख पुसून, संन्यासी म्हणजे समाजाला प्रचंड प्रमाणात विविध प्रकारे मदत करणारा व्यक्ती ही नवी ओळख दिली. त्यासाठी त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांची उभारणी केली. मी स्वतः पुण्यात असताना रामकृष्ण मठाच्या विविध समाजोपयोगी सेवांचा फायदा घेतला आहे. अत्यंत माफक दरात वैद्यकीय सेवांसह विविध प्रकारच्या
कार्यामुळे  युवकांची उन्नती होण्यासबंधी विविध उपक्रम रामकृष्ण मठाद्वारे राबवले जातात. मी रामकृष्ण मठाच्या जानेवारी महिन्यातील युवा शिबिरास तसेच त्यावेळेस दर रविवारी युवकांसाठी असणाऱ्या कार्यक्रमांस उपस्थित राहत असे.( काही वर्षापुर्वी त्यांचाकडून दर रविवारचा उपक्रम बंद करण्यात आला आहे) तेथील स्वामीजी सहजसोप्या भाषेत युवकांना ताण तणाव सहन करण्याचा क्षमता विकसीत करणे , भावनिक अशांतता कसी हातळायची? यावर मार्गदर्शन करत.
उपाशीपोटी असणाऱ्या व्यक्तीस धार्मिक ज्ञान देण्याऐवजी प्रथमतः  त्याचे पोट भरण्याची गरज असल्याची शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आणली. उपाशीपोटी धर्मोपदेश करुन उपयोग नाही. सबंधिताचे लक्ष धर्मोपदेशनाऐवजी आपले रिकामे पोट कसे भरणार ?याकडेच असणार .रिकामे पोट भरण्यासाठी धर्मोपदेशाप्रमाणे न वागता त्याचा विपरीत आचरण देखील त्यांचाकडून घडू शकते याची जाणीव त्यांना होती.  संन्याशी यासाठी खुप मदत करु शकतात, हे लक्षात घेवून आपले अध्यात्मिक  गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या नावे त्यांनी संघटन उभारले. रामकृष्ण मठातर्फे अनेक ग्रामीण भागात आरोग्याचा शिक्षणाच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यांचा युवकविषयक कार्याचा वरती उल्लेख केलाच आहे. फक्त भारतातच नव्हे तर बांगलादेश.या इस्लाम धर्म प्रमुख धर्म असणाऱ्या देशात ढाका आणि चितगाव येथे रामकृष्ण मठाच्या शाखा आहेत.तर रामकृष्ण मिशनद्वारा प्रामुख्याने पाश्चात्य देश अमेरीका येथे भारतीय तत्वज्ञानविषयक कार्य केले जाते.पुणे येथील दांडेकर पुल परीसरात असणाऱ्या  रामकृष्ण मठाद्वारे पुण्यातील गोरगरीबांच्या शिक्षणासाठी कार्य केले जाते. ते शाळेत टिकावेत यासाठी त्यांना स्वखर्चाने मोफत शिजवलेले अन्न देण्यात येते. मी दिलेले हे उदाहरण प्रातनिधीक आहे, रामकृष्ण मठाच्या अन्य शाखेद्वारे सुद्धा असेच उपक्रम राबवले जातात. मात्र मी पुण्यातील कार्य अत्यंत जवळून बघीतले असल्याने त्याचा उल्लेख केला आहे. एक दोनदा त्यांना भुगोल विषयाविषयी मदत देखील केल्याचे मला आठवते आहे. 
हे सर्व कार्य केले जाते ते  रामकृष्ण मठातील संन्याश्यांमुळे .या संन्याश्यामुळे भगव्या रंगाला एक वेगळाच व्यापक अर्थ मिळाला आहे हे नाकारता येत नाही. कुटुंबापाचे पाश तोडत मोक्षाच्या वाटेवर असणाऱ्या वर्गास त्यांनी इश्वरसाधना करत समाजोपयोगी कार्यात गुंवलेले. त्यामुळे संन्यासधर्माला एक चांगला  अर्थ निर्माण झाला. काही वेळेस हेटाळणी होणारा हा वर्ग अभिनंदनास पात्र ठरला.आजमितीस स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून  हजारो संन्यासी आध्यात्मिक उन्नतीबरोबरच समाजोपयोगी कार्यात आपले योगदान देत आहे.
      स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना एकत्रीत राहुन बलोपसाना करण्याची शिकवण दिली. तरुणांना यामुळेच गीता अधिक उत्तम कळेल असे त्यांचे मत होते. गीता वाचण्याऐवजी फुटबाँल खेळण्याचा त्यांनी तरुणांना दिलेला सल्ला याचेच प्रत्यंतर आहे. फुटबाँल हा सांघिक खेळ आहे, तसेच तो खेळण्यासाठी चांगले शरीर लागते.गीता ही कर्माची शिकवण देते, त्यामुळे तरुणांनी गीता वाचण्यापेक्षा फुटबाँल खेळण्याचा सल्ला दिला.यातून त्यांचे नेर्तुत्व कसे होते हे आपणास समजते, असे मला वाटते.
    स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत विवेकानंद केंद्रासारख्या अनेक संस्था आज  खेडोपाडी मोठे समाज कार्य करत आहेत. मग खेडोपाड्यातील तसेच आदिवासी समाजातील व्यक्तीना वाहन दूरुस्तीचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे , तसेच त्यांना आरोग्याचा सेवा पुरवणे  हे असो . या सर्व कार्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रनिर्माणाचे तत्व आपणास पदोपदी दिसते.
  स्वामी विवेकानंद यांचे कार्य प्रचंड आहे. मात्र हे समाजमाध्यमांवरील लेखन आहे. यास विस्ताराचा मर्यादा आहेत.वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे मोठे लेखन या माध्यमांवर करता येत नाही.लोकांना कितीवेळेस रीड मोअर करायला लावायचे यास मर्यादा आहेत.तरी इथेच आपली रजा घेतो , नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?