स्पर्धा परीक्षेच्या नावाने .....

 

    मुख्य परीक्षा होवून दोन वर्षे झाली तरी, परीक्षेचा अंतीम टप्पा असलेल्या मुलाखतीचा टप्पा होत नाही, यामुळे निराश होत रविवारी पुण्यात भावी अधिकारी होवू शकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315आणि316 मध्ये राज्य प्रशासन सेवेतील उपजिल्हाधिकारी पर्यतचे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना राज्य सरकारकडून करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाची परीक्षा सदर तरुण देवू इच्छित होता.या आत्महत्येने यापुर्वी अनेकदा चर्चिले गेलेले मुद्दे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.
       घटनेत स्पष्ट उल्लेख असून देखील आयोगाची कार्यक्षमता फारशी उत्तम नसणे. वेळोवेळी प्रश्नपत्रीकेत काही चुका असणे. परीक्षा वेळेवर न घेणे,निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे न देणे आदी गोष्टी आयोग आणि शासनाकडून फार पुर्वीपासून होत आहे. सध्याच्या कोरोनाकाळात यात थोडी वाढ झाली इतकेच. यामुळे खेडोगावातील सर्वसामान्य गोरगरीब भरडला जातो..आज जाहिरात निघेल उद्या जाहिरात निघेल या आशेवर  घरातून आलेल्या पैस्यावर कसीबसी गुजराण करत अभ्यासिकेत तो अभ्यास करत असतो. पुर्व परीक्षा झाल्यावर वेळेत निकाल लावून पुढील प्रक्रिया करणे आयोगाला शक्य होत नाही. परीणामी त्याचा शहरातील मुक्काम वाढतो.मात्र आर्थिक ताकद जेमतेमच असल्याने त्याचा अतिरीक्त ताण त्याचावर येतो. सन 2000च्या आसपास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पेपर फुटले होते. आजमितीस हा प्रकार होत नसला तरी प्रश्नपत्रीकेतील चूका कायम आहे. या चूकांमुळे आपले गुण कमी होवून आपले नाव यादीत येण्यापासून थांबवले तर जाणार नाही. ही भिती त्यास असते.
   एकीकडे आयोगाच्या या चूकांमुळे भावी अधिकारी भरडला जात असताना त्याचा स्वतःच्या चूका देखील त्याचा नाशास कारणीभूत ठरतात. ही स्पर्धा परीक्षा आहे, यासाठी तो स्वतः जसा जिवाच्या आतंकाने प्रयत्न करतोय तसा प्रयत्न इतर देखील करत आहेत. तसेच उपलब्ध जागा आणि उत्सुक याचा विचार करता, आपली तयारी कितीही उत्तम असली तरी कदाचित तो निवडण्यापासून रोखला जावू शकतो. जर खुप तयारी करुनसुद्धा नशिबाने तो प्रशासनात जाण्यापासून रोखला गेला तर दुसऱ्या पर्याय म्हणून तो काय करु इच्छितो याची तयारी करण्यास तो मागे पडतो. माझ्यामते स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच त्याने याबाबत विचार करायला हवा. जेव्हा
स्पर्धा परीक्षेत सातत्याने अपयश आल्याने तो अन्य उपायांबाबत विचार करायला लागतो.तेव्हा काहीसा उशीर झाल्याने प्रचंड अस्या निराशेचा गर्तेत जातो
  . मी स्वतः युपिएससीच्या नागरी सेवाचा दोनदा प्रयत्न केला आहे. हे करत असताना शिक्षण न थांबवल्याने सदर काळात  युपिएससी ची तयारी करत असतानाच मी भुगोल आणि पत्रकारीता या विषयात मास्टर्स केले. आजमितीस मी याच आधारे पोट भरत आहे. जर आपणास पारंपरिक विद्यापीठातून शिक्षण घेणे अवघड वाटत असेल तर इग्नु किंवा वाय सी एम ओ यू सारख्या विद्यापीठातून शिक्षण सुरुच ठेवावे. मात्र स्पर्धा परिक्षेला किमान.पातळी पदवीची आहे. म्हणून पदवीपर्यतचे शिक्षण घेवून या अनिश्चिततेच्या सागरात उतरु नये. जर उतरला आणि अपयश आल्यास तूमचे हाल कुत्र देखील खाणार नाही, हे नक्की. 
माझ्या आतापर्यतचा अनुभवांनुसार सांगतो, सध्या नागरी सेवांखेरीज अन्य शासकीय परीक्षांकडे वळणे गरजेचे
आहे. जसे इकाँनाँमिक स्टँटेस्टिक ,मँथस् या विषयात आपण जर मास्टर्स केल्यास आपणास इंडियन.इकाँनाँक्सिस सर्व्हिसमध्ये प्रवेश करु शकत.इंडियन इकाँनाँक्सिस सर्व्हिसमध्ये (IES) जर कमी वयात प्रवेश केल्यास आपण रिझर्व बँकेमध्ये गर्व्हनरपदापर्यत पोहोचू शकतो. मी IES हे उदाहरण प्रातनिधीक स्वरुपात दिले आहे. अस्या अनेक परीक्षा आहेत. ज्यामुळे सरकारी नोकरी मिळू शकते.
 रविवारी झालेल्या आत्महत्येसारखा प्रयत्न कोणी करु नये. कारण भा रा. तांबे यांच्या जन पळभर म्हणतील हाय हाय या कवितेसारखी आपली स्थिती होईल. तेव्हा नो सुसाइड हे लक्षात असू द्यावे. बाकी एजाँय द लाइफ !☺️😊

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?