भयानक वास्तवाकडे वाटचाल


आपल्या भारतात तसेच महाराष्ट्रात अनेक राजकीय लाथ्या उथाळ्यांनी वातावरण भंडावून सोडले असताना भारताच्या पश्चिमेकडील एका देशात फार तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील जनता वेगाने मध्ययुगाकडे वाटचाल करत आहे. जर मध्ययुगात हा देश पुर्णतः पोहोचला तर त्याचे विपरीत परीणाम काश्मीर सह समस्त भारताला भोगावे लागतील. सध्या विविध आंतरराष्ट्रीय माध्यमात येणाऱ्या बातम्यांचा विचार करता ही स्थिती येत्या काही आठवड्यात फार उशीराचा विचार केला तर महिन्यात येवू शकते.मात्र  टायटँनिक या चित्रपटात दाखवलेल्या प्रमाणे जहाज बुडत असताना देखील शांतपणे संगीत वाजवण्यात दंग असलेल्या लोकांप्रमाणे भारतीयांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असल्याने याबाबत आपणाकडे विचारमंथन करण्यात येत नाहीये.(तसा तो आपला राष्ट्रीय स्वाभाव आहे. भारताच्या इतिहासात आपणास अनेकदा त्याचे प्रत्यंतर दिसत) मी बोलत आहे अफगाणिस्तानविषयी. तिथे अत्यंत वेगाने वाढणाऱ्या तालीबानी प्रभावाविषयी. 
या वर्षी 1मे पासून अमेरीकन.सैन्य अफगाणिस्तानमधून टप्याटप्याने माघारी जात असताना तालीबानच्या ताब्यातील प्रदेश वाढत आहे. जूलै च्या पहिल्या आठवड्यापर्यत एक तृतीयांश अफगाणिस्तान तालीबानच्या घश्यात गेला आहे. जूलैच्या पहिल्या आठवड्यात तर त्यांचा जोर वेगाने वाढलाय.  जेव्हा देशाच्या 90%.प्रदेशावर तालीबानचे नियंत्रण होते. राजधानी काबूल तालीबानकडे होती..तेव्हा तालीबानच्या ताब्यात नसणारे आणि सातत्याने तालीबानला विरोध करणारे कुर्दीश लोकांची वस्ती असणारे बादक्षन आणि ताखान.हे प्रांत आजमितीस तालीबानच्या नियंत्रणात आहे.बादक्षन या प्रांताची सीमा वाखान काँरीडाँर मार्गे गिलगीट बाल्टिस्तानशी आहे. अमेरीकेने या आधीच जाहिर केल्याप्रमाणे येत्या 11सप्टेंबर पर्यत अमेरीका अफगाणिस्तानातून पुर्णत निघून जाणार आहे..त्यानंतर सध्याचे कमकुवत अफगाणि लष्कर तालीबानपुढे सपशेल माघार पत्करेल.हे सुर्यप्रकाश्याईतके स्पष्ट आहे.
तालीबानी मध्ययूगीन धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत. जेव्हा 1996 साली त्यांची अफगाणिस्तानवर सत्ता होती ..तेव्हा तेथील जनतेला छोट्यासा अपराधासाठी  सुद्धा मरणासंपन्न शिक्षा देण्यात आल्या.ज्यातून महिला देखील.सुटल्या नाहीत. महिलांना सार्वजनिकरीत्या चाबकाचे फटके देणे, पुरुषांना फाशी देणे या शिक्षा त्यावेळेस
अफगाणिस्तानी लोकांनी भोगल्या आहेत.
 आपल्या फायद्यासाठी पाकिस्तान तालीबानला समर्थन देते.पाकिस्तानला साह्य ठरेल अस्या भुमिका.तालीबानी सरकार घेत असल्याने अफगाणिस्तानला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचा राग पाकिस्तान आळवते. जर तालीबानचा प्रभाव खुपच वाढला तर पाकिस्ताननेच  अमेरीकेच्या मदतीने तयार केलेला हा राक्षस गिलगीट बाल्टीस्तानमार्गे काश्मीरमध्ये दाखल होवू शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानमधील घडामोडी आपणास महत्तवाचा आहेत. मात्र आपली प्रादेशिक माध्यमे कोणत्या बातम्या दाखवत आहे, हे आपणास माहिती आहेच. इंग्रजी माध्यमे काही प्रमाणात या विषयी बोलत असले तरी त्यांचा वाचक प्रेक्षक वर्ग मर्यादित आहे, हे पण सर्वश्रूत आहे. त्यामुळे माझा हे मराठीत सांगण्याचा प्रयत्न.होता. जो आपणास आवडला असेल , असे मानून सध्यापुरते थांबतो, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?