बातमीतील पाकिस्तान [भाग 11 ]

     

आपल्या भारतात  केंद्रीय मंत्रिमंडळातील बदल , इंधनाचे वाढते दर  आणि या दरांमुळे वाढलेली महागाई , पावसाशी संबंधित  तसेच कोरोना लसीकरणाबाबत येणारी विविध आकडेवारी याच्या बातम्या माध्यमांमध्ये येताना आपल्या भारताचे शत्रू राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये 3 घडामोडी घडल्या . यातील दोन गोष्टी प्रत्यक्ष आपल्या भारताशी संबंधित आहेत तर एका गोष्टीशी त्याचा अप्रत्यक्ष संबंध आहेत . त्यामुळे त्या गोष्टी  माहिती  अत्यावश्यक आहे .चला तर मग जाणून घेउया या त्या गोष्टींविषयी . 
  आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सुद्धा FATFच्या ग्रे यादीत टाकावे असी मागणी पाकिस्तानकडून जोरदारपणे करण्यात येत आहे. त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतात सुद्धा त्याचा पैसा दहशतवादासाठी वापरतो, असी सबब त्यासाठी पाकिस्तानकडून देण्यात येत आहे. पाकिस्तानने सयुक्त राष्टसंघाच्या सुरक्षा समितीतील कायमस्वरुपी सदस्यांकडे【P5】याबाबत मागणी केली आहे. लवकरच तो FATFकडे याबाबत तक्रार करेल.असी आशा आंतरराष्ट्रीय राजकारणातील तज्ज्ञ करत आहेत.FATF च्या कार्यप्रणालीनूसार देशातील काळा पैसा गैर मार्गाने दहशतवादी कारवायांसाठी वापरल्यास
हाफिज सय्यद 
कारवाई होते. भारतातील काळ्या पैसाबाबतचे कायदे कडक आहेत.किंबहुना याच कायद्यांमुळे जगाने भारताला FATFचे सदस्यतत्व देवू केले होते. सध्या FATFचे सदस्य 37देश आणि दोन प्रादेशिक संघटना आहेत. यातील चीन,तूर्की ,मलेशिया सौदी अरेबिया आणि आखाती देशांची संघटना है   5 सदस्य सोडल्यास सर्व जण भारताच्या बाजूचे आहेत, असे द हिंदूच्या बातमीत म्हटले आहे.
   पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर वरून  India sponsored terrorism असा  स्पष्टपणे उल्लेख करत जगाने पाकिस्तानमधील या दहशतवादाची दखल घेण्याची गरज असल्याचे ट्विट केले आहे . इम्रान खान याचा या बाबत निषेध करावा तितका कमीच आहे. दुसऱ्या देशात दहशतवाद पसरवतो त्याच देशाने दुसरा देश आमच्या देशात दहशतवाद पसरवतो असे अधिकृतरित्या म्हणणे हास्यास्पदच नव्हे नाही का ! जगाने ज्यास आंतराष्ट्रीय दहशतवादी म्हणून मान्यता दिली आहे त्या हाफिज सय्यद याच्या लाहोरमधील  घराजवळ  23 जूनला बाँम्बस्फोट झाला. ज्यात 3जण मृत्युमुखी पडले. यासाठी एका देशाच्या गुप्तचर संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार यासाठी भारताचा हात असल्याचा हास्यास्पद दावा यात इम्रान खान याने केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पर्यत एकदाच 2014साली एकदा वाघा सीमेनजीक झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या हानीबद्दल संवेदना व्यक्त करताना पाकिस्तान आणि ,terrorism या दोन शद्बांचा एकत्रीत वापर एकाच ट्टीटमध्ये केला आहे. तो देखील संवेदना स्पष्ट करण्यासाठी .मात्र इम्राख खान याने
इम्रान खान याचे वादग्रस्त विधान 
तोडलेल्या ताऱ्यासारख्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  वापर केलेला नाही. या ट्टीटचा करावा तितका निषेध कमीच आहे. कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांनी ट्टिटरसारख्या माध्यमांद्वारे मांडलेले मत हे त्या देशाचे अधिकृत मत समजले जाते. या ट्टिटवरुन या देशाची अधिकृत  भुमिका काय आहे, हे समजते.जगाने दिलेले पुरावे हफिज सय्यद यास दहशतवादी ठरवण्यास पुरासे नाहीत, असे कारण देत पाकिस्तान त्याचा विषयी कारवाई करत नाहीये . याउलट त्याची समाजसेवक असी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करतो.असो 
     आता बघूया तिसरी घडामोड तर रशिया पाकिस्तानात कराची (सिंध) ते कसूर(पंजाब) या दरम्याननैसर्गिक वायूंच्या वहनासाठी बांधू इच्छित असणाऱ्या  पाईपलाईनला पाकिस्तानने लाल सिग्नल दिला आहे.2014साली पाकिस्तानला प्रगतीसाठी नैसर्गिक वायूंची प्रगतीसाठी गरज असल्याने त्यांनी रशियाशी संपर्क साधला. पाकिस्तानात इंधन वहन करणाऱ्या पाईपलाईन समुद्रकिनाऱ्यापासून पाकिस्तानचा समृद्ध प्रांत पंजाबमध्ये नसल्याने त्या देखील रशियाकडून बांधण्याचे पाकिस्तानने ठरवले. मात्र काही दिवसापुर्वी या अन्य देशांकडून बांधून घेण्याऐवजी स्वतः.बांधाव्या असे पाकिस्तानने ठरवले आणि त्यांनी रशियाला नकार कळवला .याचा मार्ग देखील आता बदलला आहे आता कराचीहून ही पाईपलाईन लाहोरला जाईल.
   तर या होत्या गेल्या काही दिवसातील पाकिस्तानमधील.घडामोडी .त्या तूम्हाला आवडल्या असतील असे मानून सध्यापुरते थांबतो,नमस्कार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?