भयानक वास्तवाकडे वाटचाल(भाग3)

 

 सध्या आपल्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात कमी पावसामुळे चिंता निर्माण केली असताना जगात सुद्धा एक मोठी चिंता निर्माण होत आहे. ती चिंता आहे अफगाणिस्तानातील तालीबानचा वाढता प्रभाव. गेल्या आठवड्यापासून याबाबत 3 प्रमुख घडामोडी घडल्या. ज्यातील दोन भारताशी प्रत्यक्ष संबधीत आहेत, तर एक अप्रत्यक्ष संबधीत आहे. या सर्व घडामोडी एक जागरुक नागरीक आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेवूया या घडामोडी .
तर अफगाणिस्तानातील भारताचा कान्सुलेट बंद करणार नाहीत असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहिर होवून तीन ते चार दिवस होत नाही तोच रविवार11 जूलै रोजी सायंकाळी अफगाणिस्तानमधील भारताच्या कंदहार कान्सुलेटमधून 50 भारतीयांना माघारी बोलवल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आले.【 एखाद्या दूसऱ्या देशात आपल्या देशाचे पुर्ण अधिकार असलेले  राजनैतिक कार्यालय  असल्यास त्यास एँबसी म्हणतात. त्या ठिकाणी अँबेसिडर  हा अधिकारी असतो. याठिकाणी आपल्या देशात जाण्यासाठी लोकांना
व्हिसा देणे ,आपल्या देशातील नागरीकांना मदत केंद्रे उभारणे तसेच अन्य परराष्ट्र संदर्भात कार्ये होतात. याचे छोटे स्वरुप म्हणजे कान्सुलेट . येथे कोणीही मोठा अधिकारी नसतो,एँबेसिचा अंतर्गत येणारा प्रदेश मोठा तसेच, कामाचे स्वरुप  मोठे असल्यास कान्सुलेट उभारले जाते. उच्च न्यायालयाचे खंडपीठ किंवा कृषी उत्पन बाजार समितीचे उपबाजार आवार असते त्याच प्रकारे कान्सुलेट आणि एँबसी यांचे कार्य असते.] या कान्सुलेटमधील स्थानिक कर्मचारी वर्ग तसाच असल्याने ती बंद करण्यात आलेली नाही, स्थानिक कर्मचाऱ्यांचा मार्फत तीचे कार्य सुरुच असेल असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहिर केले आहे. भारताची एँबसी काबूलमध्ये आहे  ती तसीच सुरु राहणार आहे. गेल्या वर्षापर्यत मझीरे शरीफ ,कंदहार हेरात, जलालाबाद भारताचे या चार ठिकाणी कान्सुलेट होती. त्यापैकी  हेरात, जलालाबाद या दोन कान्सुलेट या आधीच कोरोनाचे कारण देत भारताकडून बंद करण्यात आल्या आहेत.सध्या भारताची मझीरे शरीफ येथील कान्सुलेट आणि काबूल मधील एँबसी फक्त चालू आहे.
भारताने अफगाणिस्तानामध्ये केलेली गुंतवणूक पुर्णतः.पाण्यात गेली असल्याचे पाकिस्तानमधील लष्कराने म्हटल्याचे वृत्त द हिंदूने दिले आहे. भारताने अफगाणिस्तानामध्ये प्रचंड गुंतवणूक केलेली असली तरी भारताच्या जिडीपीच्या तूलनेत ती रक्कम कमी आहे. त्यामुळे याची मोठी झळ भारताला बसणार नाही. मी या आधी अफगाणिस्तानमधील भारताच्या गुंतवणूकीबाबत लिहले आहे. माझ्या ब्लाँग चा अफगाणिस्तान या
टँगखाली तूम्ही ते वाचू शकतात. 
    रशियाने अफगाणिस्तानमधील उत्तर भागाला तालीबानपासून वाचवण्यासाठी 1996 ते 2001 पर्यत कार्यरत असणाऱ्या नांर्दन कमांडला पुन्हा एकदा पुनर्जीवीत करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यावेळेस रशिया, अमेरीका चीन भारत कझाकीस्तान, उझबेकिस्तान तूर्की, तजाकिस्तगन यांचे सैन्य उभारण्यात आले होते. ज्याचा बराच सकारात्मक परीणाम त्यावेळी दिसला होता.याच घडामोडीचा एक भाग म्हणून रशिया त्यांचा तजाकिस्तानमधील लष्करी तळाचे सामर्थ्य वाढवत आहे. तजाकिस्तानची सीमा अफगाणिस्तानला लागून असल्याने तेथून अफगाणिस्तानमध्ये येता येवू शकते. हा भाग गिलगीट बाल्टीस्तान आणि सिंकीयांग ला लागून असल्याने भारत आणि चीनला हा प्रदेश तालीबानपासून दूर रहाणे आवश्यक आहे.,
अफगाणिस्तानमधील स्थिती झपाट्याने बदलत आहे. तेथील स्थिती वारंवार आपणास मी सांगेलच तूर्तास इतकेच।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?