नैसर्गिक आपत्ती आणि आपण

 

  सोमवार 12जूलै रोजी उत्तर भारतासाठी काळा दिवस ठरला. राजस्थानमध्ये  विविध ठिकाणी वीज कोसळून अनेक निष्पाप जीव प्राणास मुकले. तर हिमाचल प्रदेशातील धरमशाला परीसरात ढगफुटी होवून निसर्गाने आपले रौद्ररुप दाखवले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राणास मुकलेल्या जीवांना प्रथमतः भावपुर्ण आदरांजली. तसेच या दुर्घटनांमध्ये आपले आप्तेष्ठ मित्रपरीवार तसेच आर्थिक नुकसानीला सामोरे गेलेल्या व्यक्तींना आपापले दुःख पचवण्याची ताकद इश्वर त्यांना देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना .
सध्या आपल्या महाराष्ट्रात काही मान्सुमचा पाउस काही भागात मंदावला असला तरी राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात त्याने बऱ्यांपैकी जोर धरला आहे.  सोमवारी घडलेल्या घटना त्याचेच प्रत्यंतर आहे.
   प्रामुख्याने पावसाचा सुरवातीच्या काळात किंवा शेवटी वीज पडण्याचा घटना घडताना दिसतात. या काळात तप्त हवा आणि थंड हवा आकाशात एकमेकांना धडकतात. तप्त हवेचा दाब कमी  झाल्याने वर वर जाण्याचा प्रयत्न करतो तर थंड हवा दाब जास्त झाल्याने खाली येण्याचा प्रयत्न करते. यासर्व घडामोडीत ढगांमध्ये विद्युतप्रवाह निर्माण होतो. तो कसा होतो, याबाबत अजूनही शास्त्रज्ञांना माहिती नाही. एकदा वीज निर्माण झाल्यावर ती आर्थिंग होण्यासाठी जमिनीकडे झेपावते.या काळात तीला हवेत विरोध जास्त होतो, तर उंच मिनारे ,झाडे यांच्याकडून कमी विरोध होतो. इतर कोणत्याही प्राण्याप्रमाणे विद्यूतेचीही कमी विरोध (रेझीटन्स) होणाऱ्या गोष्टीतून वाहण्याची प्रवृत्ती असते.परीणामी यावर वीज पडते. 
    जर याचा नजीक प्राणी मानव असल्यास सर्किट पुर्ण झाल्याने वीजेचा प्रवाह त्यांचा मृत्यू होतो.(अधिक
माहितीसाठी:रेल्वेची वीजवाहक तार डब्यावर पडल्यावर सुद्धा.सर्किट पुर्ण न झाल्याने आतील लोकांना काही होत नाही) काल जयपूर नजीक झालेल्या दुर्घटनेत सुद्धा किल्याचा उंचावर असलेल्या टेहळणी बुरूजावर  वीज पडून16 लोकांचा मृत्यू झाला आहे.असे एनडिटिव्हीचा बातमीत सांगितले आहे. सर्वसाधरणपणे मान्सुम येताना किंवा जाताना पडणाऱ्या पावसामध्ये वीजा पडतात.त्यावेळेस विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याकाळात उंच मिनारे झाडे,धातूचे खांब यापासून दूर रहावे गेल्या वर्षभरात 1600जणांचा बळी वीजा पडुन झाल्याचे इंडीया टुडेच्या अहवालामध्ये सांगितले आहे. हे 1600जीव वाचवता येणे सहजशक्य होय. माध्यमांनी त्या काळात जनजागृती करायला हवा.सध्या ज्या प्रकारे.फोन केल्यावर कोरोनाची टेप ऐकू येते, तसीच टेप लावल्यास उत्तम .
आता बघूया दुसरी घडामोड.
     तर हिमाचल प्रदेशातील धरमशाला परीसरात ढगफुटी होवून मोठी हानी झाली आहे. प्रामुख्याने डोंगराच्या प्रदेशातच ढगफुटीच्या घटना आपणास दिसतात. गेल्या काही  वर्षांपासून याचा घटना वाढत आहे. तसेच या घटना एका ठराविक प्रदेशातच होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे त्सुनामीच्या वेळी ज्या प्रकारे सावधगिरीची  यंत्रणा उभारली तसीच या ठिकाणी उभारणे आवश्यक आहे.  मित्रांनो प्रत्येक तापानास हवेत किती पाण्याची वाफ( बाष्प) सामावले जावू शकते, याचा मर्यादा आहे .ही मर्यादा ओलाडल्यास अधिकची पाण्याची वाष पावसाचा रुपात बाहेर पडते.(पाउस पडण्यापुर्वी आपणास अनेकदा उकडते ते यामुळेच) जेव्हढे  जास्त तापमान तेव्हढी  पाण्याची वाफ (बाष्प) सामावण्याची क्षमता जास्त जेव्हढे तापमान कमी तेव्हढी पाण्याची वाफ ( बाष्प )सामवण्याची क्षमता कमी असा हिशोब आहे.
पर्वतीय प्रदेशात हवेचे तापमान कमी असते. त्यातही काही कारणाने ही क्षमता अचानक प्रचंड कमी होते. त्यामुळे हे अतिरीक्त बाष्प अत्यंत कमी वेळात वेगाने खाली येते. जोराचा मुसळधार पाउस पडतो.परीणामी अत्यंत कमी
वेळात आसपासच्या प्रदेशात महापूर येतात. त्यामूळे या महापूराचा सामना करत तेथील जनतेला मदत करत मुळ ठिकाणी पोहोचावे लागते.त्या ठिकाणी कमी वेळात जास्तीत जास्त पाउस पडल्याने परीस्थिती वाईट झालेली असते. एखाद्या मोठ्या उंचावर असलेल्या टाकीतून वेगाने पडणाऱ्या पाण्याचा खाली उभे राहिल्यास जसा अनुभव येतो, त्याच प्रकारचा मुळ ढगफुटीत असणाऱ्या प्रदेशात येतो. त्याठिकाणी वेगाने विना थांबा पडणाऱ्या पावसाच्या थेबांनी मोठ्या प्रमाणात कच्च्या घरांची पडझड झाली असते.एखाद दुसऱ्या शाररीकदृष्ट्या कमकुवत माणसाचा मृत्यू देखील झालेला असतो. (ज्यांना पाणी काय गोष्ट आहे ?  याचा अनुभव घेयचा आहे. त्यानी एखाद्या तलावात जरा चूकीचा पद्धतीने सुर मारावा )
गेल्या काही दिवसात हवामान बदलाचा घटनांनी वेग पकडला आहे. मानवाने या बदलांबरोबर राहण्यास शिकणे आवश्यक आहे. तर आणि तरच तो जात धर्म वंश भाषा प्रदेश  यावरुन एकमेकांशी राहण्यासाठी जिवंत राहू शकतो, अन्यथा पृथ्वीचा मंगळ होणे दूर नाही. त्यावेळेस दुसऱ्या ग्रहावरुन लोक येवून  सांगतील या ग्रहावर कोणे एकेकाळी जीवन असण्याची शक्यता आहे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?