भयानक वास्तवाकडे वाटचाल [भाग 4]

       


आजमितीस जगाचा विचार केला असता एकच  मुदा चर्चेत आहे तो म्हणजे अफगाणिस्तान .  दररोज अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सरशी आणि अफगाणिस्तानच्या सरकारची पीछेहाट या बाबतच्या  बातम्या अतंराष्ट्रीय माध्यमे सातत्याने  देत असतात .  समर्थ रामदास स्वामी यांच्या ''जे जे आपणशी ठाव ते ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जण'' या उक्तीनुसार ते आपणापर्यत पोहोचवण्यासाठी  आजचे लेखन . 

तर मित्रानो , अफगाणिस्तानच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर ताबा आलेल्या आणि दिवसोंदिवस तो मोठ्या प्रमाणात वाढत  असलेल्या तालिबानकडून तुर्की या देशाला कडक इशारा देत देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे जर तुर्की अफगाणिस्तान हा देश सोडून न गेल्यास आम्ही त्यांच्यावर परदेशी लोकांचे स्वदेशावर आक्रमण असे समजून  हल्ला करू . यामध्ये होणाऱ्या नुकसानीस तुर्की लोकच  जवाबदार असतील असे तालिबानकडून जाहीर करण्यात येत आहे . शीतयुद्धाच्या वेळी त्यावेळेच्या कम्युनिष्ट प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिकेने उभारलेली लषकरी संघटना म्हणजे नाटो. अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशन   या नाटोचा   मुस्लिम बांधव बहुसंख्येने असणारा देश म्हणजे तुर्की हा होय  सध्या तुर्की हा  देश अफगाणिस्तानमधील काबुल 

आंतरराष्ट्रीय विमानतळा ज्याचे अधिकृत नाव हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळाचे  संरक्षण करत आहे . याच विमानतळाचे संरक्षण सध्या तुर्कीचे लष् करत आहे जे सोडण्यास तालिबाबान सांगत आहे . 

या विमानतळाचे संरक्षण तुर्की करत असल्याने जर या पुढे अफगाणी सरकारला काही शस्त्रास्त्र पुरवठा करायचा झाल्यास हा विमानतळ अन्य राष्ट्रांना उपायीगी पडू शकतो . अफगाणिस्तानला सागरी किनारा नाहीयेमदत  अफगाणिस्तान हा भूवेष्टित [ Land Locked ] देश आहे  अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर तालिबानचा नियंत्रण असल्याने जमिनीद्वारे  अफगाणी सरकारला मदत देता येणे अशक्य आहे . त्यांना हवाई मार्गाद्वारेच मदत करता येऊ शकते . तसेच आज देखील काही देशांचे राजनैतिक अधिकारी कर्मचारी अफगाणिस्तानमध्ये आहेत जर त्यांना देश सोडणे क्रमप्राप्त झाल्यास याच विमानतळाचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे हा विमानतळ तालिबानच्या हाती लागू न देणे आवश्यक आहे . त्यामुळे पाश्चत्य देशांसह नाटोचे देश याबाबत  तुर्कीचे आभार व्यक्त करत आहेत त्यांच्या मते अफगाणिस्तान आणि तुर्की हे दोन्ही देश मुस्लिम बांधवांचे देश असल्याने तुर्की अफगाणिस्तानचे सरंक्षण उत्तम प्रकारे करू शकते . 

तूर्कीचा हा धोका पत्करण्यामागे एक स्वार्थ आहे तो म्हणजे नुकतेच नाटो आणि पश्चिम युरोपीय देश यांचा प्रमुख शत्रू असलेल्या रशियाकडून तुर्कीने काही लषकरी उपकरणे खरेदी केली त्यामुळे नाटो आणि पश्चिम युरोपीय देश

हे तुर्कीवर नाराज आहेत ती नाराजी दूर होऊन त्यांचे मार्केट आपणास व्यापारी उलाढालीसाठी मिळावे यासाठी तुर्की हा धोका पत्करत असल्याचे या आंतरराष्टीय राजकारण या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहे .

तुर्कीच्या काही स्वार्थ असेल किंवा किंवा तुर्की जगाच्या कल्याणचा हेतूने हे करत असेल मात्र या मुळे जगाचा खूप मोठा फायदा होत आहे हे नक्की , अर्थात जागतिक राजकारण हे दिसते तितके सोपे नसते त्यास अनेक कंगोरे असतात .सर्वच एका वेळी समोर येतील असेही नाही  त्यात प्रचंड  गुंतागुंत असते मात्र या गुंतागुंतीचे मला जस जसे आकलन होईल तसतशी मी आपणापुढे वेळोवेळी मांडेलच तूर्तास इतकेच नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?