भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग5)


सध्या आपल्या भारतात विविध मुद्यांवरुन विविध मतमतांतरे मांडली जात असताना जगाचे लक्ष एकाच गोष्टीकडे केंद्रीत झाले आहे. ते म्हणजे अफगाणिस्तान आणि त्यातील तालीबान.
      नुकतेच तालीबानचे प्रवक्ते सोहेल सलीन यांनी चीन तालीबानचा मित्र आहे. तालीबान कोणत्याच प्रकारे सिंकीयांग राज्यातील फुटीरतावाद्यांना मदत करणार नाही. आमचा अफगाणिस्तानवर संपुर्ण नियंत्रण आल्यावर अफगाणिस्तानचा विकास करण्यासाठी आम्हाला चीनची मदतच होईल, असा विश्वास वाटतो, असे  जाहिर केले आहे. अर्थात या मागे तालीबानला आर्थिक मदत तसेच जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळण्यात  चीनचे साह्य होवू शकते.हा स्पष्ट हेतू आहे.
अफगाणिस्तानची 35किलोमीटर रुंद आणि 110किमी लांब असणाऱ्या वाखान काँरीडाँर मार्फत चीन आणि भारताबरोबर सीमा लागते. अफगाणिस्तान बरोबर चीनची सीमा सिकीयांग (काही ठिकाणी उच्चार झिकियांग म्हणून केला जातो) या मुस्लिम बांधवांची संख्या बहुसंख्येने असलेल्या प्रांताला लागून आहे. या प्रांतातील मुस्लिम बांधवांवर चीन अत्याचार करतो, असा पाश्चिमात्य देशांचा दावा आहे.सुमारे 72वर्षापुर्वी हा भाग चीनच्या अधिपत्याखाली आला. या भागात चीनपासून स्वतंत्र्य होण्यासाठी चळवळ सुरु आहे. त्याला धार्मिक पारंपारिक जीवनाच्या  पुरस्कर्ता असणाऱ्या तालीबानकडून साह्य तर मिळणार नाही ना ?असी चीनची भिती होती त्याला आता पुर्णविराम मिळाला आहे.
    यासाठी चीनने 1990 पासूनच तालिबानला विविध शस्त्रात्रे पुरवली होती. सप्टेंबर 2001 नंतर नाटो सैन्य तालीबानविरोधात लढत असताना युके देशाने चीनला तालीबानला शस्त्रात्रे देवू नये. तूम्ही तालिबानला
शस्त्रपुरवठा करतात हे माहिती आहे, असा दम भरला होता. मात्र या भीतीला साद न घालता त्याने हे काम सुरुच ठेवले. तालीबानला जग मदत नाकरत असताना आपण जर मदत केली तर आपल्या सिकीयांगमधील फुटरतेला तालीबान मदत करणार नाही, असा चीनचा कयास होता.
      सन 2004पासून प्राथमिक आणि2006पासून सखोल शास्त्रीय पद्वतीने अमेरीकन भुगर्भ शास्त्रज्ञांनी  अफगाणिस्तानमधील जमिनीचे अध्ययन केले असता, तांबे, सोने लिथीयम नोबीयम नैसर्गिक वायू यांचे मोठे साठे अफगाणिस्तानमध्ये असल्याचे त्यांना दिसून आले. अमेरीकन शास्त्रज्ञांचा मते औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्तवाची भुमिका बजावणाऱ्या या धातूचे अब्जावधी रूपयांचे साठे अफगाणिस्तानात आहेत. हे साठे ज्याला मिळतील तो देश प्रचंड वेगाने ओद्योगिक प्रगती करेल. सध्या तालीबान चीनमध्ये  मैत्रीपुर्ण सबंध असल्याने हे  उर्जास्त्रोत चीनला मिळतील.कारण अफगाणिस्तान स्वतः त्याचा वापर करण्याइतका सशक्त नाहीये. 
ब्रिटीश भारताची अफगाणिस्तान बरोबर 3युद्धे झाली, जी अँग्लो अफगाण वाँर म्हणून प्रसिद्ध आहे.या युद्धामुळे ब्रिटीश साम्राज अफगाणिस्ताननंतर आपल्या साम्राजाला तर हात लावणार नाही, या भितीपोटी रशियाने ब्रिटीशांबरोबर एक करार केला ज्यानुसार ब्रिटीश साम्राज आणि रशियन साम्राज यांच्यातील एक छोटा 35किमी रुंद आणि 110किमी लांबीचा भुभाग अफगाणिस्तानला देण्यात आला.आणि परस्परांशी अफगाणिस्तानला बफर
स्टेट म्हणून मान्यता दिली. त्यावेळी अफगाणिस्तानला मिळालेला भुभाग म्हणजे वाखान काँरीडाँर  ज्यावरुन चीन आणि अफगाणिस्तानात हे नाट्य घडले.
सध्या  अफगाणिस्तान येथे अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे, ते वेळोवेळी मी आपणास सांगेलच तूर्तास इतकेच नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?