भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग8)

 

 नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नाशिककरांच्या तोंडाचे पाणी पळाले असताना, जगाचे पाणी मात्र अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तालीबानच्या प्रभावामुळे पळाले आहे.अफगाणिस्तानचे भवितव्य काय असू शकेल ? यावर विविध परीषदा सध्या होत आहे. दुष्यंते या शहरात झालेली शांघाय काँपरेशन आँरगानयझेशन ची परराष्ट्र मंत्र्यांंची परीषद असो, अथवा उझबेकिस्तान ची राजधानी तास्कंद या ठिकाणी सध्या सुरु असलेली दक्षिण आणि मध्य आशियातील देशांची परीषद, सर्वत्र अफगाणिस्तानचाच विचार केला जात आहे.
    तास्कंद येथील दक्षिण आणि मध्य आशियातील देशांच्या शिखर परीषदेत अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांनी जाहिरपणे पाकिस्तानने अफगाणिस्तानात दहा हजार प्रशिक्षीत दहशतवादी सोडले असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्या सभागृहात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान
खान हे त्यांचा जवळच बसले होते. आपला क्रमांक आल्यावर इम्रान खान यांनी पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी पडला आहे. गेल्या 15 वर्षात पाकिस्तानात एक हजार लोक दहशतवादामुळे बळी पडले आहेत, असे सांगत पाकिस्तानची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी उझबेकिस्तानचा इतिहास आम्ही उझबेकी लोकांपेक्षा अधिक सविस्तर जाणतो , असा दावा केला. या दाव्यानंतर उझबेकीस्तानच्या पंतप्रधानाच्या नेर्तुत्वखालील गटामध्ये हास्य उमटले. ही परीषद सुरू होण्याचा काही तास आधी अफगाणिस्तानचे वर्तमान आणि अफगाणिस्तानच्या इतिहासातले पहिले उपराष्ट्राध्यक्ष Amrulla saleh  यांनी पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या सरकारने अफगाणिस्तान पाकिस्तान  सिमेवरील तालीबानचे नियंत्रण असलेल्या प्रदेशात कारवाई केल्यास पाकिस्तानचे हवाई दल तालीबानच्या मदतीला येईल असी धमकी दिल्याचे ट्टिट केले होते. या दोन्ही घटनांचा एकत्रीत अर्थ घेतल्यास अफगाणिस्तानातील परीस्थिती बिघडण्यास पाकिस्तानचा किती हात आहे,  हे स्पष्ट होते. 
      हे सर्व घडत असताना अफगाणिस्तान आणि  पाकिस्तानमधील सबंधात  कटुता निर्माण होण्याची अजून एक घटना घडलीये. अफगाणिस्तानचे पाकिस्तानमधील राजदूताच्या मुलीचे इस्लामाबाद येथून काही तासाकरीता अपहरण करण्यात आले. काही तासानंतर अपहरणकर्त्यांनी मुलीची सुटका केली. या काळात तिच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले.अफगाणिस्तानमधील सध्याचा प्रशासनाबाबत पाकिस्तानात किती टोकाची भावना आहे, याचे हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. या प्रकारची कटूता निर्माण होण्यासाठी तेथील सरकारची महत्तवाची भुमिका आहे, हे नाकारुन चालणार नाही. यानंतर त्यांनी स्वतःसह स्वतःच्या संपुर्ण कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 
       एकीकडे हे घडत असताना तालीबानचे प्रवक्ता सोहेल साहिन याने भारताने सध्याचा अफगाणिस्तानातील सरकारला कोणत्याही प्रकारे लष्करी  मदत करु नये, असे सांगितले आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये अन्य देशांकडून उभारण्यात येणाऱ्या विकासकामांना तालीबानकडून हानी पोहचचवणार नाही, तसेच इतर देशातील अँबेसी आणि कान्सुलेट याला धोका उत्पन केला जाणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले. तालीबान चे अफगाणिस्तानमधील सरकार कतार या देशातून चालवले जाते, तेथील टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत सोहेल बोलत होता. सोहेल असे बोलला असला तरी गेल्या काही दिवसातील भारताचा अनुभव याबाबत वाईट 
आहे.तालीबानकडून धोका उत्पन झाल्यामुळे कंदहारचे कान्सुलेट बंद करण्यात आले आहे, तसेच भारतातर्फे अफगाणिस्तानात हिरा नदीवर उभारण्यात येणाऱ्या सलमा डँमवर हल्ला करण्यात आला .अफगाणिस्तानच्या भारतातील राजदुताने भारताने अफगाणिस्तानमधील सरकारला लष्करी मदत केल्यास तालीबानवर विजय मिळवणे सोपे होईल असे वक्तव्य केले होते, त्या पार्श्वभूमीवर तालीबानकडून आलेल्या इशाऱ्याकडे बघायला हवे.
अफगाणिस्तान आणि प्रदेशातील घडामोडी वेगाने बदलत आहे. त्याविषयी वेळोवेळी मी सांगेलच तूर्तास इतकेच, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?