दिवस आहे खास बुद्धिबळाचा

 

 आपल्याकडे विविध  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गोष्टींचे दिन साजरे केले जातात. काही वेळेस एखाद्या व्याधी विषयक दिन साजरे केले जातात.काही दिवस एखाद्या विशिष्ट क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जातात. जसे 15सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय इंजिनिरींग दिन किंवा 23 मे रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय स्किझोफेनिया दिन. मात्र जर कोणी आपणास सांगितले एखाद्या खेळाला समर्पित असणारा एखादा हादिन आहे तर.! तूम्ही म्हणाल हे कसे काय शक्य आहे. तर मित्रांनो, असा एक खेळ आहे. ज्याचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो, तो म्हणजे 20जूलै रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन. सन 1966 पासून बुद्धीबळाची आंतरराष्ट्रीय संघटना जी फिडे या संक्षीप्त नावाने प्रसिद्ध आहे त्या संघटनेमार्फत अर्थात फेडरेशन इंटरनँशल डिइचेस या संघटनेतर्फे हा दिन साजरा करण्यात येतो.
              नुकत्याच फुटबाँलविषयक जागतिक स्तरावरच्या दोन स्पर्धा झाल्या. त्याआधी टेनिस मधील.महत्तवाच्या चार स्पर्धांपैकी एक असणारी विबल्डन ही स्पर्धा झाली . या स्पर्धांमध्ये प्रेक्षकांची भुमिका अत्यंत मर्यादित असते. खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास आनंदोत्सव साजरा करण्याइतकीच प्रेक्षकांची
भुमिका असते. खेळाडुंनी खेळताना केलेल्या चूका ज्यामुळे त्यांना हार पत्कारावी लागली, त्यातून शिकत स्वतः.ते खेळ खेळताना त्या चूकांमधून शिकत प्रतिस्पर्धकावर मात करणे इतर   खेळांंमध्ये शक्य नसते..तसी गोष्ट बुद्धीबळामध्ये नसते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्या हाँलमध्ये स्पर्धा सुरु असते, त्याच्या शेजारील हाँलमध्ये  बुद्धीबळातील तज्ज्ञ प्रेक्षकांना खेळाडुंचा चालीचे विश्लेषण करत असतात .एका अर्थाने प्रेक्षक सुद्धा खेळांडूबरोबर खेळ खेळत असतात, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
   अन्य खेळात वेळेचे फारसे कडक बंधन नसते. क्रिकेटसारख्या खेळात ठराविक वेळेत ठराविक ओव्हर्स पुर्ण न केल्यास कँप्टनला काही दंड होतो, मात्र संघ तो खेळ हारत नसतो. बुद्धिबळाचे मात्र नसते.खेळाडुवर वेळेचे बंधन असते. त्या ठराविक वेळेत खेळाडु खेळ पुर्ण न करु शकल्यास खेळाडू डाव हारतो. तसेच खेळतांना एखाद्या खेळाडूकडून  अनावधानाने एखादी आयोग गोष्ट झाल्यास इतर खेळात काय होईल ,प्रतिस्पर्ध्याला थोडेसे एँडव्हेंटज मिळेल किंवा खेळाडूस मँच खेळण्यासाठी मिळणाऱ्या फीमध्ये काही कपात होईल, मात्र खेळाडू  डाव हारणार नाही, हे पण सुख बुद्धिबळाच्या खेळाडूस मिळत नाही.जर खेळाडूकडून.दोन अयोग्य खेळ्या झाल्यास बुद्धीबळ खेळाडूस खेळ सोडावा लागतो. 
    मात्र बुद्धिबळ खेळल्यामुळे आपली  निर्णयक्षमता तसेच तर्कसंगत विचार करण्याची क्षमता खुप पटीने वाढते. मी काही काळ स्पर्धात्मक बुद्धीबळ खेळलो आहे, ज्याचा मला स्पर्धा परीक्षेमधील बुद्धीमता चाचणी सोडवताना खुपच उपयोग झाला..सध्या स्पर्धा परीक्षेकडे खुपच मोठ्या प्रमाणात युवा वर्गाचा ओढा आहे. त्यांना माझा सल्ला आहे की, तूम्ही अभ्यास करताना काही वेळ बुद्धिबळ खेळावे, कामात बदल केल्याने मेंदूस उर्जा मिळुन मेंदू ताजातवाना होईल तसेच खेळ खेळल्यामुळे आनंद देखील अनुभवता येईल. या दोन्हीबरोबर अभ्यासातील सातत्य देखील राखता येईल.
   बुद्धीबळ हा खेळ वाटतो तितका अवघड नाहीये. बुद्धिबळाच्या खेळ्यातील मोहऱ्याचा चाली माहिती झाल्या तसेच काही सहज सोपे नियम माहिती झाल्यावर हा खेळ खेळता येतो..एकदा खेळ माहिती झाल्यावर सरावाने त्यातील विविध समीकरणे सवयीने अंगवळणी पडतात. मात्र या समीकरणांना सामोरे जाण्याचा कित्येक 
आगोदर  या समीकरणांमुळे घाबरून दूर पळणे हा बुद्धीबळ शिकण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. या अडथळ्यांमुळेच बहुसंख्य जण या खेळाला काहीतरी अवघड समजून बुद्धीबळापासून दूर पळतात आणि एका मोठ्या आनंदाला मुकतात.
मित्रांनो, मी स्वतः स्पर्धात्मक  बुद्धिबळ खेळलो आहे, त्या अनुभवांनुसार सांगतोय बुद्धी आणि शाररीक ताकद यांचा मिलाफ करणारा दुसरा खेळ नाहीये .हो बुद्धिबळात सुद्धा शाररीक ताकद आवश्यक आहे. जर आपले.डोके दुखत असेल, आपल्या हाता पायाला काही इजा झाली असेल तर आपण बुद्धीबळात लक्ष केंद्रीत करु शकणार नाही. किंवा बुद्धीबळाला आवश्यक असणारी बैठक आपणास हवी असल्यास शाररीक चपळता हवी. या गोष्टी साठी शाररीक तंदरुस्ती आवश्यक आहे. मग खेळताय ना बुद्धिबळ 20जूलै रोजी असणारा जागतिक बुद्धिबळ दिनासारखा उत्तम मुहुर्त यासाठी दुसरा कोणता असेल!सो लेटस् प्ले बुद्धिबळ

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?