आली समिप घटीका ..... विनाशाची

   

 सध्या जगाचे लक्ष अफगाणिस्तान आणि तालीबान याच्या घडामोडीबरोबर बदत्या हवामान बदलामुळे आलेल्या त्रासाकडे वेधले गेले आहेच. तालीबान आणि अफगाणिस्तानविषयी मी आधीच बोललो आहे. आज बोलणार आहे, हवामान बदलाच्या धोक्याविषयी.
    तर मित्रांनो, तळ कोकणात, (रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तळ कोकण म्हणतात, तर ठाणे रायगड, पालघर आणि मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर हे जिल्हे  उत्तर कोकणात येतात सावित्री नदी त्यांची सीमा निश्चित करते.) मुंबई तसेच पश्चिम युरोपीय देशांमध्ये पाउस आणि पुरामुळे  अशरशः भंबेरी  उडाली आहे. पश्चिम युरोपात गेल्या कित्येक वर्षात पडला नाही इतका पाउस पडलाय. जगात विकसीत समजल्या जाणाऱ्या पश्चिम युरोपीय देशात 300 व्यक्ती या पावसामुळे आणि पावसामुळे आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या आहेत जरी तळ कोकणात पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची बातमी आलेली नसली तरी मुंबईत मात्र पावसामुळे 
भुस्खखलन होवून कित्येक निष्पाण जीव प्राणास मुकले आहेत.एककीडे पाउस नको नकोसा करत असला तरी नाशिक मराठवाडा पावसाची आस लावून बसला आहे.
    गेल्या काही महिन्यातील हवामान विषयक बातम्या बघीतल्यास निसर्गाचा लहरीपणा वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी आपल्या भारतात आणि जगभरात अतिशय जास्त तीव्रतेची आणि गेल्या 50वर्षाचा विचार करता, संख्येने अतिशय जास्त अशी वादळे आली. या वर्षाचा विचार करता  गेल्या महिन्याभरापुर्वी कँनडा मध्ये वाढत्या तापमानाने हाहाकार माजवला होता. त्याचा नंतर आठ दिवसापुर्वी हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाली.आणि आता मुसळधार पावसाचे हे निसर्गाचे हे रौद्ररुप . ढासळत्या हवामानाचे दिवसोंदिवस निच्चांक स्थापन होत असल्याचेच हे निर्देशांक आहेत. मानवाच्या गळ्यापर्यत पाणी आल्याचे हे निर्देशांक आहेत. मानवाने आता काहीतरी केले नाही तरजी मानवासह संपुर्ण सजीवसृष्टी इतीहास जमा होण्यास काही वेळ लागणार नाही, हे कटु असले तरी सत्य आहे.मानवाने या बदलाला लवकरच आपलेसे केले पाहिजे. तर आणि तरच या पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान प्राणी समस्त सजीवसृष्टी जगू शकेल.
     निसर्गाची हानी टाळण्यासाठी पर्यावरण पुरक जिवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे पर्यावरण पुरक जीवनशैली म्हणजे झाडे लावा, झाडे  जगवा, कागदाचा वापर टाळणे, प्लँस्टिक, थर्माकाँलचा वापर टाळणे, पेट्रोल, डिझेलवरील वाहनांचा वापर टाळणे इतक्या मर्यादीत अर्थाची जीवनशैली स्विकारणे नाही. अर्थात या प्रकारची
जिवनशैली अल्प प्रमाणात ग्रीन हाउस गँससची निर्मिती रोखते, हे नाकरण्यात काही अर्थ नाही.  तर ग्रीनहाउस गँसची निर्मिती रोखण्यासाठी स्वतः.प्रयत्न करणे, सरकारवर दबावगट तयार करुन ग्रीन हाउस गँसची निर्मितीच रोखणे होय. ग्रीन हाउस गँसेस हे फक्त वाहनातूनच निर्माण होतात असे नाही, तर एसी फ्रिज या मधून देखील निर्माण होत असतात. या गोष्टींचा कमीत कमी वापर करणे हे सुद्धा अंगीकारणे आवश्यक आहे. तूम्हाला खोटे वाटेल वाया जाणाऱ्या अन्नातून मिथेन तर निट  व्यवस्था न लावलेल्या मलमुत्रातून अमोनिया हा वायू तयार होत असतो . एकुण जागतिक हवामानबदलाचा विचार केला असता कार्बन डाय आँक्साइड , कार्बन मोना आँक्साइड यांच्याइतकेच किंबहूना जास्तच  कमी कदापि नाही, असे वाइट परीणाम या दोन वायूंमुळे होतात. शुक्रग्रह आपल्या सौरमालिकेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. बुधाच्या तुलनेत सुर्यापासून लांब असून देखील बुधापेक्षा शुक्र गरम आहे, याचे कारण मिथेन आणि कार्बन डाय आँक्साइड हे वायु कारणीभुत आहे. हे विसरुन चालणार नाही
अब नही तो कभी नही असी हवामानबदलाची स्थिती आहे. आजमितीस हवामान बदलाविषयी अनेक संस्था ,व्यक्ती जीवाचे रान करुन कार्यरत आहे. गरज आहे, अन्य कोणतेही भेद जसे धर्म, जात, भाषा लिंग वंश आर्थिक स्थिती यावरुन न भांडता ,कोणत्याही पदाची लाभाची अपेक्षा न ठेवता त्यांचे.हात बळकट करण्याची. तसे केले तर आणि तरच आपण यातून तरुन जावू. नाही तर आज आपण जसे मंगळाबाबत म्हणतो की कधीकाळी मंगळावर जीवन होते, तसेच इतर जीवश्रुष्टी पृथ्वीवर आल्यावर म्हणतील कधीकाळी पृथ्वीवर जीवन असल्याचा खुणा दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?