आपण या बदलांना तयार आहोत का?

 

 सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर नजर टाकली असता,  मुंबईत आणि तळ कोकणात ( रत्नागिरी सिंधूदुर्ग जिल्हे) पावसामुळे झालेले नुकसान , आणि आगामी पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने दिलेले विविध इशारे यांच्या बातम्या आपणास दिसतात. या सर्व बातम्यांचा गदारोळात या प्रश्नाच्या मुळाशी जाणारी एक बातमी पुण्याहुन आली, ती आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .
      तर मित्रांनो पुण्याचा पाषाण या उपनगरातील  डाँ होमी भाभा रोडवरील IITM( Indian Institute for   Tropical Metrology )या संस्थेमार्फत  अरबी समुद्राविषयी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात सन 1982 ते 2002 या कालखंडापेक्षा 2001ते 2019 या कालखंडात 52% अधिक संख्येने चक्रीवादळे अरबी समुद्रात आल्याची तसेच त्यांची तीव्रता वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच याच कालावधीत बंगालच्या उफसागरात 8% कमी चक्रीवादळे आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.  सर्वसाधरणपणे अरबी समुद्रात वर्षभरात एक किंवा फार तर दोन चक्रीवादळे तयार होत. अरबी समुद्रात दोन पेक्षा जास्त चक्रीवादळे म्हणजे डोक्यावरुन पाणी असी स्थिती असे. तर बंगालच्या उपसागरासाठी 3ते4चक्रीवादळे ही नित्याची बाब असे.  एकुण चक्रीवादळाच्या संख्येत अरबी समुद्राचे योगदान 20ते25% असे ,जे आता झपाट्याने
बदलत आहे सन 2018 मध्ये दोन्ही उपसागर मिळून 7चक्रीवादळे आली त्यातील 3 अरबी समुद्रात होती तर 4 चक्रीवादळे बंगालचा उपसागरात आली होती. तर 2019 मध्ये दोन्ही समुद्र मिळून 8 चक्रीवादळे आली..ज्यामध्ये अरबी समुद्राचा वाटा 5 चक्रीवादळांचा होता. असे या अहवालात सांगण्यात येत आहे.
  बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रातील पाणी ग्लोबल वार्मिंगमुळे अधिक गरम होत आहे.ज्यामुळे अरबी समुद्राच्या प्रदेशात अधिक  बाष्प 
( बोली भाषेत वाफ) समावले जात आहे. हे समुद्रावरील बाष्प ( बोली भाषेत वाफ) जमिनीवर आल्यावर त्याचे तापमान कमी होते. प्रत्येक तापमानात किती बाष्प ( बोली भाषेत वाफ) असू शकते याचे प्रमाण ठरलेले आहे. त्या प्रमाणापेक्षा अधिक बाष्प असल्यास ते बाष्प पावसाच्या स्वरुपात बाहेर पडते. सध्या जमिनीवरील तापमान समुद्रापेक्षा कमी असल्याने rain rain to away असे म्हणण्याची वेळ तळ कोकणावर (रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्हा)आणि मुंबईत आली आहे.
या बरोबरच पृथ्वीगोलाच्या विचार करता अगदी तंतोतत  नाही पण जवळपास आपल्या भारताच्या दुसऱ्या बाजुस असणाऱ्या प्रदेशात उत्पन होणाऱ्या अल निनो या समुद्र प्रवाहात झालेल्या बदलामुळे अरबी समुद्रात विविध वेगाचे एकमेकांना छेद देणारे विविध उंचीवरुन वाहणारे वाऱ्याची स्थिती उत्पन झाली आहे. ज्यामुळे 
चक्रीवादळाला पुरक स्थिती निर्माण झाली आहे. ज्याची शिक्षा आपण भोगत आहोत.
या बदलत्या हवामानावर नियंत्रण मिळवणे आपल्याच काय जगातील कोणत्याही मानवास पुर्णतः.नियंत्रण मिळवणे शक्य नाही. आपण या बदलत्या हवामानाला शरण जात त्यानुसार आपले वर्तन ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र या बाबत आपली  स्थिती चिंताजनक आहे. ही स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्याची सुबुद्धी सर्वांना येवो , असी इश्वराकडे प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?