हे आग बुझती क्यु नही !

   

आज 22 जूलै रोजी हा मजकूर लिहीत असताना तळ कोकणात आणि मुंबईत पावसाने हाहाकार उडवला असताना अमेरीका आणि कँनडामध्ये वणव्याने तेथील प्रशासनाला अक्षरशः रडकुंडीला आणले आहे. अमेरीकेच्या 13 राज्यात लाखो हेक्टर जमिन वणव्याने भस्मस्यात केली आहे. कँनडाच्या ब्रिटिश कोलंबिया या राज्यात तर  या वणव्यामुळे तेथील प्रशासनाने राज्य आणिबाणी जाहिर केली आहे. अमेरीकेचे पश्चिम भागातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 88 आणि 89 हे वाहतूकीसाठी बंद करण्याची वेळ या वणव्यामुळे तेथील प्रशासनावर आली आहे. अमेरीकेच्या पँसिफिक किनाऱ्यावर लागलेली ही आग झपाट्याने पुर्वेकडे पसरत आहे.  दहा दिवसापेक्षा जास्त दिवसांपूर्वी लागलेली ही आग शर्थीचे प्रयत्न करुन देखील विझता विझत नाहीये. अमेरीकेच्या केंद्रीय प्रशासनाने 88 वणव्यांना अनियंत्रीत वणवे म्हणून जाहिर केले आहे. हे वणवे लोकवस्तीच्या जवळ आल्याने प्रशासनाच्या त्रासात भरच पडली आहे. बी.बी.सी.,  सि.एन.एन., अल् जझीरा सारख्या वृत्तवाहीन्यांकडून  येणाऱ्या बातम्यांनुसार अद्याप जिवीत हानी झालेली नसली,  तरी मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शहरातील दृशमानता या वणव्यामुळे असणाऱ्या धूरामुळे प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. 
जागतिक तापमानवाढीमुळे हे वणवे लागले असल्याचा आणि वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जगात सगळ्यात कमी तापमान असणारा मानवी वस्तीचा भाग असी ख्याती असणाऱ्या या प्रदेशात लागलेल्या वणव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत
   आज तळ कोकण आणि मुंबईत  सुरु असलेला मुसळधार पाउस, किंवा आठवड्यापुर्वी युरोपात आलेले महापुर त्या आधी हिमाचल प्रदेशात झालेली ढगफुटी किंवा वर  उल्लेख केलेला अमेरीका खंडातील वणवा असो किंवा महिन्याभरापुर्वी अमेरीका आणि कँनडा या देशाच्या पश्चिम भागात आलेली उष्णतेची लाट असो  या सर्व घटना एकाच साखळीतील विविध कड्या आहेत, आणि ती साखळी आहे. जागतिक हवामान बदलाची. या सर्व घटनांकडे स्वतंत्र्यपणे न बघता एकत्रच  बघून त्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.मी या आधी सांगितलेल्या घटना या 2021वर्षातील आहे.2020 साली  जगभरात विविध ठिकाणी आलेली विविध वादळे आणि त्यामुळे झालेले नुकसान हे विचारात घेता पर्यावरणाचा किती ऱ्हास आपण केला आहे हे दिसून येते. मानवाने धर्म जात, वंश, लिंग, भाषा आदी सर्व मानवनिर्मित भेद क्षणभरासाठी का होईना मागे ठेवून या नैसर्गिक आपत्तीचा सामना करायला हवा.तर आणि तरच यावरुन राजकारण करायला, भेदभाव पाळायला, 
दुसऱ्याचा अपमान करायला मानवास संधी मिळेल. जर या आपत्तीकडे लक्ष न दिल्यास धर्म, जात, वंश, लिंग, भाषा या वरुन रक्तपात हिंसाचार घडवायला  मानवजातच शिल्लक राहणार नाही. हे आपण लक्षात घेयला हवे. 
    मी अनेकदा डे आफ्टर टुमारो हा चित्रपट बघीतला आणि, बदलत्या हवामानावर छानपणे त्यात भाष्य केले आहे.  या चित्रपटात जरी डे आफ्टर टुमारो अर्थात परवाचा उल्लेख असला तरी त्या चित्रपटातील परवा आपला आजचा दिवस तर नाही ना ? असी शंका वाटावी असे हवामान बदल सध्या घडत आहे. युट्युब वर डे आफ्टर टुमारो हा चित्रपट आणि अँन इंकव्हियट ट्रुथ ही डाँक्युमेंटरी उपलब्ध आहे. जिज्ञांसूनी ते बघावा. म्हणजे मानवाने निसर्गावर किती अत्याचार केले आहेत, हे समजते, आणि हे दोन्ही पर्यावरणाची समजत असून देखील आम्ही बदलणार नाही, या भावनेतून हानी करणाऱ्या अमेरीकन व्यक्तींकडून केली आहे. अर्थात अल् गोर यांचे हवामानविषयक जनजागृती बाबतचे योगदान मोठे आहे. हे नाकारुन चालणार नाही.
आजमितीस आपल्या सौरमालिकेत पृथ्वीवरच जीवश्रुष्टी आहे,  तसेच शनीचा उपग्रह टायटनवर जीवश्रुष्टीस अनकुल वातावरण असल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे. सौरमालिकेपलीकडे जाण्याची सध्या विज्ञानाची झेप नाही. त्यामुळे आहे तीच श्रुष्टी वाचवणे आवश्यक आहे. नाही तर मंगळावर कधीकाळी जीवश्रुष्टी असावी असे आपण म्हणतो, तसेच इतर कोणी आपल्यासाठी म्हणेल.ते टाळण्यासाठी चला पृथ्वी वाचवूया 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?