हे निसर्गा तूला झाले तरी काय ?

   

सध्या जगभरात निसर्गाने आपल्याला रौद्रस्वरुप दाखवून देण्याचा चंग बांधला आहे का? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी स्थिती आहे. आतापर्यतचे दक्षीण आशियातील सर्वाधिक अर्थात 52अंश सेल्यीयस तापमान पाकिस्तानातील जाकोदाबाद येथे नोंदवण्यात आल्यानंतर निसर्गानै रौद्ररुप दाखवण्यास सुरवात केली. ज्या देशातील एक तूर्तीयांश भाग ध्रुवीय प्रदेशात मोडतो त्या.कँनडातील.ब्रिटिश कोलंबिया या राज्यात 49.5 अंश सेल्यीयस तापमान नोंदवले गेले. उष्माघाताच्या या नाट्यानंतर निसर्गाच्या रौद्ररुपाचा पावसाचा अंक सुरू झाला आहे. आजमितीस पावसामुळे आपल्या महाराष्ट्रासह, पश्चिम युरोप आणि चीनमध्ये जनजीवन पुर्णतः उद्धवस्त केले आहे. त्यापैकी महाराष्ट्र आणि पश्चिम युरोपातील पावसाविषयी मी या आधीच सांगितले आहे. आता बघूया चीनमधील पावसाविषयी.
     तर मित्रांनो, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिम मध्य चीनमधील हेनास या प्रांतात पावसाने अक्षरशः नंगा नाच सुरु करण्यासारखी परीस्थिती आहे. वर्षभरातील एकुण पाउसाइतके पर्जन्य फक्त 3दिवसात झाल्याने हेनास  या प्रांतातील या झिंगझावू शहरात  भयानक स्थिती निर्माण झाली आहे. हे लिहीत असताना तिथे जवळपास 40 लोकांचा मृत्यू झाल्याचे चीन सरकारककडून जाहिर करण्यात आले आहे. गेल्या एक हजार वर्षात झाला नाही. इतका पाउस तिथे झाला आहे. तेथील उपनगरीय वाहतूकीचे माध्यम असणाऱ्या मेट्रोमधील भिषणता सांगणारे फोटो 
समाजमाध्यमावर मोठ्या संख्येने पसरत आहे. त्यावरुन याची भिषणता दिसून येते. येत्या दोन तीन दिवसात येणाऱ्या टायफुनमुळे ( उष्ण कंटीबंधात येणाऱ्या चक्रीवादळांना स्थानिक भाषेत टायफुन म्हणतात).अजून जास्त पाउस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सिनेमागृह, माँल्स मध्ये तेथील नागरीक आश्रय घेत आहेत. तेथील एका महत्तवाचा रुग्णालयाचा विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती.
     चीन आपला शत्रू आहे. त्यांचे वाटोळे झाले तर आनंदच आहे. त्यांचे असेच व्हायला हवे,असे म्हणून आनंद वाटायला नको. आज ते जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत आपण सुद्धा भरडले जाणार आहोत. (किंबहुना  कोकणात आणि विदर्भात भरडले जातच आहोत) त्यामुळे त्यांचा अनुभवातून शहाणे होत दुर्दैवाने आपणाकडे तसी परीस्थिती निर्माण झालीच तर काय करावे ? याचे नियोजन करणे आवश्यक आहे. कारण  हवामान या विषयातील तज्ज्ञांनुसार सध्या निसर्ग दाखवत असलेल्या गोष्टी फक्त ट्रेलर आहेत. मुळ चित्रपट बाकीच आहे. सबब शत्रू अथवा मित्र कोणावरही हवामानबदलामुळे संकट आले तर आनंद अथवा दुःख न होता त्याला कसे सामोरे जायचे? याविषयी माहिती करुन त्यानुसार आपणात बदल करणे आवश्यक आहे.
आपण गेल्या काही वर्षापासून घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता पुर , दुष्काळ, या सारख्या नैसर्गिक आपत्तींची  संख्या  दिवसोंदिवस वाढलेली दिसते आहे. या आपत्तींमुळे जीवास मुकणाऱ्या बळींची संख्या देखील त्याच गतीने वाढताना दिसतेय. आर्थिक हानीचा तर विचार करायलाच नको. त्यामुळे आपण या आपत्तीला सहन करण्यापर्यत सक्षम आहोत का याचा विचार करता उत्तर नकारार्थी येते. आपल्याकडची संपूर्ण यंत्रणा याबाबत कमालीची तोकडी आहे. हवामान झपाट्याने रंग बदलत असताना आपल्याकडे हवामान खात्याला पुरेस्या निधीची तरतूद करण्यात येत नाही. अर्थात आता स्थिती पुर्वीपेक्षा चांगली आहे.(पुर्वी आवळ्याची एखादी फोड देवून{एक
पुर्ण आवळा देखील नाही} कोहळा काढावा लागत असे. आता पुर्ण आवळा मिळतोय) मात्र ही तरतूद वाढणे आवश्यक आहे. अमेरीकेत अनेक राज्यात जिल्हावर हवामानविषयक केंद्रे आहेत.आपल्याकडे जिल्हा सोडा तीन ते पाच जिल्ह्याचे एकत्रीत ठिकाण असणाऱ्या विभागीय आयुक्तांचा ठिकाणी ते असले तरी उत्तम असी स्थिती आहे. हवामान खात्याबाबतचा उपहासात्मक दृष्टिकोन बदलणे अत्यावश्यक आहे.जर हा दृष्टिकोन बदलला तर हवामान खात्याने कामकाज अजून वेगवान आधुनिक होण्यास हवामान.खात्याचे आधुनिकीकरण करण्याबाबत सरकारला निधीच्या काही मर्यादा आहेत. खासगी क्षेत्राकडून त्याबाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे. तर आणि तरच आपण हवामान खात्याला आधुनिक करु शकु. 
     सिंधू-सरस्वती संस्कृती, (जीला हरप्पा{हडप्पा}संस्कृती म्हणूनही ओळखले जाते) नष्ट होण्यामागे बदलते हवामान हे देखील एक कारण सांगितले जाते. त्यामुळे आपणास हवामान बदलांविषयी सजग होत काहीतरी ठोस कार्यवाही करणे नितांत आवश्यक आहे. तर आणि तरच आपण वाचू शकू! अन्यथा आपला अंत हा ठरलेला! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?