नाशिकच्या आदिवासी भागातील दुर्लक्षित गड वाघेरे

     

 आपल्या महाराष्ट्राला डोंगरी किल्यांची मोठी परंपरा आहे  अनेक डोंगरी किल्ले सह्याद्रीच्या कुशीत आहे .काही किल्ले त्याच्यावर मोठ्या घडामोडी झाल्याने विशेष प्रसिद्ध आहेत जसे नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेला रामशेज किल्ला . जो त्यावर झालेल्या युद्धासाठी विशेष प्रसिद्ध आहेत  तर काही डोंगरी किल्ले काहीसे दुर्लक्षित आहेत .अशाच नाशिकपासून जवळच असलेला मात्र फारशा प्रसिद्ध किल्ला म्हणजे वाघरे किल्ला . मी जुलै महिन्यातील अखेरच्या रविवारी या किल्ल्याला  नाशिकमधील वाहतूक सुरक्षा, सह्याद्री बचाव आदी विविध सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणाऱ्या गरुडझेपेच्या दुर्गप्रेमींच्या सहकार्याने भेट दिली . पावसाच्या साथीने झालेल्या या दुर्गस्वारीचा अनुभव मनप्रसन्न करणारा होता . 
    नाशिकमधील आदिवासी भागातील त्रंबकेश्वर पेठ तालुक्याचा सीमेवरील मात्र प्रशासनाच्या दृष्टीने त्रंबकेश्वर तालुक्यतात असणाऱ्या या किल्यावर नाशिकहून दोन वेगवेगळ्या मार्गाने जाता येते . नाशिकहून गंगापूर रोडमार्गे गिरणारे गावातून हरसूलला जाणाऱ्या रस्त्यामार्गे आणि नाशिकहून त्रंबकेश्वर मार्गे हरसूल जाणाऱ्या रस्त्याने गडाच्या पायथ्याशी पोहोचता येते.  त्रंबकेशवरमार्गे गेल्यास पाच किमीचे अंतर कमी लागते मात्र  त्रंबकेश्वर वाघेरा रस्ता खूप म्हणजे खूप खराब आहे .आम्ही येताना आणि  जाताना दोन्ही वेळेस गिरणारे मार्गे प्रवास केला . मूळ रस्त्यापासून  आतमध्ये सुमारे पाच किमी आत मध्ये गेल्यावर आपण किल्याचा पायथ्याशी पोहोचतो . किल्ल्याचा डोंगर तीन 
टप्यात आहे . प्रत्येक टप्प्या संपल्यावर थोडे अंतर चालत जावे लागते .प्रत्त्येक टप्पा   नाशिकच्या पांडवलेणीच्या  किंवा  चतुःशृंगी लेणीच्या एक ते सव्वा पट आहे .  एकूण चढाईच्या विचार करता अन्य दोन टप्यापेक्षा शेवटचा टप्पा काहीसा अवघड आहे .मात्र अशक्य नाहीये 
           किल्यावर भग्न स्वरूपातील एक महादेवाचे मंदिर , एक हनुमानाची मूर्ती आणि काही भग्न अवशेष आहेत . किल्यावर ऐतिहासिक दृष्ट्या विशेष गोष्टी नसल्या तरी किल्याचा उत्तरेला एक भौगोलिक चमत्कार आहे . काही वर्षांपूर्वी गडावर वीज पडल्याने एक मोठी भेग तयार झाली आहे . मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठीची वाट हि अरुंद आहे .वाटेच्या दोन्ही बाजूला दरी आहे .या वाटेवर माती नाहीये तर  कातळ दगड आहे त्यामुळे घसरण्याची भीती नाहीये या भेगेच्या शेवटी मूळ रस्त्यावर येताना गडावरील अन्य चढाईच्या तुलनेत अवघड उतरणीच्या सामना करावा लागतो . ही उतरण  मात्र अशक्य नाहीये 
या गडाच्या फारशा इतिहास उपलब्ध नाहीये सन  1818मध्ये त्रंबकराज गाद ब्रिटिशांच्या ताब्यात जे सोळा गड गेले त्यातील एक म्हणजे हा गड आहे . हा किल्ला विशेष प्रसिद्ध नसल्याने अन्य प्रसिद्ध किल्यावर आढळते तशी गर्दी या किल्ल्यावर आढळत नाही . ज्यांना गर्दीपासून लांब जात पर्यटन करायचे आहे किंवा  दिवष्ट होईल असे दुर्ग पर्यटन करायचे आहे त्यांच्यासाठी हा किल्ला उत्तम आहे . तसेच किल्ल्याची चढाई देखील विशेष अवघड नाहीये मग कधी जाताय या किल्ल्यावर !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?