नाशिकरांची मान उंचावणारे बुद्धिबळपटू

       


   आज हा मजकूर लिहीत असताना (26जुलै ) स्मार्ट सिटीच्या कामामुळे,  लांबलेल्या पावसामुळे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या अनुपलब्धतेमुळे सर्वसामान्य नाशिककर  पिचला गेलेला असताना दोन नाशिकर खेळाडू बुद्धिबळाच्या क्षेत्रात जगभरात नाशिकचे नाव उंचावत आहेत ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि  महिला इंटरनॅशनल  मास्टर प्रचिती चंद्रात्रे हे दोन ते हिरे .त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात नाशिकचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन . एक नाशिकर म्हणून मला त्यांचा  सार्थ अभिमान वाटतो .

       प्रचिती चंद्रात्रे  यांनी नुकतीच 17  वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी असणारी अशियन चेस चॅम्पियनशिप  रौप्य  पदक मिळवत जिंकलेली आहे .  सर्वप्रथम जिल्हा पातळीवर स्पर्धा जिंकत  त्यानंतर राज्य पातळीवरील स्पर्धा आणि  देशपातळीवरील विजयाचा रथ तसाच ठेवत भारताचे  शालेय स्तरावरील बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केले . आणि आशियाई स्पर्धेत ही विजयश्री खेचून आणली  

      ग्रँडमास्टर विदित गुजराथी सध्या रशियातील सौल जवळ सुरु असणाऱ्या वर्ल्ड चेस कपमध्ये  अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे . विदित हे  मजकूर लिहीत असताना अंतिम आठ जाणत पोहोचले  आहेत  . 10 जुलैपासून सुरु होणारी ही स्पर्धा 8 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे   सामान्यतः बुद्धिबळाच्या स्पर्धा या स्विस लीग या पद्धतीने

होतात . म्हणजेच तुम्ही खेळात हरला तरी काही ठराविक डाव तुम्ही खेळू शकता . मात्र ही स्पर्धा नॉक आऊट पध्द्तीने अर्थात हरल्यावर स्पर्धेच्या बाहेर या पद्धतीने होत आहे . या अश्या स्पर्धेत 210 खेळाडूंमधून अंतिम 8पर्यंत धडक मारणे ही खरोखरीच अभिमानास्पद गोष्ट आहे . जर ही स्पर्धा विदित जिंकले तर तर बुद्धीबळाची कॅन्डीडेट ही स्पर्धा खेळू शकतात . दरवर्षी होणारी कॅन्डीडेट स्पर्धा जगभरातील विविध महत्त्वाचा स्पर्धा जिंकणारे,  तसेच मागच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील हरलेला खेळाडू , तसेच ज्या देशात ही स्पर्धा होणार आहे . त्या आयोजक  देशातील किमान 2600 इतके इलो रेटिंग असणारा एक खेळाडूं असे एकूण 8 खेळाडूं खेळू शकतात . या कॅन्डीडेट स्पर्धेतील विजेता मागच्या वर्षातील विश्वविजेत्याला आव्हान देतो . अश्या या महत्त्वाच्या स्पर्धेत विदित हे चमकदार कामगिरी करत आहेत . 

बुद्धिबळ हा खेळ निव्वळ बुद्धीचा नाही . त्यासाठी शारीरिक तंदरुस्ती देखील महत्त्वाची आहे .कारण निरोगी शरीरातच निरोगी मन कार्यरत असते आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम असू तर आणि आणि तरच उत्तम प्रकारे विचार करू शकतो . आणि ऊत्तम विचार केल्यानेच इतके मोठे यश मिळू शकते . त्यामुळे हे दोन्ही खेळाडू अन्य खेळाडूंपेक्षा अधिक सत्काराचे मानकरी आहेत असे मला वाटते. या दोन्ही खेळाडूंना त्यांचा भावी वाटचालीसाठी सदिच्छा देऊन सध्यापुरते थांबतो ,नमस्कार 

(या लेखासाठी नाशिकमधील नामवंत बुद्धिबळ प्रशिक्षक ओंकार जाधव आणि नाशिकमधील नामवंत बुद्धिबळ खेळाडू विनायक वार्डिले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?