पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणूका आणि आपण! (भाग2)

     

   नुकत्याच पाकिस्तान अनधिकृतपणे आपल्या ताब्यात असलेल्या पाकव्याप्त काश्मीरच्या दक्षीणेचा भागात ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात तेथील विधानसभेच्या निवडणूका झाल्या. ज्यामध्ये पाकिस्तानात सध्या केंद्रीय सत्तेसह सिंध वगळता सर्व विधानसभेत सत्तेत असणाऱ्या पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला बहुमत मिळाले.  निवडून येणाऱ्या 45 सदस्यांमध्ये पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला 25 जागा मिळाल्या .(या विधानसभेची रचना मी आधीच्या भागात सांगितली आहेच) पाकिस्तान पिपल्स पार्टीला 11 तर सत्ताधिकारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नूर) ला 6 जागा मिळाल्या. 
     या निवडणूकांमध्ये लष्कराच्या मदतीने केंद्रीय सत्तेने गैरप्रकार केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यावर केंंद्रीय सत्तेपेक्षा प्रांतिक सत्ता अधिक मोठ्या प्रमाणात गैर प्रकार करु शकते.मात्र त्यांनी काहीच विकास त्यांचा कार्यकाळात न केल्याने लोकांनी आम्हाला सत्तेत बसवले असे उत्तर पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाने दिले आहे.
              पाकिस्तानच्या सध्याचा सविधानानुसार (1947 नंतर पाकिस्तानमधील संविधान निर्मिती हा मोठा विनोद आहे. त्यांचे पहिले संविधान 1956 साली तयार झाले , जे 1961 साली पुर्णतः रद्द करण्यात आले. त्यानंतर नविन संविधान 1962 साली तयार झाले. जे बांगलादेश निर्मितीपर्यत चालले. पाकिस्तानापासुन बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर 1972 साली पाकिस्तानातील तिसरे संविधान तयार करण्यात आले, जे सध्या कार्यरत आहे. त्यात देखील लष्करी हुकुमशहा
परवेझ मुशरफ यांच्या कार्यकाळात नविन संविधान तयार केले का ?असे वाटावे इतका बदल करण्यात आला आहे) पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नाही. ते स्वतंत्र्य आहे.【पाकिस्तानचा भाग नसल्याने तेथून खासदार निवडला जात नाही,】 पाकिस्तानात फक्त चार प्रांत आहेत.पंजाब ,खैबर ए पख्तूनवा, {वायव्य सरहद्द प्रांत या नावाने आपल्याकडे परीचित}, सिंध आणि बलूचिस्थान हे ते प्रांत . तर भारतीय संविधानात असणाऱ्या पहिल्या परीशिष्ठात जी राज्यांची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये जम्मू काश्मीरचा स्पष्ट उल्लेख आहे.【तेथून आपण खासदार निवडतो】 म्हणजे बघा पाकिस्तान त्यांचा संविधानात ज्या भागाचा समावेश आपल्या संविधानात नाही असा भागात निवडणूका घेते. 
भारताने या निवडणूका जाहिर झाल्याक्षणीच त्या बेकायदेशीर असल्याचे जाहिर केले आहे.
{पाकिस्तानच्या सध्या कार्यरत असणाऱ्या संविधानातील कलम 256नुसार जर काश्मीरला वाटले तर ते पाकिस्तानचा भाग बनू शकतात.मात्र 1971 नंतर इतकी वर्षे होवूनही हे एकत्रीकरण झालेले नाही}      या विधानसभेत ज्या प्रमाणे आपल्या जम्मू काश्मीर साठी त्यांनी 12जागा राखीव ठेवल्या आहेत. आणि त्या वेळोवेळी भरल्या जातात. त्याचप्रमाणे भारताने सुद्धा पुर्वी मान्यता असणाऱ्या मात्र सध्या गोठवलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधून निवडून येणाऱ्या 24 आमदार आणि 5खासदारांचा जागा पुन्हा भरण्यात याव्यात , अशी मागणी यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामुळे भारताच्या काश्मीरविषयक दाव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी येईल असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे 
या क्षेत्रातील राजकारणाने सध्या वेग धरला आहे. यामध्ये घडणाऱ्या घडामोडी वेळोवेळी मी तूम्हाला सांगेलच, तूर्तास इतकेच .नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?