बातमीतील चीन( भाग15)

   

    काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चीनने पुन्हा आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकण्यास सुरवात झाली आहे. त्यातील 4 घडामोडी आपण काल बघीतल्या . आज बघूया तीन घडामोडी 
     तर मित्रांनो, चीनी बंदर प्राधिकरणाने भारतीय नागरीकत्व असणाऱ्या खलाश्यांवर बंधने घातली असल्याबाबतचे वृत्त, चीनने आँल्मपिकचे प्रक्षेपण करत आसताना अमेरीकेच्या कंपनीने केलेल्या खोडसाळपणावर घेतलेला आक्षेप,  आणि भारताच्या चीफ आँफ डिफेन्स स्टाफ  बिपिन रावल यांनी म्यानमारचा संदर्भात चीनबाबत केलेले विधान यामुळे चीन सध्या चर्चेच्या प्रथमस्थानी आला होता. आता बघूया या  घडामोडी विस्ताराने.
 पहिल्यांदा चीन बंदर प्राधिकरणासंदर्भातील बघूया. तर जगभरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारात जवळपास 95% व्यापार होतो तो समुद्रमार्गाने. यामालाची ने आण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत【त्यातील प्रसिद्ध कंपनी म्हणजे मर्स्क होय. जीचे कंटेनेर आपण रस्त्यावर अनेकदा बघतो,( मर्स्क ही कंपनी कोणतेही उत्पादन तयार करत नाही तर स्वतःच्या मालकीच्या कंटेनेर मधून इतरांच्या मालाची ने आण करते)] या कंपन्या समुद्रातून आपल्या जहाजाची ने आण करण्यासाठी खलांश्यांची नेमणूक करतात. वाहतूक कंपनी जरी पाश्चात्य देशातील असली तरी दक्षिण आशियाई देशातील नागरीक सहजतेने कमी खर्चात उपलब्ध होत असल्याने या जहाजावर खलाशी म्हणून त्याच व्यक्ती  अनेकदा असतात{ जगातील एकुण खलाश्यांपैकी एक तृतीयांश खलाशी भारतीय आहेत} या कंपन्या विविध देशातील माल दुसऱ्या देशात पोहचवते .उदाहरणार्थ इंग्लडची एक जहाज वाहतूक कंपनी असेल तर ती 
जपान मधून माल उचलेल आणि तो  दक्षिण आफ्रिका या देशात पोहचवेल. या प्रवाश्यात या कंपन्या रस्त्यातील अन्य देशात खलाश्यांसाठी विविध वस्तू खरेदी करणे, जहाजासाठी पिण्याचे पाणी इंधनाची सोय यासाठी थांबतात. चीनी बंदर प्राधिकरणाने जर जहाजात भारतीय खलाशी असतील तर आमच्या भुभागावर थांबता येणार नाही, असी भुमिका घेतल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमात प्रसिद्ध झाले होते. यावर भारतीय सरकारकडून चीनी सरकारकडून याबाबत अधिकृतरित्या काहीही न सांगितल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मात्र अधिकृतरित्या जाहिर न करता छूप्या पद्धतीने ही बंधने.लादली जावू शकतात असे या क्षेत्रातील तज्ज्ञ  व्यक्तींचे मत आहे.  जर ही बंदी लागू झाली तर जहाज वाहतूक क्षेत्रातील कंपन्या थोडे महाग खलाशी परवडतील मात्र चीनशी पंगा नको असी भुमिका घेवू शकतील. ज्यामुळे अनेक भारतीयांचा नोकरीवर संक्रात येईल. 
                     आता बघूया आँल्मपिक विषयी घडामोड .तर जपानमध्ये सुरु असलेल्या आँल्मपिकचे प्रक्षेपण जपान सरकारकडून जगभरातील विविध माध्यम कंपन्यांना विकण्यात येते.  उत्तर अमेरीका खंडात हे प्रक्षेपणाचे अधिकार NBC माध्यम समुहाकडे आहेत. या माध्यम समुहाद्वारे अमेरीकेत आँल्मपिकचे उदघाटन सोहळा प्रक्षेपित करताना चीनच्या नकाश्यात तैवान दाखवले नाही. तसेच चीन सरकारकडून हाँगकाँग आणि सिकीयांग या  प्रातांत होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर चीनकडून तीव्र शद्बात नाराजी व्यक्त करण्यात आली. खेळात राजकारण आणु नये. अमेरीकेने NBCवर कार्यवाही करावी अन्यथा चीन अमेरीकेने त्यांचा सार्वभौमत्वावर हल्ला केला असे समजून अमेरीकेवर कारवाइ करण्यास मागेपुढे बघणार नाही, असे चीनकडून सांगण्यात आले आहे. 
चीन तैवानला त्यांचाच भाग मानत आहे. त्यामुळे चीनच्या नकाश्यात तैवान दाखवणे चीन सरकारच्या मते आवश्यक आहे. अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नकाशा दाखवताना पुर्व लडाख आणि पाकव्याप्त काश्मीर भारतापासून वेगळे दाखवण्यात येते त्यावेळी आपण हा चीनचा आदर्श घ्यायला हवा असे मला वाटते.
आता बघूया तिसरी घडामोड .
 तर 2021 फेब्रुवारी 1 रोजी म्यानमार मध्ये लष्कराने सत्ता हातात घेतल्यावर तेथील लष्करी सरकार मोठ्या वेगाने चीनधार्जिणी भुमिका घेत आहे. लष्करी उठावाच्या आधीचे लोकनियुक्त सरकार चीनपासून सुरक्षीत अंतर राखत चीनच्या बिल्ड रोड इनेसेटिव्ह या उपक्रमात सहभागी होत होते. मात्र सध्याचे लष्करी सरकार या बिल्ड रोड इनेसेटिव्हमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. जी भारतासाठी चिंतेची बाब आहे, असे प्रतिपादन आपले चीफ आँफ आर्मी स्टाफ बिपिन रावल यांनी केले. लष्करातर्फे इशान्य भारतातील  धोके आणि संधी याविषयी एक वेबीनार आयोजीत करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते .(लोकनियुक्त सरकारकडुन लष्करी लष्करी सरकारकडे म्यानमारची सुत्रे  जात असताना म्यानमारमधील  अनेक विकास प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र यातून BRI ची विकास प्रकल्प आश्चर्यकारकरीत्या बचावले होते) या चीनी हस्तक्षेपामुळे रोहिंग्या मुस्लिम बांधवांचा प्रश्न चिघळू शकतो, ज्याचा इशान्य भारतावर विपरीत परीणाम होवू शकतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले . 
एकदरीत काही काळ शांत राहिलेला ड्रँगन पुन्हा गुरगुरायला लागला आहे. हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?