वंदन लोकशाहीराला

   


त्या व्यक्तीने फक्त दीड दिवस शाळा शिकली मात्र मराठीतील एक वास्तवदर्शी तळागाळातील लोकांचे लोकांच्या व्यथा योग्य प्रकारे मांडणारे लेखक म्हणून ते परिचित आहे . त्यांनी त्यांच्या 49 वर्षाच्या आयुष्यात तब्बल 35 कादंबरी लिहल्या . त्यांनी लिहलेल्या लोकनाट्य आणि कथा संग्रहाचा तसेच काव्यसंग्रहाचा  विचार केला त्यांनी लिहलेल्या पुस्तकांची संख्या 45 पर्यंत पोहोचते . त्यांनी लिहलेल्या पुस्तकांवर 7 चित्रपट आलेले आहेत त्यांना जी राजकीय  विचारधारा मान्य होती त्या कम्युनिष्ट विचारधारेच्या प्रेमापोटी त्यांनी रशियाला भेट दिली . त्या प्रवासावर आधारित त्यांनी लिहलेले प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे . अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी हा प्रवास केला होता . आयुष्यभर झोपडपट्टीत राहून त्यांनी आपल्या समाजबंधवांच्या उत्कर्षासाठी आपले 
आयुष्य वेचले मी बोलत आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी .1 ऑगस्ट 2021 हा त्यांचा जन्मशताब्दी वर्षाची अखेर करणारा दिवस . अर्थात त्यांचा 101 व्या जयंतीचा दिवस . त्यानिमित्याने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा . 

अण्णा भाऊ साठेंचा जन्म  ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झालात्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे  आईचे नाव वालुबाई साठे होतेसाठे हे शाळेत शिकलेले नाहीकेवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिलीत्यांनी दोन लग्न केलीतत्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. अण्णा भाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते . मात्र ते अण्णा भाऊ साठे या नावानेच सुप्रसिद्ध आहे 

मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकलात्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणीआणि "मुंबईचा गिरणीकामगारया दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारीशोषणकारीअसमान और अन्यायपूर्णअसे म्हटले आहे साठे पहिल्यांदा कॉश्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केलेयाद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होतेते १९४० च्या दशकाम

ध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसारभारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटनाहोती भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी हैदेश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होतेजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होआणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्येज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्यनिर्माण करण्याची मागणी केली होती

साठे नंतर डॉबाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. .१९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी  म्हटले की,पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा  चालना देणारे ठरले आहेमहाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहेअजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाउपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतोआजही मोठ्या संख्येने विद्यार्थी  अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतातसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठेशाहीर अमर शेख आणि शाहीर .गव्हाणकर यांनी केलेमुंबईमराठवाडाविदर्भकोकणपश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केलेत्याच्यामुळे लोक 

प्रेरित झाले

त्यांनी आयुष्यभर हरिजनांसाठी कार्य केले त्यासाठी स्वतःच्या परिवाराची होळी करण्यास देखील मागे पुढे बघितले नाही . त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज या वर्गाची स्थिती पूर्वीपेक्षा प्रचंड प्रमाणत सुधारली आहे .त्यांनी या वर्गासाठी आणि मराठी साहित्याची केलेली सेवा ही  एका ब्लॉग पोस्टचा माध्यमातून सांगणे निव्वळ अशक्यच मात्र लेखाची कुठेतरी सांगता करणे आवश्यक असते , म्हणून  आपली येथे रजा घेतो , धन्यवाद 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?