गिलगीट बाल्टीस्तान, भारत पाक संघर्षाचा नवा केंद्रबिंदू

       

आपल्या महाराष्ट्रात राजकीय लाथ्याळ्यांचा बातम्यांमुळे माध्यमांचे मथळे आणि हेडलाईन्स सजलेल्या असताना भारत आणि पाकिस्तानात यांच्या सबंधावर परीणाम करणारी एक मोठी घडामोड सध्या वेगाने घडत आहे ,जी पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग असणाऱ्या गिलगीट बाल्टीस्तान या भागासी सबंधित आहे.  ज्यामुळे काश्मीर बरोबर भारत पाक संघर्षाचा नवा बिंदू उदयास येवू शकतो.
      तर 2020 नोव्हेंबर 1 रोजी पाकव्याप्त काश्मीर मधील  गिलगीट बाल्टीस्तान हा भाग आपला तथाकथीत स्वातंत्र्यदिन (?) साजरा करत असताना पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने मुझ्झफराबाद येथे जाहिर केल्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान या भागास पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनवण्यासाठी आवश्यक असणारा मसुदा तयार करण्यात आला आहे.  जो आता तेथील केंद्रीय विधीमंडळापुढे मांडण्यात येईल. तिथे मंजूर झाल्यावर पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान अस्तित्वात येईल, असे वृत्त द हिंदूने आणि बिबिसीने दिले आहे. 
     भारताने या बातमीवर अद्याप अधिकृत मत नोंदवलेले नाही. मात्र भारताचा या बाबत पुर्वीपासूनच विरोध होता. भारताच्या मते तो भारताचा अविभाज्य भाग असल्याने पाकिस्तानला याबाबत काहीही अधिकार नाही. 
   पाकिस्तानला "चायना पाकिस्तान इकाँनाँमिक काँरीडाँर" उभारताना  मार्गातील पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान या भागाचे पाकिस्तानमधील स्थान जगासमोर मांडणे अत्यावश्यक आहे. 1972 साली तयार करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या संविधानानुसार ( जे पाकिस्तानमधील तिसरे संविधान होते
【पहिले संविधान 1956 साली, दुसरे 1962 साली, तर तिसरे संविधान 1972 साली तयार करण्यात आले】) 
पाकिस्तानात पंजाब { पाकिस्तानातील राजकीयदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या, लोकसंख्येचा विचार करता सर्वात प्रबळ प्रांत},  सिंध, बलूचीस्थान ( पाकिस्तानातील क्षेत्रफळानूसार सर्वात मोठा, मात्र लोकसंख्येनूसार सर्वात कमी असणारा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध प्रांत) आणि खैबर ए पख्तूनवा [ज्याला आपल्याकडे प्रामुख्याने वायव्य सरहद्द प्रांत म्हणून ओळखले जाते] हे चारच प्रांत आहेत. पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरच्या दोन्ही भागाचा उल्लेखच यात नव्हता. त्यामुळे  पाकिस्तानसाठी चीन पाकिस्तान इकाँनाँमिक काँरीडाँर साठी पाकव्याप्त काश्मीर मधील  गिलगीट बाल्टीस्तान हा  स्वतःचा भाग सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठीच पाकिस्तानचा हा आटापिटा आहे.
     पंजाब ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्यासाठी पंजाबच्या गुलाबसिंग या सरदाराची फितूरी कारणीभुत आहे. ब्रिटीशांनी या फितूरीचे बक्षीस म्हणून त्यास पंजाबमधील काही भाग स्वतःची जहागिरीसाठी दिला. तेच जम्मू काश्मीर संस्थान होय. त्याच गुलाबसिंगचा 1947चा वारसदार म्हणजे महाराजा हरीसिंग होय. जम्मू काश्मीरचा उत्तरेकडील भाग देशाच्या संरक्षणासाठी महत्तवाचा आहे, असे कारण देत ब्रिटीशांनी हरीसिंगकडून कराराने स्वतःकडे घेतला. 26 आँक्टोबर 1947 ला भारतात काश्मीरचे संस्थान सामील झाल्यावर 1नोव्हेंबर 1947मध्ये या भागाने उठाव करत आपण स्वतंत्र असल्याचे जाहिर केले. त्यानंतर 15 नोव्हेंबर 1947 रोजी या भागाने पाकिस्तानबरोबर जात असल्याचे जाहिर केले. मात्र पाकिस्तानच्या केंद्रीय सत्तेने याबाबत सावध भुमिका घेत त्यावेळी याला पाकिस्तानचा भुभाग म्हणून मान्यता दिली नाही. त्या वेळेच्या पाकिस्तानी सत्ताधिकाऱ्यांचा मते जर आपण गिलगीट बाल्टीस्तान यास मान्यता दिली तर आपला संपूर्ण काश्मीरवरील दावा निघून जावू शकतो.1999पर्यत या भुभागातील नागरीकांना पाकिस्तानी नागरीक म्हणून मान्यता देखील नव्हती. जी 1999साली पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाचा( जे कराचीत 
आहे) निवाड्यानंतर मिळाली .2009पर्यत या भुभागास फाना (फेडरली अँडमिस्टीर्ड नाँर्दन एरीया) म्हणत .त्यानंतर त्यास गिलगीट बाल्टिस्तान असे भौगोलिक नामधिभान मिळाले. 
हा भुभाग शिया मुस्लिम बांधव बहुसंख्य आहे. पाकिस्तानचा धर्म आपण इस्लाम म्हणत असलो तरी पाकिस्तानी संविधानानुसार तो सुन्नी इस्लाम आहे. त्यामुळे या बाबत पाकिस्तान काय गोष्टी करते हे बघणे आवश्यक आहे. ही सध्या विकसित होणारी घडामोड आहे, यातील विविध टप्पे मी त्या त्या वेळी सांगेलच तूर्तास इतकेच. नमस्कार 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?