दर 65 मिनिटात एक ........

             


  राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागातर्फे नुकतीच सन 2017 ते 2019या तीन वर्षात किती तरुणांनी आत्महत्या केली याची आकडेवारी जाहीर करण्यात आली  ती अत्यंत भयानक आहे या तीन वर्षात  24हजार तरुणांनी आत्महत्या केल्याची नोंद   राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे . ही आकडेवारी देशभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या  आत्महत्येच्या गुन्ह्यांची आहे . आपल्या भारतात होणाऱ्या सर्व आत्महत्येची नोंद पोलीस ठाण्यात होत असेल असे मला तरी वाटत नाही . अनेकदा घरातून पळून गेल्याने हरवल्याची नोंद पोलीस ठाण्यात होण्याची मात्र संबंधित त व्यक्तीने आत्महत्या केले असण्याची आणि काही कारणाने ते प्रेत न सापडल्याची किंवा त्या मृत्यूची नोंद अपघाताने अज्ञाताचा मृत्यू म्हणून होण्याची शक्यता सुद्धा आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे आपण राष्ट्रीय गुन्हे  नोंद विभागाची आकडेवारी योग्य  मानली तरी ही आकडेवारी मोठी आहे हे कोणीही नाकारू शकत नाही तीन वर्षात 24हजार म्हणजे वर्षाला 8 हजार . दिवसाला 22 किंवा   दर  65 मिनिटात एक आत्महत्या . आय पी एल ची एक मॅच साडेतीन तासाची असते . सध्याचा करोनाचा कालखंड सोडून देऊया मात्र  आपण जेव्हा चित्रपटगृहात चित्रपट बघायला जातो तेव्हा सव्वा तीन तास सहज खर्च होतात . या काळात तीन आत्महत्या घडून गेलेल्या असतात या अहवालातून स्पष्ट होते 

         ही संख्या अल्पवयीन किंवा तरुण व्यक्तींची  आहे . आपल्या भारतात 18 ते 40 वयोगट हा तरुणाचा आहे .देशाचे भवितव्य ठरवणारा हा वयोगट आहे  प्रौढ व्यक्तींनी केलेल्या आत्महत्या यात धरलेल्या नाहीत त्या जर यात धरल्या तर हा आकडा किती मोठा असू शकतो. याचा अंदाज आपण करू शकतो. या आत्महत्या नोकरीतील ताणतणाव, शिक्षणातील अपयश यामुळे या आत्महत्या झालेल्या आहेत . आजारपणाला कंटाळून किंवा अन्य काही कारणाने होणाऱ्या आत्महत्या यात समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत . जर त्यांचा समावेश झाला तर यात मोठ्या

प्रमाणात वाढ होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे . देशातील मानसिक अनॊरोग्य किती मोठ्या प्रमाणावर आहे . याचा हा पुरावा. नैराश्य उदासीनता याबाबत आपल्याकडे पुरेशी सजगता नसणे , मानसिक आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींचे लोकसंख्येचा तुलनेत असणारे अत्यल्प प्रमाण या मुळे आपल्या देशात अशी स्थिती निर्माण झाली आहे .  आपल्या  भारतात शारीरिक आरोग्याबाबत आता आता जागृती होत आहे त्यामुळे मानसिक आरोग्याबाबत प्रचंड अनास्था आहे अनेकांना मानसिक रोग म्हणजे स्किझोफेनियाचं माहिती असतो . स्किझोफेनिया सोडून इतर मानसिक रोग आहेत ज्याच्यावर उपचार करणे आवश्यक असते याबाबत आपल्याकडे पुरेशी जनजागृती नाही 

       मात्र शहरांचे,  आणि अन्य गोष्टींचे नामांतरण करणे , या सारख्या अति महत्वाच्या प्रश्नांवर देशातील सरकारने व्यस्त असल्याने आपल्या देशांच्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर हा विषय नाहीये . तो लवकरात लवकर यावा त्याविषयी आपल्या सरकारच्या प्रमुखांना  एखादे ट्विट करावे अशी इच्छा व्हावी अशी मनोकामना व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?